खुप प्रयत्न केले पण माझी म्यागी दोन मिनिटांत कधीच तैयार झाली नाही. जाहिरात करनाऱ्यांचा दावा सपशेल खोटा ठरला. तरी सुद्धा माझे म्यागी वरती खुपच प्रेम आहे म्हणून येवढी साधी चुक माफ़. पण आमची खुशी काही दुष्ठ लोकांना नाही खपली. आली की नुडल्स वर बंदी. का तर म्हणे 'शीसे' चे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त. आता हे प्रमाण खरच जास्त आहे का नाही हे काही आम्हाला माहीत नाही . हे कोण तपासत..? प्रयोगशाळा . प्रयोगशाळा सरकारची. मग काय सरकार सांगेल तसे 'शिसे' वाढू शकते आणि कमी ही होउ शकते. जिसकी लाठी उसकी भैंस...!...असो.
पण सरकार ने म्यागी बंद केली खर पण आमचा काय ? आमचा विचार नाही केला सरकारने. आता आम्ही काय खानार नाश्त्याला..? पण आमचे सरकार खुप काळजी घेते आमची. बाबा रामदेवला लॉंच केल. बाबांचे नुडल्स आले आता. बाबाचे नुड्ल्स आले , आणि आमची म्यागी सरकारीचे आणि कोर्ट कचरीचे खेटे करूणच परेशान झाली बिचारी. बाकीच्या सगळ्या देशात म्यागी ' सेफ' आहे आस गळा ताणून तो फुटायची वेळ आली पण आमच्या सरकार ला काही समजत नाहीये. पण बाबा रामदेव ने डायरेक्ट 'हेड ऑफ़ द सरकार' सोबत लॉबी लावली . आता त्यांच्या पुढे जाण्याची कुणाची बिशाद...?
आता आम्हाला दारु प्यायची सवय. दारु म्हणजे सॉफ्ट ड्रिंक आमची फेवरेट बियर हो. माल्ल्या साहेबांची किंगफ़िशर तर आमची ख़ास फरमाइश. पण मी आगोदरच म्हटलो आमची खुशी लोकांना बघवत नाही. बिचरा माल्ल्या सरकारलाच चुना लाऊन पळाला . तो पळाला हो, पण आमचे काय ..? आम्हाला बेवारस करुण गेला. आता आम्हाला कोण बियर पाजनार. म्यागी सारख किंगफ़िशर सुद्धा बंद पडणार . आता कस होणार आमच
.? कोण करणार आमची फरमाइश पूर्ण...? पण काळयाकुट्ट अंधारात प्रकाशाची एखादी किरन शलाका यावी तसे आमची "सरकारी बाबा" पुन्हा आले , पतंजली बियर घेउन. चला बर झाल. सुंठेवाचुन खोकला गेला.
जेंव्हा जेंव्हा देशात असली आनिबानी आली तेंव्हा रामदेव बाबांना देशाची खुपच काळजी. बाबांना देशाची आणि देशाला बाबांची. म्हणून तर बाबांना त्यांच्या ट्रस्ट साठी नागपुर मधे फ़ूड पार्क उभारनयासाठी 340 हेक्टर , काटोल मधे संत्रा प्रक्रियेसाठी 200 एकर जागा देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. काटोलमधील संत्रा प्रकल्प 500 कोटींचा आहे आणि नागपूर मधील फ़ूडपार्क 2000 कोटि रुपयांचा आहे. प्रस्थापित सरकारने पहिली बार एवढी तत्परता दाखवली आहे . देशाचे अभिनंदन. म्हणजे बाबांच्या म्यागी , पतंजली च्यवंप्राश, पतंजली शुद्ध घी, पतंजली आवळा चूर्ण , मुरब्बा , आयुर्वेदिक टॉनिक, तडका मसला , दही, डोक्याला शांपू , तेल, प्यायला बियर, आंघोळीची साबन याबरोबरच आता , जडीबूटी वर प्रक्रिया उद्द्योग सुद्धा पहायला भेटणार. काही दिवसांनी आमचे " सरकारी बाबांचे " पतंजली ट्रस्ट अंबानीपेक्षा ही देशात श्रीमंत असेल याबद्दल शंका नाही. चला देशाच्या प्रगतीत तेवढाच हातभार. आमचे बाबा म्हणजे फ़क्त योगगुरुच नाही तर सर्वकश आणि सर्वसमावेशक आहेत . असो...
पण प्रस्थापित सरकार जेवढे पतंजली वर "फीदा " झाले आहे तेवढी तत्परता आपन इतरत्र ठिकानी सुद्धा दाखवावी . आपन रोहित वेमुलाच्या आत्महतेनंतर पाच दिवसांनी बोलता. आमचा मुस्लिम बांधवाने गाईचे मांस घरात ठेवल्याच्या शंशयावरुण म्हणून मारल्या जातो आणि याबद्दल सुद्धा आपन ब्र सुद्धा काढत नाहित. आजही महिला पाहिजे तेवढ्या निर्भीड झाल्या नाहित. रात्री अपरात्री त्या मोकळ्या आणि स्वतंत्र भावनेने फिरू शकत नाहित. शेतकरी आत्महत्ते चे प्रमाण वरचेवर वाढतच आहे. आमच्या मराठा समाजातील गरीब विद्यार्थी आरक्षानासाठी आजुनही घसा कोरडा करत आहेत. यांच्यावरही थोड लक्ष दया आणि मग म्हणा " सबका साथ..सबका विकास.."
जय भीम..
सौजन्य: लोकसत्ता 20 फेब. 2016
premkumar.dhage@gmail.com
(9860303216)
No comments:
Post a Comment