प्रिय मित्र शहीद रोहित वेमुला
सप्रेम जयभीम...
गेलास मित्रा कायमचा . मरण पत्कारलस पण निष्ठा सोडली नाहीस. आमच्यातुन जरी गेला असलास तरी तुझी बाबासाहेबांबद्दल ची अस्सिम निष्ठा आणि विचार सदैव आमच्यात जिवंत असतील . तुझ्यातला आंबेडकर सदैव आम्हाला प्रेरणा देत राहिल. आंबेडकरवादी असल्यामुळ स्वर्ग , नर्क आणि पुनर्जन्म ,आत्मा वगैरे काही मानत नाही. पण तुझ्या जिवंत विचारांना अनुसरून तुझ्या समोर मनाची घुसमट घोलतोय . कान उघडे ठेउन ऐक.
रोहित, तू शेवटचा रोहित असशील याची काही शाश्वती मला वाटत नाही,
कारण तुझ्या आधीही मी जातिवादाचे बरेच बळी बघितलेत. काय झाल?? मोर्चे , निदर्शने, आंदोलन, कैंडल मार्च आणि परत वाट पहायची दूसरा बळी जाण्याची . हे आता नित्याचच झालय मित्रा. तुझ्या जाण्यान हे बदलन अस जर तुला वाटत असेल तर तू चूक केलिस मित्रा.
तुला सांगतो रोहोत, तुला आत्महत्या करायला प्रवृत करणारे विद्यापीठ प्रशासन किंवा एखादी विद्यार्थी संघटना नाही तर आम्हीच आहोत. मित्रा तुला हॉस्टेल च्या बाहर हाकलून दिल्याचे फोटो आम्ही आठ दहा दिवसापुर्विच पाहिलेत . काय केल आम्ही?? काही नाही तुझ्या मरणाची वाट बघत बसलोत. अरे काय करणार आम्ही ? आम्ही पण तुझ्यासराखेच विद्यार्थी आहोत. आम्ही सुदधा तेच करणार जे तू कलस . उपोषण आणि निदर्शने . अरे यार पण आस रस्त्यावर बोंबलत बसल्याने काय होणार आहे? आम्हालाही एक दिवस फाशी घ्यायची वेळ येइल.
रोहित मित्रा, सरकारच्या बाहेर राहून आपण काहीही करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सरकार बनावे लागेल. अरे अठ्ठाविस हजार पेशवे एकाच रात्रीत कापून टाकणारी औलाद आहे आपली. कधी विचार केलास का पचशे जणानी अठ्ठाविस हजारांचा खात्मा कसा केला असेल? याच कारन एकच आहे मित्रा , ते म्हणजे ,ते सर्व पाचशे जन एकजुटिने आणि एक दिलाने लढले होते. एकत्र होते म्हणून त्यांच्यामधे सम्पूर्ण सत्ता उल्थून टाकण्याच सामर्थ्य होत.
आज तर तू पहातच आहेस अर्ध्यानी आंबेडकरी चळवळ इतरांच्या दावानिला बांधिली आणि बाकिच्यानी तुकडे करुण आपल्यातच वाटुन घेतली. अरे त्यावेळ फ़क्त पाचशे होतो , आज तर आपण कोटिमधे आहोत. सगळे जर एकत्र असतो तर शंभर वेळेस विचार केला असता त्यानी तुला हॉस्टेल च्या बाहेर काढ़ायाला. बाबासाहेबांची रिंगटोन मोबाइल मधे ठेवली म्हणून हत्या करायची हिम्मत झाली नसती त्यांची. हरियाणामधे अख्ख कुटुंब जाळन्याएवढे धीट नाहित रे ते . बदायूं मधे दोन बहिनिंचा बलात्कार करुण फाशी देऊन झाडाला टांगन्याएवढी औकात नाही त्यांची. पण आपणच ही संधि दिलीय आपल्यातच गट पाडून.
काही दिवसानंतर आता हेच लोक तुझ्या घरी जातील आर्थिक मदतीची घोषणा करतील , भावाला किव्हा बहिणीला सरकारी नौकरीचे आमिष दाखवतिल. नवीन नाही ते. तुझ्या मरणाचा उपयोग ही हे लोक राजकीय आणि वयक्तिक फायद्यासाठी करतील. आणि हे लोक बाबांच स्वप्न पूर्ण करणार आहेत म्हणे..
अरे रोहित तुला सांगतो, हजार वेळेस लाज वाटली पाहिजे यांना . आपण काय करतोय याची. कधी कधी वाटत या सगळ्याना संपून टाकाव आणि स्वत: ही तुझ्यासारख मिटून जाव .हिटलर सारख वैऱ्याच्या हातान मारण्यापेक्षा आपण स्वत:च अंत करवा स्वत:चा. कारन आता आपल्या गळ्यात परत गाड़ग येणार आहे , हे असच चालल तर. पण बाबासाहेबांचा बौद्ध धर्म मला याची संमती देत नहीं. तुला सांगतो रोहित बाबासाहेब आता जर हयात असते ना तर स्वत: ला नेते म्हणनाऱ्याना त्यांनी लाताखाली तुडवल असत. पण...
रोहित मित्रा आज तू आहेस, उद्या कदाचित मी सुद्धा असेल परवा कुणीही असेल. त्यासाठी गरज आहे ती आपल्या एकीकरानाची. एकत्र जर नाही झालो तर आपन नामशेष होणार आहोत , कारण आता २०२० ला sc/st ला आरक्षण ही संपुस्ठात येणार आहे. उद्या घरात घुसून कोन्या आई बहिनिवर अतिप्रसंग केला तरी आपण काही करू शकणार नाहित. दिवसाढवळया खून होतील , घर जळतील. बर झाल हे बघायला तू नाहीस ...
मित्रा जमलच तर मला माफ़ कर , तुला वाचऊ न शकणारा आणि आणि ह्या सर्वांना एकत्र करुण " परिवर्तन" करण्याची अशक्य मोहिम हाती घेतलेला तुझा दुर्दैवी मित्र
प्रेमकुमार ढगे(९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com
No comments:
Post a Comment