Monday, 7 March 2016

आंबेडकरी चळवळ झाली 'हाइजैक'...

भारत देशाला सवयच झाली आहे चांगल्या गोष्ठी  हाइजैक करण्याची. एखाद्या व्याक्तिने शोध लावला की, अमुक भारतीय वंशाच्या व्यक्तीने अमुक प्रकारचा शोध लावला. भलेही मग ती व्यक्ती  भारत देशाला ओळख़त असो किव्हा नसो. अमुक ठिकाणचा राजा भले ही मग तो कितीही प्रजाहीतदक्ष असो तो केवळ 'आमच्याच' जातीचा आहे अस दाखउन लगेच त्याची जातच हाइजैक. फलना एखादा प्रसिद्ध व्यक्ती आमच्या ' धर्माचा ' म्हणून तो श्रेष्ठ आहे असे भासउन त्याचा धर्मच हाईजैक. असल्या ह्या हलकट प्रवृत्तिमुळे त्या महान व्याक्तिची  प्रतिष्ठा धूळीला मिळते आहे याचे किंचित ही भान नसावे या दुर्जनांना, हीच खरी शोकांतिका... असो...

आज आंबेडकरी चळवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात हाइजैक झाली आहे.आंबेडकरी चळवळीची होणारी पळवा पळवी बघितली की अंगाची लाही लाही होते . ही चळवळ थोड्या वेगळ्या प्रकारे हाईजैक झाली आहे. म्हणजे बघा फ़क्त ' जयभीम' हा एकच शब्द हाइजैक करायचा आणि सगळ्या चळवळीवर प्रभुत्व मिळवायाचे हा सोपा फंडा आता सर्वांना  माहीत झाला आहे . फ़क्त ' जयभीम ' शब्दाची झालर लावायची आणि आख्खी संघटना फोडायची ही ट्रिक्स विरोधकांना हातवळनी पडली आहे. 'जयभीम ' या एका शब्दावर फूटनाऱ्या बाबासाहेबांच्या 'निष्ठावंत' अनुयायांची पोचट सर्व स्वार्थी आणि लबाड राजकारन्यांनी ओळखली आहे. आंबेडकरी चळवळ मातीत मिळवन्याकरता ' जयभीम ' हा एकच शब्द हाइजैक करण्याची गरज आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे समजले आहे.

आता शिकारी कितीही चालाख असला तरी आपण आपली सदसदविवेकबुद्धी गहान ठेवायला नको. ' जयभीम ' हा एकच शब्द हाइजैक झाला तर आपले असंख्य कार्यकर्ते हाइजैक होतात. कधी कधी तर पूर्ण पक्षच हाइजैक होतो. आधीच आपल्यामधे सत्राशे साठ पक्ष ही आपली सगळ्यात पोकळ बाजू . आता यामधे पण ' जयभीम ' शब्द काहीतरी प्रलोभन किंवा म्रगजळी चोकलेट दाखाउन हाइजैक करायचा.बस्स,  झालेच की यांना संपूर्ण रान मोकळे. ही एवढी साधी गोस्ठ्ही आमच्या  ' भीमभोळया' जनतेला समजत का नाही हाच  खरा पेच आहे...?

आज भारत देशामधे असा एकही नेता झाला नाही की ज्याने ' जयभीम ' हा शब्द हाइजैक केला नसेल. किंबहूणा 'जयभीम' बोलल्याशिवाय कुणाचीही सत्ता आजून तरी यायची बाकी आहे. 'जयभीम' शब्दाताली ताकद आणि त्याचे महत्त्व आमच्या लोकांना ज्यांचा या शब्दावर खरा हक्क आहे त्यांना काधी उमजनार,  हे मला न उमजलेले कोड़े आहे. 'जयभीम' शब्दाचा वापर करूण कोणीही सत्ता उपभोगातं आणि परत उपेक्षीत राहतो तो केवळ आमचाच समाज. आमचाच ' जयभीम ' हाइजैक करायचा, आमचेच लोक हाइजैक करायचे आणि आणि आम्हि एकविसाव्या शतकात आजुनही दलितच.

काय फालतूपना लावला आहे हा...! ' मेरीे बिल्ली , मेरेको ही म्याव'  या म्हणी प्रमाने आमच्याच ' जयभीम ' च्या   कुबड्या घेउन तुम्ही सत्तेवर येता आणि आमच्याच समाजावर अन्याय आणी अत्याचार करता. आमच्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना तुम्ही आत्महत्या करायला प्रवृत्त करता , आमच्या आयाबहिनिंवर वाईट नजर ठेवता , आमच्या आराक्षणाने तुमच्या पोटात गोळा उठतो. बस्स ... आता यापुढ काहीही सहन केल्या जाणार  नाही . आरे आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. तुमचा कपटीपना आम्ही ओळखून आहोत. आमच बहुजन युवक वर्ग जागरूक झाला आहे. आता हा तरुण वर्ग केवेळ रोहित वेमुला सारख्या बाबासाहेबांसाठी आत्मबलिदान करणाऱ्या आणि कन्हैया कुमार सारख्या बाबांच्या नावावर समर्पित असणाऱ्या  आणि खरा अंबेडकरवादी असणाऱ्यालाच आपला पाठिंबा आणि समर्थन करणार आहे... तेंव्हा बाबासाहेबांच्या नावावर स्वत: ची पोळी भाजून घेणाऱ्या बांडगुळांनो तुमचा 'काउंटडाउन'  चालु झाला आहेे. हे "परिवर्तन" घडउन आणन्यास आमचा तरुण बहुजन आणि सुशिक्षीत वर्ग सज्ज झाला आहे.

जय भीम(9860303216)
premkumdhage.blogspot.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...