Wednesday, 2 March 2016

शनिदेव V/s नारीशक्ती

कुणाच्याही राशीत घुसला की त्याच्या आयुशाची पार वाट लावणारा आपला शनि देव. समस्त देव लोव लोक नाराज झाले तरी चालेल पण शनी देव एकदा का कोपला की , आपली " उलटीगिनती"  चालू. एवढी खतरनाक दहशत आहे आपल्या शनि देवाची.  म्हणून सगळेजन  शनि देवाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आमच्या काही भोळ्या आया बहिनी सुद्धा त्याला पूजा पाठाने प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात.  पण हा शनि देव स्त्रीयाना का घाबरतो कुणास ठाउक ?? बिच्याऱ्या च्या मंदिरामधे स्त्रियांना त्याच्या दर्शनाची परमिशन नाही.
देवाला स्त्रियांचे वावडे आहे का येथील जुनाट आणि वाळवी लागलेल्या विचारांनी प्रवृत्त असलेल्या पुरुषी वर्गाला आहे कुणास ठाउक ?? असो अनिताबाई शेटे शनि शिंगनापूर येथे अध्यक्ष पदी आल्यावर काही फरक पडेल असे वाटले होते पण.....
देवाच्या दर्शनासाठी आमच्या स्त्री जगताला आंदोलन करावे लागते , यापेक्षा कोणते वाईट दिवस बघण्याचे बाकी राहिले होते. बर फ़क्त शनि मंदीरच नाही तर पुरोगामी समजनारा महाराष्ट्र आणि देशात ही असे बरेच मंदीर आहेत जिथे स्त्रियांना दर्शानासाठी संमती दिल्या जात नाही. आळंदिला अजानवृक्षाच्या ठिकाणी स्त्रियांना दर्शानासाठी बंदी होती. त्याठिकाणी सुद्धा आंदोलन करावे लागले. कोपरगाव येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या समाधीस्थळी पंचधातूनी बनलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यास बंदी होती , त्याविरुद्ध ही स्त्रियांना बंड पुकारावे लागले.
स्त्रियांच महत्त्व आणि त्यांची प्रतिष्ठा धूळीला मिळवनारे अजुन काही उदाहरणे देतोय. दक्षिण भारतामध्ये वंशपरंपरेने मीळनारे पुरोहित पद नाकारले गेले.  हाजी अली च्या दर्ग्यात मुस्लिम स्त्रियांना बंदी आहे. आजही बऱ्याच मस्जीद मधे स्त्रियांना प्रार्थनेची संधि नाही . जरी मुस्लिमानचे पवित्र स्थान असलेल्या मक्केमधे स्त्रिया प्रार्थना करत असल्यातरीही.
आत्ताचेच एक ताजे उदहारण घ्या, सबरीमाला मंदिरामधे रजस्वला स्त्रियांना दर्शनाचे बंधन आहे. आता स्त्रियांच्या नैसर्गीक असलेल्या मासिकधर्माचा आणि देवदरशनाचा काय संबंध आहे  ?? या विरोधात सर्वोच्च  न्यायालयात सुनावनीची प्रतीक्षा आहे.  कुठल्याही विवेकी आणि बुद्धिवादी माणसाला हा गावंढळ आणि मुर्खपणाचा प्रकार वाटेल. असो...
कारण काहीही असो पण वर दिलेल्या सर्व उदाहरानांमध्ये समस्त स्त्री जगाची विटंबना होते आहे त्याचे काय ??? संपूर्ण स्त्रियांना पुरुषी अहंभावापोटी डावलले ज़ात आहे. हा त्यांचा अपमान नव्हे तर काय आहे. देवाला कोणी दिला हक्क स्त्रियांना दर्शन घेउ न देण्याचा ??? कोणताही देव काय बिना माय चा पैदा झाला आहे का तर तो स्त्रियांची अशी अवहेलना करतो आहे..?? खर म्हणजे कुठलाही देव हा भेदभाव करत नाही . हा दूजाभाव करतात ते लोक ज्यांनी देवाला आपल्या मर्जिप्रमाने आणि सोईनुसार बनवल आहे.
भारतातल्या विद्वान् आणि आधुनीक  स्त्रियांनी हे कट कारस्थान वेळीच ओळखल पाहिजे . बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती , धर्म , लिंग वंश असे सर्व भेदभाव तोडून स्त्रियांना उत्कर्षाची संधी दिली आहे . सांविधानामधे बाबासाहेबांनी याचा तीव्र विरोध केला आहे .(भारतीय संविधान कलम ९५) त्यानुसार देश महिला सबलीकरण आणि सशक्तिकरानाच्या दिशेने पाउल टाकत आहे.
सर्व बुद्धिवादी स्त्रियांनी एकत्र येउन त्यांचा आपमान करनाऱ्या , देवाच्या नावाखाली त्यांची विटंबना कारनाऱ्या  प्रवृत्तीला उलथुन पाडून एक नवीन " परिवर्तन " करण्याची गरज आहे.
परिवर्तन ... झालच पाहिजे.....
सौजन्य
       -दैनिक पुण्य नगरी १३ जानेवारी २०१६ पान नं. ६
      - भारतीय संविधान
प्रेमकुमार ढगे (९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...