Wednesday, 5 June 2024

मुहब्बत की दुकान !

लेखाची सुरुवात धडकन चित्रपटातील अक्षय कुमारच्या का डायलॉगने करत आहे. नफरत को सिर्फ मोहब्बत से जीता जा सकता है.

आपण एखाद्या बद्दल कितीही द्वेष निर्माण केला तरीही समोरचा आपल्या सोबत फक्त आणि फक्त प्रेमानेच बोलत आहे अशावेळी आपल्याला झुकावच लागतं. प्रेमाच्या अचाट शक्तीपुढे द्वेष आणि नकारात्मकता ही कमीच पडणार.प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की लाखोंच्या नरसंहार करणाऱ्या सम्राट अशोकालाही भगवान बुद्धाची करुणा आणि प्रेमासमोर नतमस्तक व्हावेच लागले.


त्याची बालिश प्रतिमा जनसामान्यांत निर्माण करण्यासाठी अत्यंत खालच्या, गलिच्छ पद्धतीने त्याच्याबद्दल द्वेष पसरविण्यात आला. इतके की त्याने त्याच्या बहिणीला प्रेमाने मारलेल्या मिठीलाही नतदृष्ठांनी वेगळ्या अँगल ने दाखवून त्याना बदनाम केलं.

मात्र हा पठ्ठ्या कुणालाही न भिता एकटाच पायी चालत प्रेम करण्याचा संदेश देत अगदी काश्मीर ते कन्याुमारी पर्यंत फिरत होता. वाटेल जो भेटेल त्याला, आबालवृद्धांना मिठी मारत, हा देश द्वेष करणाऱ्यांचा नाही हाच संदेश जणू सांगत होता. त्याच्या वाटेल त्यालाच ट्रोल करणारांना सुद्धा "फ्लायिंग किस" करत पुढे चालत होता.प्रचार सभेमध्ये सुद्धा त्याने बोलताना कसलाही संयम ढळू दिला नाही. कुणावर टीका करताना जीभ खालच्या पातळीवर घसरू दिली नाही. अगदी एखाद्या स्थितप्रज्ञा सारखं निखळ प्रेम करण्याचा धडा त्याने जनतेला दिला.

शेवटी प्रेमाचा विजय झाला. द्वेष करणारे जिंकून सुद्धा आनंदी नाहीत आणि हा हारून सुद्धा अजय झाला. एखाद्याला प्रेमाने जिंकणे म्हणतात  ते हेच! याने तर अख्खा देश जिंकला आहे. आता कुठे मुहब्बत की दुकान उघडली आहे. अजून तर खूप प्रेम विकायचं बाकी आहे....
शुभेच्छा...!

प्रेमकुमार शारदा ढगे
premkumar.dhage@yahoo.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...