Wednesday, 2 March 2016

दोन हजार वेळेस धमकी देण्यात कोणती मर्दुमकी वाटते ???

महिषासुर जयंती साजरी करने हा देशद्रोह होउ शकतो का या विषयाखाली एशियानेट चैनल ने  शुक्रवारी चर्चा घडउन आणली . या चर्चेनंतर चैनल च्या मुख्य संपादक ,समन्वयक आणि निविदेका सिंधु सूर्यकुमार यांना धमाकावनारे दोन हजार फोन कॉल्स आले .या प्रकरणी केरळ पोलिसांत तक्रार केलि असून पाच जन अटक आहेत.  अटक केलेले आरोपी हे आरएसएस किंवा श्रीराम सेनेचे असल्याचे बोलले जात आहे .
आता या निमिताने एका गोस्ठिचे आश्चर्य वाटते आहे . भारत देशातल्या लोकांना नेमक झालय तरी काय...?  कुणाचीही जयंती आणि पूतळे उभारण्याचा पिसाट रोगच झाला आहे या तळभद्रि लोकांना . महिषासुर जयंती काय, अफजल गुरु ची शोकसभा काय , नाथूराम गोडसे स्म्रुतीदीन काय , निव्वळ बावळटपणा लावलाय भारतवासियांनी. कधी कधी विचार पडतो हेच का ते महात्मा गांधीजिंचे अनुयायी..? हेच आहेत का लोकमान्य असलेल्या टिळकांचे वारस.? हेच का ते बाबासाहेबांचे अनुयायी ज्यानी संबंध आयुष्य बहुजनाच्या  हितासाठी साठी खर्च केल..? कुठे ह्या लोकांचे गगनभेदी विचार , पहाडालाही पाझर फोड़नारी त्यांची जीवनशैली....!  आणि कुठे आजचे त्यांचे निस्ठावंत चेले जे त्यांचीच इज्जत धूळीत मीळवायला बसलेत..!
सिंधु सूर्यकुमार यांना धमकी दिली यापेक्षाही माला या गोस्ठिचे आश्चर्य वाटते की एका स्त्रीला  पुरुषी अहंभावाने दोन हजार वेळेस धमकी द्यावी..! या आक्कलशुन्य कृत्यातुच समंध स्त्री जातीचा विजय आणि भेकड  पुरुषी मानसीकतेचा पराभव झाला आहे .
एकीकड स्त्रियांना कायद्याच्या माध्यामातुन समानतेची चॉकलेट दाखवायचे ,  त्यांना आदर देऊन मोठेपानाचे ढोंग करायचे आणि दुसरीकड आपला नीचपना जगाला दाखुन द्यायचा .. ! हीच खरी नीच पुरुषी मानसिकता आहे . केवळ एखाद्या  देवीला (नास्तिक आहे म्हणून देवाला किंवा देवीला मानत नाही तरीसुद्धा ) काहितरी बोलल्यामुळ जिवंत आणि आधुनीक स्त्रीला दोन हजार वेळेस धमकी देण्यात कोणती मर्दुमकी वाटते  त्यांनाच माहीत..?
नारीशक्तिला कधीही कमी लेखता कामा नए . भारतातल्या मोठमोठ्या युद्धांना स्त्रियाच कार्नीभुत आहेत हा इतिहास आपन वीसरु नये.एक स्त्री देशाचा इतिहास बदलू शकते हे इंदीराजींनी दाखुण दिले आहे .  आणि भारतात तर नारी सर्वत्र पूजते । या उक्तिनुसार स्त्रियांना खुप महत्त्व आहे . शेवटी महिषासुराचा वध करणारी सुद्धा स्त्रीच होती हे वेगळ सांगायची गरज पडू नए ...
प्रेमकुमार ढगे ,
9860303216
premkumar.dhage@gmail.com

1 comment:

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...