१५ जानेवारी २०१६
काल १४ जानेवारी . समस्त दलित आणि बहुजनानाच्या आयुश्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस. कारण याच दिवशी मराठवाडा विद्यापिठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात आले होते. किंबहुना नाव देन्याला सरकारला भाग पाडले होते. कारन जवळपास सतरा वर्ष चाललेल्या या लढ्यात शहीद झालेल्या २४ अनुयायांची नावे मी वाचली आहेत. एका विद्यापिठाला नाव देण्यासाठी येवढ मोठ्ठ राजकारण , यावारुनाच तत्कालीन शाशन बाबासाहेबांबद्दल किती आग्रही आणि जबाबदार होते याची जाणीव होते.. असो....
बाबासाहेबांना आणि शहीदस्तंभाला वंदन करण्यासाठी विद्यापीठ गेट आलो. रस्त्यांन चालताना पोलिस व्यवस्था ही चोख होती हे अविनाश सोबत त्याच्या कार मधे दोन तास ट्राफिक मधे अडकल्या नंतर कळाले. अगदी pes इंजीनियरिंग कॉलेज पासूनच रस्त्याला जत्रेचे रूप आले होते. शुभेछांचे ब्यानर झळकत होते. प्रेतेकजन नामंताराचे श्रेय लाटायाला बसला होता. बारा पक्षाचे बारा ब्यानर... ज्याला नामांतर लढ्याशी तीळमात्र संबंध नाही असे अनेक गरीब लोक रस्त्यांन त्यांचा पोटापाण्याचा प्रश्नाची सोय करण्यासाठी कट्टा मांडून बसले होते... असो... माझ्या भिमाची पुण्याई...
नामंताराच्या "एकत्र " आणि " एकसंध " लाढ्याच्या वेळेस दुर्दवाने मी लहान होतो.. पण मी मोठा होई पर्यन्त सगळे तुकडे झालेले पाहतो आहे. हे आहे माझ सुदैव.. आणि ही आहे बाबासाहेबांची मला वारस हक्काने मिळालेली चळवळ. असो... नशीबच माझ....
रात्रि आठवले साहेबांची सभा मुद्दाम ऐकण्यासाठी त्यांच्या स्टाँल वर गेलो . तमाम जनेतेचा भिमसागर उचंबळून आलेला. एक वेगळीच हौस... एक वेगळाच जल्लोश... जय भीम चे नारे .... ग्रुपने चाललेले तरुनाइचे फोटोशेशन... कधीही न बघितलेल्या सुन्दर सुन्दर मुली.... वेगवेगळया व्यासपीठावर जमलेले , आपल्या बालिश आणि छपरी शेर शायरी ने लोकाना पेट्वानारे शाहिर आणि गायन पार्टी.... गर्दीचा फायदा घेउन एकमेकांशी लगट करणारे एखादे प्रेमी युगुल.... बाबासाहेबांच्या आयुष्यावर आणि तत्वद्न्यानावर विकायला आलेली पुस्तके बघून डोळ्याचे पारने फिटले...
आणि अता स्टेज वर नेत्यांचे भाषण सुरु झाले. हरीभाऊ बागडे, रावसाहेब दानवे , आणि चंद्रकांत खैरे साहेब प्रमुख अतिथि होते आठवले साहेबांच्या स्टेज वर. सर्वप्रथम खैरे साहेब आले . आणि नामंताराला आमचा विरोध नसून कशा प्रकारे सपोर्ट होता हे सांगण्याचा बोचरा प्रयत्न करत होते. त्यांच्यानंतर लगेचच विधानसभा अधक्ष्य नाना उर्फ़ बागडे साहेब आले . त्यानीच सर्व प्रथम pes सोसाइटी ला तिन कोटि रुपये दान केल्याची आठवान करून दिली. दानवे साहेबानी ही नामंतारचे श्रेय लाटनयाचा अयशश्वी प्रयत्न केलाच. अहो नामंताराचे श्रेय आम्ही सर्वानी आधीच वाटुन घेतले आहे , तुम्हाला काहीच ठेवले नहीं. हे एवढे सारे ब्यानर दिसत नाहित का तुम्हाला ??? येवढी साधी गोष्ठ सुद्धा समजत नाही या नेत्यांन्ना.... असो....
सगळे स्टेज सोडून आम्ही आठावाले साहेबांच्या स्टेज कड़े आलो होतो. पण आठावाले साहेबांच्या भाषना बद्दल मुद्दाम टाळत आहे..
परिवर्तनवादी जय भीम
प्रेमकुमार ढगे(९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com
No comments:
Post a Comment