Wednesday, 2 March 2016

कॉलेज चा पहिला दिवस.....

" Dear candidate your reg.no is xxxxx and your allotted for choice no. xxxx "

इनबॉक्स मधे मेसेज धड़कला. हे वाचून मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले . आजी ने तर केसांमधे हाथ फिरउन मिठीच मारली आणि तिचे डोळे भरुन आले . कारण तिचा नातू इंजिनियर होणार होता आणि तो ही बाबासाहेबांच्या संस्थेमधून.
दुसऱ्याच दिवशी रिपोर्टिंग साठी औरंगाबाद ला  पोहचलो. सोबत माझा  मित्र रमेश सुद्धा होता. त्याचाही नंबर PES इंजीनियरिंग कॉलेज ला लागला होता. तो इलेक्ट्रिक आणि मी मैकेनिकल साठी निवडलो गेलो होतो.
सकाळी साडे दहा ते आकाराच्या सुमारास मी कॉलेजला पोहचलो. रमेशही त्याच्या वाडिलांना घेउन आला होता.  मी एक दिवस आधीच    मित्राच्या रूमवर सिड्को ला आलो होतो.
"केवढी मोठी बिल्डिंग है ही ." प्रथम क्षणी कॉलेज ला पाहताच रमेश चे वडिल आवाक झाले. त्यानी गावाकड फ़क्त शाळाच बघितली होती. कॉलेज प्रथमच पहात होते.
कॉलेज च्या ऑफिस मधे एंट्री केल्या बरोबर सहा ते आठ फूटी बाबासाहेबांची प्रतिमा दिसली. हे बघितल्या बरोबर रमेश चे वडिल काहीतरी पुटपुटले.
नंतर त्याना काळाले की हे कॉलेज च बाबासाहेबांचे आहे. त्यावर ते मला मन्हाले " बाबासाहेबांनी किती करूण ठेवलय रे तुम्हाला...!"
मग मी डॉक्यूमेंट ची ज़ेरॉक्स काढण्यासाठी गेलो. मी आलो पण तोपर्यंत एडमिशन साठी खुप रांग लागली होती. रमेश चे वडिल हातामधे पिशवी घेउन आले होते. पिशवीत एडमिशन चे पैसे होते. रमेश  हा जातींन मराठा असल्यामुळ त्याला फुल फीस लागनार होती. रमेश  चे वडिल अगदी साधे , वारकरी संप्रदायाले व्यक्ति.
पण त्यानी अद्याप एडमिशन केले नव्हते ,  खर तर ओपनचे एडमिशन ला एवढा वेळ लागत नव्हता . त्यांच्यासाठी स्वतंत्र प्यानल होते. कदाचित त्यांना एडमिशन घ्यायचे ही  नसेल पण दुसऱ्या फेरीत नंबर  लागण्याची ची काहि शाश्वती नव्हती  आणि औरंगाबादच्या कुठल्याच कॉलेज मधे एवढ्या कमी फीस मधे एडमिशन होणार नवते. रमेश  आमच्या गावातून होणारा पाचवा सहावा इंजिनियर होता . आणि मी बुधवाड्यातुन होणारा पहिला इंजिनियर.
भारत स्वतंत्र होउन सत्तर वर्ष होत आहेत आणि मी मागास्वर्गियातुन्न गावातून होनारा केवळ पहिलाच इंजिनियर होतो. स्वाभिमान बाळगावा की मागासले पनाचे दुःख करावे हेच समजत नव्हते..?
अशातच कोणीतरी "अरे प्रिंसिपल सर आले" अस ओरडले. सगळीकड़े वातावरण शांत झाले. तेव्हा आदरणीय वाडेकर सरांनी नेमकीच प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतली  होती.
सरांची गाडी आली तेव्हा मी खाली होतो, म्हणून सरांचा चेहरा नाही बघू शकलो. माझ्या शेजारी उभी असलेली मुस्लिम समाजाची दोन मूल होती. ते ही माझ्यासारखी नवीनच होती . त्यातील एक मन्हाला " अरे यार अपने सर तो लंगड़े है  और ये पुलिस हवालदार क्या कर रहा है उनके साथ??"
बिचाऱ्याना काय माहीत PES मधील राजकारण...
कारन त्याच वर्षी लोकमत पेपर ने सोसाइटी ची सात आठ दिवस क्रमश:   काढलेली इज्जत मी वाचली होती.
रमेश  च्या वडिलांनी त्याचे एडमिशन केले. वाडेकर सरानी त्याच्या वडिलांच्या विनंतीवरुण फीस मधे इन्सटॉलमेंट ची सवलत त्याना दिली होती. त्याचे हॉस्टल चे एडमिशन ही चौदा हजार रुपये भरुन केले. रमेशचे वडिल ही मध्यम वर्गीय  गरीब शेतकरी होते. म्हणून त्याना ही सवलत मिळाली होती.
होस्टेल च्या एडमिशन साठी मी गेलो असता मला काळाले की sc साठी सात हजार फीस आहे. माझ्याकड  तर ते ही नव्हते . मग मी पण सरांना  फीसमधे सवलतिसाठी त्यांच्या केबिन मधे गेलो.
आतमधे बादामी शर्ट परिधान केलेले , क्लीन शेव आणि आणि पहिल्याच नजरेत इम्प्रेसिवे वाटणारे वाडेकर सराना मी प्रथमच बघितले.
मी पण माझी हकीकत सांगितली. मी केलेल्या अर्जावर काहीतरी लिहून सही कली. आणि मला अकाउंटेंट ला भेटायला सांगितले. आता मला पाच हजार रुपये भरायचे होते. पण माझ्याकड ते ही नव्हते . मी आनले होते फ़क्त आडीच हजार रुपये पैकी मला तेविसशे रुपये एडमिशन फीस होती.
मग नाईलाजाने मला हॉस्टेलचा  नाद सोडावा लागला. एडमिशन करता करता रात्रि चे  साडे सात वाजले होते. समोर बनकर सर , घोरपडे सर आणि खरात सर बसले होते.
"  तुझ्या शिक्षणात चार वर्षाचा ग्याप आहे . काय केलस इतक्या वेळ..?"
घोरपडे सरानी विचारल.
" सर माझ B.A. झालय" सरांना फाइल मधले डिग्री सर्टिफिकेट दाखवत मी बोललो. ती फाइल तशीच खरात आणि बनकर सरान्कडे पण गेली.
" चार वर्षाचा ग्याप म्हटल्यावर लग्न झाल असेल, लेकर बाळ पण असतेंन "   खरात सराचा फिरकी घेण्याचा मुड बनला . सगळे हसले आणि खरात सरानी घोरपडे सर च्या हातावर टाळी दिली.
मी मात्र गोंधळुन गेलो. यावर बनकर सर  मन्हाले " ह्या सराना मस्करी करण्याची सवय आहे. जास्त सीरियस नको घेऊ"
सरांचा मोकाळेपना  मला खुप  आवडला. 
जवळपास पौनेआठ वाजता कॉलेज मधून एडमिशन करूण बाहेर पडणारा मी शेवटचा विद्यार्थी होतो. जवळ आता सात रुपये राहिले होते. डॉक्यूमेंट ज़ेरॉक्स करून एडमिशन करूण तेवढेच उरले होते...
आता रूमवर कस जायच???
PES कॉलेज वरुण बाबा पेट्रोल पंप, तिथून सेवन हिल, आणि सिड्को असा पायी प्रवास करत मी जवळपास दहा वाजता  मित्राच्या रूमवर पोचलो. शॉर्टकट माहित असल्यामुळ फारसा त्रास झाला नाही.
आजही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारा येतो. माझ्या बाबासाहेबांच्या विद्यापिठात, बाबासाहेबांच्या संस्थेत, आणि बाबासहेबंच्याच कॉलेज मधे मी " बेवारस "आणि "ऊपरा " ठरलो होतो..
तरीपण बाबासाहेबांच्या कॉलेज मधे शिकतो आहे याचा अभिमान होता....

टिप: माझ्या मित्राचे नाव बदलेले आहे. 
--
प्रेमकुमार ढगे (B.E. (Mech) , M.A.,  B.A. political  science)
9860303216
premkumar.dhage@gmail.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...