Thursday, 31 March 2016

रिस्की जर्नी भाग 2

एवढ्या साऱ्या लोकांमधे एक चेहरा ओळखीचा वाटत होता. कोण असाव? ज़रा जवळ जाऊन बघितल तर माझा मित्र कृष्णा होता.तो सुद्धा चार दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे त्याच्या गावाकड आलेला होता. आता आम्ही दोघे सोबतच परत औरंगाबादला येणार होतो.

मी थोड़ा उशीराच आलो होतो. कृष्णा माझ्या आगोदरच खुप वेळापूर्वी आलेला होता. तिकिट काढले. 'प्रभूच्या' कृपेने रेलवेचे तिकिट ₹55 वरुण ₹65 वर आले होते. मानवत रोड ते औरंगाबाद 'तपोवन एक्सप्रेस' 12 वाजेपर्यंत येणार होती. इथ आमच्या आयुष्याचे बारा वाजलेत आणि ' तपोवन' सुद्धा बारालाच होती हा केवळ योगायोग होता. असो...

शिट्टी वाजली. ती शिट्टी नाय ,  रेलवेची. जिवात जिव आला. चला म्हणजे आमचा प्रवास आता सुरु होणार होता. पण हे काय...! च्या आईला रेलवेमधे तर  पाय ठेवायला पण जागा नाही. हिटलरने 'मरणाच्या घरात' जसे लोक कोंबले होते अगदी त्याच प्रमाने लोक  रेलवेत होते. एकमेकांवर कुरघोडी खेळल्यासारखे. एकाला दुसऱ्या जीवाची पर्वा नाही. जो तो जमेल तसा कोपरा धरून उभा राहिलेला. यात रिजर्वेशन केलेल्या लोकांना तर एकदम दिल्ली जिंकल्या सारख वाटल नाही तर नवलच..!

" यार ढगे, लैय गर्दी  आहे बे गाडीला " कृष्णाचे अवसान संपले गर्दी  बघून. कसे बसे एका डब्ब्यामधे चढलो . नाइलाजाने उभे राहूनच जावे लागणार होते. सेलु मधे गाडी थांबली. तपोवन एक्सप्रेस फ़क्त तालुक्याच्या ठिकाणीच थांबते. सेलुवरुण एक म्हातारा आणि एक म्हातारी एका तरुण मुलीला घेउन चढ़ले. सोबत एक मोठी थैली होती. तिच्यामधे काहीतरी धान्य असायला पाहिले. ते सगळे आता जागा नसल्यामुळ वाटेतच पसारा घालून बसले. दरावाज्याची सगळी कोंडी केली त्यांनी. ट्रेनच्या मधल्या स्पेस मधून आता कुणालाही जाता येत नव्हते. शेवटी एक पानी विकणार आला आणि त्याने संगीतल्यामूळे ती वृद्ध स्त्री तिच्या सोबत च्या मुलीला घेउन दरवाज्याच्या बाजूने बसली , आणि मधला स्पेस मोकळा झाला. आता येणाऱ्या जाणाऱ्याला काही अड़चन नव्हती.

व्हाट्स अप चे स्टेटस चेक करन्यासाठी इन्टरनेट चालू केल. आमच्या ग्रुप मधे अविनाश सर्वाना आपापले लोकेशन टाकायला सांगत होता. मी सुद्धा माझे लोकेशन पोस्ट केले , मला वाटते मी परतुरच्या जवळपास असायला पाहिजे. व्हाट्स अप खेळन्याच्या नादात बैटरी लो झाली. आता काय करायचे . कृष्णाकडून चार्जर घेतले आणि त्या वृद्ध स्त्री च्या समोर एक इलेक्ट्रिक बोर्ड होता. तिथे चार्जिंगची सोय होती. मग मी ट्याबलेट चार्जिंगला लाऊन त्याला तसेच वर शर्टच्या खिशात ठेउन त्या वृद्ध स्त्री च्या एकदम विरुद्ध बाजुला उभा राहिलो. मधल्या स्पेस मधुन जाणारा प्रतेकजन मला बघत होता. आणि मी करत असलेल्या "स्टाइलिश" चार्जिंगला पाहून हसत होता.

"भेळ घ्या भेळ... मसालेदार भेळ"  असा आवाज करत मध्यम  वयातली एक बाई आली . माझ्या समोर बसलेल्या वृद्ध स्त्री ने दहा रुपयाची भेळ घेतली. पण तीच्या सोबत असलेली तरुण मुलगी , कदाचित तिचे लग्न झालेले असावे कारण ती साडीवरती होती, काही केल्या भेळ खात  नव्हती . सोबतची आजी तिला भेळ खायला आग्रह करत होती. पण ती काही खात नव्हती. माझ्या लक्षात आले की , ती माझ्यामुळे भेळ खात नव्हती. कदाचित मी समोर थांबल्यामुळे तिला कम्फर्ट वाटत नसाव. मग मी माझ्या चार्जिंगचा खेळ आटोपला. कृष्णाला चार्जर देऊन मी त्याच्याच बाजुला बसलो . आता ती आजी एका दरवाज्यात आणि आम्ही दुसऱ्या दरवाज्यात आशाप्रकारे दोन्ही दरवाजे एंगेज झाले होते. आता मात्र "ती" भेळ खात होती म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. मी तिच्याकडे बघतोय हे लक्षात आल्यानंतर तिने आपली साडी आणि तिच्यावर असलेला रुमाल व्यवस्थीत केला.

"चल रे चिकन्या चल काढ लवकर" कृष्णाकड त्याचा गालला चिमटा घेत एक तृतीयपंथी आला. कृष्णान क्षणाचाहि विलंब न करता दहा रूपये देऊन टाकले. मलापण "चल रे ला जल्दी" अशी तंबी दिली. मी म्हणालो " चेंज नाही " त्यावर " ला ना,  मेरे पास है चेंज , मै देती तेरेको हजार पाचसो की चेंज. " तीचा/ त्याचा  आवाज वाढला.
मी पाच रुपये काढून दिले. "मेरे पास चेंज नहीं है इसका मतलब मेरे पास नोट भी नहीं है" अस म्हणताच सगळे सहप्रवासी हसले . आणि ती/ तो  नाक मुरडत गेला/गेली.  च्या आईला मला पण " चिकन्या "  म्हटली असती/ता  तर मी दहा नाहि विस रुपये दीले असते. पण इथ सुद्धा आमची अवहेलना.पण मी कृष्णा एवढा चिकना नाही ना... असो....

पाहता पाहता औरंगाबाद स्टेशन आले. खाली उतरलो. स्टेशन वर कृष्णाला चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली . पण समोर लिंबू शरबत बघून विचार बदलला. कृष्णान बिल दिले. " कृष्णा तुला जगातला सर्वांत सुखी माणूस दाखऊ का..?" मी म्हणालो. "कुठय साहेब.?"  कृष्णा उत्तरला. "ते बघ तिकड़" बोटाने इशारा करत त्याला मी दाखवल. एकजन  बिचारा स्टेशनच्या बाहेर बांधलेल्या चौकड्यावर दोन वाजता भर उन्हात, हिरव्यागार गवतात शांत  झोपला होता. खाली त्याची बैग , चप्पल आणि बाटली दिसत होती . बाटली कोणती असेल हे ओळखून घ्या.

ऑटोमधे दोघेपन बसलो. कृष्णा बसस्टैंड आणि मी बाबा पम्पावर उतरणार होतो. रेलवे स्टेशन ते बाबा पेट्रोल पम्प दहा रुपये तिकिट आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे .पण रिक्शावाला मला पंधरा रुपये मागत होता. शेवटी कृष्णाच म्हणाला "चला मी देतो त्याचे पाच रुपये," मला नाही पटली ही गोष्ठ. ह्या सगळ्या गटमटीत अचानक डोळ्यासमोर अंधार झाला. माझ्या उजव्या पायावारून मागुन येणाऱ्या दुसऱ्या ऑटोरिक्षाचे  चाक गेले हे समजायला मला बराच वेळ लागला . मागे वळून बघीतले तर कृष्णाचा ऑटो केंव्हाच दूर गेला होता.सिग्नल सुटल्याने घाइमधे माझ्या पायावरुण ऑटोरिक्षाचे चाक गेले होते. पाचच मिनीटात पाय सुजला. आता मात्र आग सहन होत नव्हती. उड्डान पुलाखाली उभ्या असलेल्या ट्राफिक पोलिसांच्या जवळ उभा राहून सिटी बसची वाट पाहत थांबलो. पोलिसांची परवानगी घेउन त्यांचेच पाणी पिलो. इतक्यात समोरून एक , बी.एम.डब्लू. गेली , लाल रंगाचा स्लीवलेस टॉप डोळ्यावर चस्मा आणि मोकळे केस असलेली बड्या बापाची मुलगी काळ्या रंगाच्या काचेतुनही  माझ्या नजरेतून सुटली नाही. थोड्या वेळासाठी का होईना पण पायाचे दू:ख विसरलो. असो...

शेवटी बस आली . पाठीवरचे ओझे आणि सुजलेला पाय घेउन मी आता उभ्याने प्रवास करू शकत नव्हतो. सिग्नल लागलेला पाहून मी बस कड़े गेलो पण इतक्यात त्यांना ग्रीन सिग्नल भेटला. मग मी त्यांच्याकड आणि तिकडचे सगळे वाहन माझ्याकड येत होते. " ऐ मारायच आहे का रे ..? समोर येउन थांब की"  बस कंडक्टर चवताळला. पण माझा नाइलाज होता. मधे चढ़ल्यानंतर त्याला  बरे वाटावे म्हणून "सॉरी"  बोललो. त्यानेही,  "नाही यार हे चांगल नाही . तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही प्रॉब्लम होउ शकतो" अस बोलून  सहानभूती दाखवली. पण त्याला काय माहीत मी असली " रिस्की जर्नी " खुप वेळा केली आहे. घरी गेल्यावर आईला मात्र पायावर हळद घालन्याचे रीकामे काम लागणार  होते....

premkumardhage.blogspot.com
9860303216

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...