Sunday, 6 March 2016

बाबासाहेबांची बेवारस चळवळ...

प्रिय मित्रानों,

सप्रेम जय नमस्कार...

पुढे काही राजकीय पक्ष आणि त्यांचे वारस यांची विवेचना करत आहे

Indian national congress( 1885) 

मित्रहो कॉंग्रेस पक्ष आणि त्याची स्थपना झाल्यानंतर एलन ह्युम त्याचे पाहिले अध्यक्ष बनले. गांधीजी नंतर आणि आणि आतापर्यंत जवळपास  गान्धी घराण्याचे च वर्चस्व राहिले आहे कॉंग्रेस वरती..

अणि आता इंदिरा , राजीव ,सोनिया  आणि आता लेटेस्ट राहुल गांधी.

👉 BJP  (1980)

भारतीय जनसंघा मधून अलग होऊन हा स्वतंत्र पक्ष अस्तीत्वात आला.
या पक्षाने 6 में 1980 रोजी 33 पानी दस्तैवज प्रकाशित केला. यामधे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यानी RSS ज्वाइन करायची सूचना देण्यात आली होती. मंजे पक्ष कार्यकर्ता  rss आणि bjp आशा दुहेर्री सभासद होउ शकतो.

👉 मित्रहो 1984 च्या लोकसभा निवाड्नुकीत या पाक्षाला फ़क्त आणि फ़क्त दोनच जागा मिळाल्या होत्या.

👉अगदी दिन दयाल  उपाध्यायापासून ते गडकरी , अमित शहा, ए.बी. वाजपेयी, ते आज राजनाथ सिंह पर्यन्त आज यांचे वारस स्पष्ठ होते. आणि आहेत.

शिवसेना (जवळ पास 1980)

या बद्दल सर्वनांचा माहिती आहे..

बाळासाहेब ठाकरे पासून ते उद्धव आणि आता आदित्या. शिवसेने चे वारस.

बाळासाहेबांची कदाचित " उद्धव आणि आदित्य ला सांभाळा "

अशी दिलेली भावनिक हाक ही याला कार्निभुत असेल...

असो..

👉RJD ( 1997)

मित्रानो हां पक्ष आहे लालुजिंचा . यान्च्यामधे सुद्धा यांची सौ राबड़ी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव सध्याचा बिहार चा उपमुख्यमंत्री
हे यांच्या पक्षाचे वारस.

असो....

अशे भरपूर उदाहराने देता येतील. पण आता आवर्तो आणि आपल्या मुद्द्याकडे येतो.

👉मित्रहो वर नमूद केलेल्या प्रतेक पक्षामधे त्यांच्या चळवळीला वारस आहे. राजीव गाँधी च्या निधना नंतर कांग्रेस  बेवारस झाली होती पण सोनियाजींनी पुढाकार घेउन तिला सावरल आणि यशस्वीपणेआजहि संभाळते आहे.

👉ठाकरे साहेबांच्या अवहाना मुळ शिवसेना पण टिकली.

आता माझा प्रश्न हा आहे की आंबेडकरी चळवळीला कोण वारस आहे??
बाबासाहेबांनी काढलेल्या प्रतेक पक्षाचे सांगताना लाज वाटती एवढे तुकडे केलेत कार्यकर्त्यणी...

सगळे कार्यकरते बाबांच्या नंतर बेवारस झाले. काही महाभाग तर बेवारस तर आहेतेच पण " ऊपरे " पण आहेत. ह्या उपर्याना बाबासाहेबांच्या नावावर चालणारे एवढे सारे पक्ष कमी पडतात म्हणून ते बाबा साहेबांच्या विचारना तिलांजलि देऊन शत्रूला साथ देतात..

👉 मित्रहो येवढ़  लाम्बन लावण्या च कारण हे आहे की. बाबांन्ना आपल्याला  शासन करती जमात बनवायच आहे .खर तर हे त्यांच स्वप्न होत. पण हे साध्य परिस्थिती पाहता केवळ अशक्यच आहे.

👉 पण  मित्रहो हे आपल्याला बदलायच आहे . अणि हे आपणच करू शकत्तो. आपल्या वाड वाडिलानी बेकी करून ही वेळ आणली आपल्या वर. आता आपण तरुण वर्गाने वेळीच शहाने झाले पाहिजे कारण

👉 संविधाना च्या 95 व्या दुरुस्ती नुसार (2009)

आपल्याला मंजे sc/st ला मिळालेले आरक्षण 25 जानेवारी 2020 ला  सम्पुस्ठात येणार आहे.
आणि obc बद्दल तर काही बोलायालाच नको.

👉 म्हणून 2019/20 ची निवाड्नूक ही अंत्यंत महत्वाची आहे. आपल्याला बाबांचे स्वप्न सत्यात उतरवन्यासाठी अशी नामी संधि भेटणार  नाही.

यासाठी गरज आहे ती एक होण्याची. या लेखाच्या निमित्ताने मी सर्व तरुनांना एक होण्याचे आवाहन करत आहे.अन्यथा पुढची पीढ़ी आपल्याला कधीही माफ़ करणार नाही.

👉 या  दृस्ठीकोनातुन pes या बाबांच्या संस्थेमधुन विद्यार्थ्यानी केलेले "  परिवर्तन" हे संघठन मोलाची भूमिका बजावत आहे. या संघटनेमधे सर्व वेल क्वालिफाइड आणी हायली एज्युकेटेेड तरुण आहेत. यामधुन च समाजाला नेतृत्व सापडू शकते ज्याची गरज आज गरज आहे.

👉 मित्रहो आतापसुनाच तयारी ला लागा... बाबांचे स्वप्न हीच आपली खरी परीक्षा आहे

परिवर्त.... झालच पाहिजे... जय भीम...

जय भीम .... जय भारत...

प्रेमकुमार ढगे
9860303216
premkumar.dhage@gmail.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...