Wednesday, 9 March 2016

जेंव्हा मी जात सांगितली...

सकाळी सकाळी लवकर उठालो . गावाकड जाणार होतो आज. त्यामुळं जरा घाईतच होतो. पहिली ट्रेन निजामाबाद प्यासेंजर साडेसात वाजता होती. म्हणून  सिटी बस ची वाट न पाहताच कंपनीच्या बस ने बाबा पेट्रोल पंपावर्ती आलो . पण ती बस डीजेल भरण्यासाठी पंधरा मिनिटं पेट्रोल पंपावर्ती थांबली.  साला नशिबच ग##*डू . बाबा पेट्रोल पंपावर्ती उतरलो की ऑटोवाला तयारच!

"चल रे भौ तुझ्यासाठीच थांबलोय!"  मी पण पटकन बसलो. पाच मिनिटात ऑटो रेलवे स्टेशन वर्ती आला. पटकन दहा रुपये काढून दिले आणि ट्रेनचे स्टेटस बघायला मी स्टेशन मधे घुसलो. पण ट्रेन पाच मिनिटं आधीच रवाना झाली होती. हताश होउनं तसाच बसलो. आता दूसरी ट्रेन होती नऊ वाजता. मी लगेच तिकीट काढल , आणि वाट पाहत बसलो ट्रेनची.

थोड्याच वेळात ट्रेन आली . गाडी मधे चढ़लो. जागा मीळवली. आता माझा प्रवास सुरु झाला होता. आज न्यूज़ पेपर ला सुट्टी होती. म्हणून दोन मासिकं घेतली होती, काढली आणि वाचत बसलो.
गाडी (ट्रेन) चिकल्ठान जवळ आली असेल तेवढ्यात एक आवाज ऐकू आला . तो आवाज ऐकला की डोक्याला टेंशन येत. आवाज होता टाळीचा. एक 'तृतीयपंथी' दिसला. आता किमान दहा रुपयाला तरी फटका होता. माझ्या जवळ येउन त्याने टाळी वाजवली. मी पटकन दहा रुपये काढून त्याला दिले. तो तृतीयपंथी आमच्या इकडचाच होता. थोड़ी चेष्ठा करावी म्हणून मी विचारलं , "एवढ्या सकाळी सकाळी कधी आली इकड?" "मला बघीतल नाहीस का ?" डोळ्यावरची बट सावरत तिने (त्याने) मलाच परत विचारल. मी "नाही " अस म्हणालो. "अरे काल माझा डांस बघितलास का नाही?" त्यांच्या स्पेशल स्टाइल मधे त्यानं मला विचारल. मी परत 'नाही' मन्हालो. "अरे किती छान डांस केला मी, पावन गणेश मंडळ पथक नाही बघितलस का?" मी परत नाहीच  मन्हालो. मी माझ्याजवळचा ट्याबलेट फ़ोन काढला तसा तो हाताची घडी घालून माझ्या समोर उभा राहिला. त्याचा फोटो काढायचा मोह मला आवरता नाही आला. त्यांन (तिन) माझ्या खांद्यावर हात ठेवून सेल्फि पण काढला. सेल्फि काढायचा मोह ती आवरू शकली नाही. मी दिलेली दहा रुपयाची नोट दोन बोटांमधे दाबुन टाळी वाजवत ती निघून गेली. हा सर्व प्रकार माझ्या सोबत चे सगळे सहप्रवाशी डोळे मोठे करून पहात होते.

समोर बसलेली आजी मला मन्हाली, " तुमच्या ओळखिची आहे का ?"  मी मन्हालो, "नाही , आमच्या तिकडे कधीमधि मला दिसती."

आशाताच बदनापुर स्टेशन आलं. बहुतेक रेलवे क्रासिंग असावी. रेल्वे थांबली. त्यामूळं बरेच प्रवाशी खाली उतरले. तेवढ्यात एक मुलगा काळाकुट्ट चेहरा आणि तशीच एक त्याहुन छोटी मुलगी कमरेवती घेतलेली , जवळ आला आणि खिडकीच्या बाहेरुनच केविलवाने तोंड करुण पैसे मागू लागला.

एकवेळ विचार आला, आपण आत्ताच तृतीयपंथी व्यक्तीला दहा रुपये दिले तर याला एक दोन रुपये द्याला काय हरकत आहे?
मी त्याला दोन रुपये देणार एवढ्यात समोर बसलेली आजी मन्हाली " कचा कचा काम करावा की. शाळा शिकावा. लेकर कढीला घ्यायचे आणि भिक मागायच याला काय आर्थ हाये ? राहूदी रे दादा काही देऊ नकू. आत्ताच त्या हिजड्याला दहा रुपये दिलेस. तुह्याकड़ लैय पैसा झालाय काय?"

आजीचा खंबीर आवाज ऐकताच तो बिचारा त्या पोरीला घेउन पुढं गेला.

मी मन्हालो,"बरोबर आहे आजी तुमचं. शाळा शिकायची देली सोडून आणि भिक मागायची! याला काय आर्थ आहे. यांच्या आई वाडिलांना कस काहीच वाटत नाही?"

आजी मन्हाली, "अरे दादा,  हे महारा मांगाचे पोरं आशेच असतात. सरकारणं यांच्या साठी लैय सोई करुण ठिवल्यात पण हे लोकं नाही सुधारणार...!"

आजीच्या ह्या अनपेक्षित वक्तव्याने मी सुन्न झालो. मला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. पण मी स्वत:ला सावरले . आजीच्या बोलण्याला दुजोरा देत मी मन्हालो, "हो आजी सरकारणं ह्यांच्या साठी खुप सुविधा करुन ठेवल्या आहेत पण हे लोकं असेच आहेत. "

आजी मन्हाली . " तुम्हाला सांगते दादा, आमच्या गावात 'पारध्या'चे काही लोकं आले होते . दिवसभर काही नाय,  पण रतारिला हे पारधी गावच्या लोकांच्या वावरात  जनावरं नेऊन चारायाचे. कळाल्यावर सगळ्या गावानं पोलिस केस केलि आणि आन लावले पळऊन. "

आजी सहज बोलुण गेली .पुढे बोलताना आजीने मला विचारले," काय रे दादा तू काय करतूस?" मी मन्हालो, "आजी मी इंजीनियरिंग करतो."  आजी मन्हाली, "सायंस हाय का तुह?"  " हो आजी सायंस घेतल्यावर पुढ चार वर्ष आस्ते इंजीनियरिंग बारावी पास झाल्यावर ," मी स्पष्टीकरण दिलं.

यावर आजी मन्हाली, " हो रे दादा, मोहा नातू बी हाय नासकाला . त्यो बी तेच करतोय. तेला लैय पैसे लागायालेत . त्याच बी आखरी वरीस हाय. एक लाख आन पस्तीस हजार रुपये लागायालेत त्याला. नुसतं काडी वाणी झालय. लैय तान घेतय,पैसे नाहित म्हणून. आम्हाला मराठी लोकायला सरकार काही देत नाही. दोन एकर ववारात काय होणार हाय दादा?? "

आजीन तिची व्यथा थोडक्यात सांगितली. मला कळाले की आजी जातिन मराठा पाटिल होती.

मग मी मन्हालो, "आजी शिक्षनासाठी कर्ज भेटतय ना."

आजी मन्हाली " हो रे दादा,  काढलय, दोन लाख आंशि हजार काढलय पण ते आपल्याला देत नाहित शाळाच्या नावावर पाठवतात. " 

एजुकेशन लोन बद्दल नवीन गोष्ठ मला आजिकडून समझली.

आजी पुढे मला मन्हाली " दादा तुम्ही पण पाटिल हाईत का?"

मी मन्हालो " नाही आजी मी पाटिल नाही. मी बौद्ध आहे. "

माझ्या ह्या अनपेक्षित उत्तरानं मात्र आजी अनुत्तरित झाली. निस्तब्ध झाली.

आजीबाई ने सहज केलेल्या मराठा, महार, मांग, पारधी ह्या सर्व जातींच्या उल्लेखावर मी माझ स्टेशन येइपर्यँत विचार करत होतो......

प्रेमकुमार शारदा ढगे
9860303216
premkumar.dhage@gmail.com

September 28, 2015 at 11:53am

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...