Friday, 4 March 2016

रिस्की जर्नी

आज मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती,  पि.ई.एस. इंजीनियरिंगच्या नालंदा होस्टेल मधून साजरी करुण घराकड जायला निघालो. अविनाशच्या बाइकवरती मी , शुभम , आणि अविनाश ट्रिपल शीट निघालो. अर्थातातच वहातुकिचे सर्व नियम ध्याब्यावर बसवत. पुढे चौकात पोलिस दिसला की शुभम ने मागच्या मागे उतरायचे ही सर्वपरिचित ट्रिक्स वापरायचे ठरले. अविनाश राइडर  , मधात मी आणि शेवटी शुभम पिल्लिओन राइडर  असा आमचा " रिस्की" प्रवास चालू झाला.

औरंगपूऱ्यापर्यन्त शेवटी सुखरूप पोहचलो. आता पुढचा माझा प्रवास हा एकट्याचा होता. तिथून बजाजनगर च्या बस मधे बसून मी वडगावला पोहचानार होतो. रात्रीच्या वेळी नाही म्हटल तरी पाउनेक तास लागतोच . पण आमच नशीब नेहमीप्रमाणेच दुर्दैवी. शेवटची बस माझ्या आधीच गेली असावी कारण साडे सहा पर्यन्त आम्ही तिथेच वाट बघत थांबलो होतो. अविनाश आणि मी गप्पा मारत उभे होतो . आणि हा शुभम कुठे गेला ?? मग अविनाश कडून काळाले की  शुभम साहेब आमच्या रेंज च्या बाहर जाऊन फ्री वायफाय च्या रेंज मधे गेले होते. असो...

बस आता येणार नव्हती म्हणून अविनाश आता मला बाबा पेट्रोल पंपापर्यन्त सोडणार होता. मग काय, परत आमचा " रिस्की " प्रवास सुरु झाला. पाच मिनिटात मी बाबावरती पोहचलो. आता  ऑटो ने जायचे म्हटले तर जास्त पैसे लागतात हे अविनाशला माहीत होते. " हे घ्या साहेब राहुद्या "  शंभराची नोट पुढे करत अविनाश  बोलला. "माझ्याकड किती आहेत बघुद्या साहेब" अस बोलताना मला समजले की माझ्या कड फ़क्त पन्नास रुपये शिल्लक होते. " राहुद्या हो साहेब तुम्ही बिनधास मागत जा. तुम्ही इकड़ फालतू कमा साठी येत नाही. राहुद्या. " अविनाश चा आवाज वाढला. त्याच्या आवजामधे एवढा कॉन्फीडंस होता की मी त्याला नाही म्हणू शकलो नाही. अविनाश आणि मी एकमेकाना आदरार्थी " साहेब" बोलतो.  शिवाय मला उद्या परत यायला पैसे लागणारच होते.  माझा निरोप घेउन शुभम आणि अविनाश दोघे पण निघुन गेले.

आता मला ऑटोने जायचे होते . उड्डानपुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे मी रास्ता क्रॉस करूण माझ्या स्टॉप कड़े गेलो. ट्राफिक मधे  थांबनाऱ्या गड्या , त्यांचे कर्णकर्कश आवाज , डोळे फोडनारे लाइट , जुन्या वाहनांची घरघर, त्यातून निघनारा धुर जो पर्यावरनाला दूषित करण्याचे काम  प्रमाणिक आणि अविरतपणे करत हॊता, एखाद्या कलेक्टरला ही नसेल असा घमंड असलेला लाल सिग्नल आणि थोड़ी इतरांची काळजी घेणारा आणि प्रतेकाला हवा असलेला हिरवा सिग्नल,  मुद्दाम जवळून कट मारणारी एखादी " सुंदर " स्कूटी ,  "रंजनगाव , वाळूज  , बजाजनगर " असे ओरडनारे रिक्शावाले आणि आणि त्यांचा तो प्रवाशांशी केलेला असभ्यपणा माझ्यासाठी काही नवीन नव्हता... असो..

सिटीतुन कंपन्याकड़े (MIDC) जाणारी बस आली. हिचे वैशिठ्य म्हणजे  ही बस रिक्शा आणि महामंडळाच्या बस पेक्षा कमी पैशात घेउन जाते. कारण ही शासनाची किंव्हा  ऑटोरिक्शा सारखी अधिकृत नाही. त्यामुळ ह्या बसला ऑटोरिक्शावाले,  प्रवाशी घेउन जायाला विरोध करतात. पण ही  बस यांच्यासारखी नेहमी अवेलेबल नसते. विशेष प्रयत्न करूण बस मधे चढलो. आणि चालू झाली बस. थोडीच पूढे गेली असेल , अचानक एक माणूस बस मधे घुसला आणि चालकाला शिव्या देऊ लागला. ह्या  सगळ्याना खाली उतरव अस काहिस तो सुचवत होता. त्याच्या बोलण्यावरुण तो ऑटोरिक्शा चालाक आणि दारु पिउन  होता हे समजले . " उतर खाली मग दाखवतो तुला " अशी धमकी तो बस चालकला देऊ लागला. बस चालक ही काही कमी नव्हता "चल खाली" अस बोलला आणि उतरला .

हा सगळा प्रकार पाहून बस मधले प्रवाशी " चलना भाऊ कशाला त्याच्या नादाला लागतो" अस बोलू लागले.  पण  कुणाचे काहीही न एकता तो खाली उतरला आणि दोघांमधील बाचाबाची कधी हानामारित उतरली हे समजलच नाही . सगळीकड एकच गोंधळ उडाला . बसमधील  काही लोक खाली उतरले , आणि प्रकरण मिटउन परत आले . चला एकदाच मिटल !  बस परत चालू झाली. एखादा मीटर ही  बस पुढे गेली नसेल एवढ्यात खळsssखळळss  असा आवाज करत एक मोठा दगड काचेचे अनेक तुकडे करत माझ्या मागे बसलेल्या गुलाबी शर्ट   घातलेल्या  मुलाच्या  मांडीवर आदळला. काचेचा एक तुकड़ा माझ्या कानाच्या जवळून पुढच्या सिटाच्या मागच्या बाजुला लागला. आणि मी थोडक्यात  बचावालो.

"धरारे त्याला उभा चिरुन टाकतो..!  " अशी एक गगनभेदी चिरकाळी ऐकायला आली. मांडीवर दगड लागलेला मुलगा ओरडला होता. पण तो बेवडा काच फोडून कधीच पळून गेला होता. त्याच्या ऑटोरिक्षाचे प्रवाशी बसवाला पळउन नेतोय म्हणून त्याने हा पराक्रम केला होता. क्षणार्धात वातावरण गंभीर बनल. बस मधले लोक घाबरले . बस मधे दोन छोटी मूल रडायला लागली .  हे बघुन एक रणचण्डिकेसारखी  एक स्त्री कडाडली " अरे उठान सगळे , धरा त्या माद****ला. काय बघताय नुसते. हातात बांगड्या भरल्यात काय समद्यानी..? " तिचा हा आवाज ऐकून मात्र आम्ही सगळेच लाजंकाजं का  होइना पण बाहेर आलो . पण तोपर्यन्त खुप उशीर झाला होता. मग काय आम्ही परत बसलो आणि आणि आता मात्र खरोखर " रिस्की" प्रवास चालू झला.

दोनिक किलोचा दगड असावा तो. चुकुनही कुणाला लागला असता तर  पानी सुद्धा मागु दिल नसत. पण सर्वांचेच नसीब बलवत्तर...
ऑटोरिक्शा चे तिकिट भाड़े ₹30 , महामंडळाच्या बस चे ₹20 आणि कंपनी च्या बस चे ₹10 . आणी या बस मधून प्रवास करणारे माझ्यासारखे सर्वसामान्य प्रवाशी. प्रतेक जन " रिस्क " घेतो आहे ती  पैस्यासाठी. रिक्शावाला , सरकारी बस महामंडळ आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस... रिक्शावाल्यासाठी एखाद्या जिवाची किंमत तिस रुपये , महामंडळाच्या नजरेत विस रुपये आणि कंपनीच्या बस च्या नजरेत फ़क्त दहा रुपये एखाद्या जिवाची कींमत.  भारत देशातल्या सर्वसामन्य माणसाचे हे दैनंदीन जीवन. यापेक्षा " आच्छे दिन"  ते काय असू शकणार आहेत...????

प्रेमकुमार ढगे(परिवर्तन ग्रुप)
9860303216
premkumar.dhage@gmail.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...