आज 14 फेब्रुवारी युवकांचा प्रेम दिवस... हल्ली फार सुचतय ह्या
बहुजन नवयुवकांना अस काहीतरी , नाहीतर पेशव्यांच्या काळात
प्रेम तर सोडाच पण एक शब्द ही व्यक्त करण्याची मुभा नव्हती.
14 फेब्रुवारी च्या निमित्ताने बाबासाहेबांनी मूकनायक च्या
आग्रलेखात केलेले उहापोह थोडक्यात सांगत आहे . यामधे
बाबासाहेब मन्हातात की आम्हाला इंग्रजांचे "सुराज्य" हे
राष्ट्रिय सभेच्या " स्वराज्या" पेक्षा अधिक प्रिय आहे .
याचे कारन असे की , ततकालीन समाजव्यवस्थेमधे बहुजनाची जी
हाल अपेस्ठा होती ती सर्वपरिचित आहेच. या असल्या जीर्ण
आणि सनातनी वृत्तिनी पछाडलेल्या लोकाना इंग्रजांनी देलेली
समानतेचि थोडीशी संधी सुधा बुडत्याला काडीचा आधारच
नव्हे का..? इंग्रजान्कडून मिळालेली सरकारी नौकऱ्यातिल संधी
, शिक्षणातील प्रार्थमिक व् सक्तीचे शिक्षण ह्या
उदारमतवादी सुधारना , शेतकऱ्याविशईचे उदार धोरण,
लश्कारातिल संधी, कायदेमंडळातिल संधी , आमली
पदार्थावरील कर वाढून त्याला आळा घालने आशा अनेक गोष्ठी
ह्या बहुजनाच्या हिताच्या होत्या . आणि स्वराज्यानंतर ह्या
सर्व गोष्ठीची काही शाश्वती नसल्याकारनान बाबासाहेब
स्वराज्याचा पुरस्कार इतक्या सहजी करत नाहित आणि हे अगदी
स्वाभाविकच आहे . असो...
आज स्वराज्याची फळं आपण जवळपास सत्तर वर्ष चाखत आहोत
आणि आज परत आपल्यावर पहिल्यासारखीच परिस्थिती
उदभवलि आहे . बहुजनावर होनारे अन्याय , अत्याचार , त्यांच्या
स्त्रिंयांची होणारी बेअब्रु आणि कत्तल , बहुजन विद्यार्थ्याची
होणारी फरफट बघीतली की आज परत इंग्रजच बरे होते असे
वाटायला लागले आहे ..
आजच्या ह्या परिस्थितीला सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे
राजकीय सहभागातील तरुण वर्गाची होत चाललेली
उदासीनता. आज आम्ही पाहतो की आजचा तरुण वर्ग वैलेंटाइन
सारखा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण
बाबासाहेबांच्या राजकीय विचारांचे व्याखान असेल तर तिकड़
फिरकत पण नाही. याचे काय कारण आसवे ...? आज आंबेडकरी
चळवळ जी दुबळी आणि अशक्त झाली आहे याचे मुख्य कारण
म्हणजे राजकीय उदासीनता हेच आहे .
याचा खुप चांगला अनुभव आम्हाला नुकताच आला . रोहित
विमुला च्या प्रकरणात शासनाचा निषेध सर्व भारतातून झाला.
पण आम्हाला बाबासाहेबांच्या नागसेनवनातुन म्हणावा तसा
प्रतिसाद नाही मिळाला. बरेच मूलं हे " असले" काम करायला
तैयार होत नाहित. त्यांच्या मतानुसार हे आपले काम नाही.
काही विद्यार्थी असेही भेटले ज्यांना यायची खुप ईच्छा होती
पण त्यांच्या आईवडीलांना हे मान्य नाही. ह्या मुलांचे पालक
मुद्दाम हेतुपुर्रसर त्यांच्या मुलांना राजकारणापासून दूर ठेवायचा
प्रयत्न करतात.
यानिमित्ताने एक गोष्ठ सांगावीशी वाटते , राहुल गांधी यूथ
कोंग्रेस च्या सभेमधे राजकारण हे करियर म्हणून निवडण्याचा
सल्ला युवकांना देतो. सर्व राजकारणी लोक त्यांच्या
पाल्यांना विनासायास राजकारनाचा मार्ग मोकळा करतात.
पण आपले शिकलेले पालक हे आपल्या मुलांना छोटयातला छोटा
किव्हा मोठयातला मोठा सरकारी नौकर होण्याचा तगादा
लावतात. पण हेच पालक त्यांच्या मुलांना " सरकार" बना असे
कधीही बोलणार नाहित. सरकारी नौकर बना पण सरकार बनू
नका असेच काहीसे स्पष्ठ मत असते त्यांचे. पण रोहित
वेमुलासारख्या प्रकरणात सरकारी अधिकारी काय करू
शकतात..? कितीही मोठा सरकारी अधिकारी हा सरकारी
नौकराच असतो आणि तो सरकारच्या विरोधात जाऊ शकत
नाही हेच तथाकथित सत्य आहे. त्यांच्या अधिकाराला ही
मर्यादा आसतात. निर्विवादपने डॉ.नरेन्द्र जाधव , हर्षदीप
कांबळे सारखे निर्भिड अधिकारी याला अपवादही आहेत . पण
बाकीच्यांचे काय...? त्यांच्यासंदर्भात " आहे कुनाच योगदान ,
लाल दिव्याच्या गाडीला ..?" हे आनंद शिंदेंना विचारव लगत..!
असो...
दवाखान्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते स्मशानात
नेमकेच जळालेल्या व्यक्तिच्या आयुश्यावर राजकारानाचा कसा
प्रभाव असतो निदान एवढे तरी या पालकांनी त्यांच्या मुलांना
समजुन सांगायला पाहिजे. राजकारण जरी नाही केल तरी
राजकारनाचे समाजावर होणारे दुरागामी परिणाम तरुनांना
माहीत असायला हवे. शिवाय राजकरणनामधे प्रतिष्ठा , सन्मान
आणि पैसा ही आहे . दिल्ली च्या खासदाराला पाच लाख रुपये
महिन्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. समाजसेवा करन्याचे सर्वांत प्रभावी साधन हे राजकारण आहेच. असे असताना
राजकारनाचे वावडे असण्याचे काहीच कारण नाही पण
पालकांच्या उदासीन आणि युवकांच्या निष्क्रिय धोरणामुळ
नको ते लोक याठिकाणी जाऊन आज चळवळीची ही दशा
झाली आहे.
तरुनांणी राजकारण करण्याचे आणखी एक कारण म्हणजे आंबेडकरी
चळवळीमधे सध्यातरी हुशार आणि कट्टर राजकारणी तरुणाची
नितांत आवश्यकता आहे. आज विखुरलेली चळवळ पाहता
नवयुवकांची नवी राजकीय फळी निर्माण होने गरजेचे आहे.
हातामधे काहीही सत्ता नसताना आपल्या मगन्या आणि
प्रस्थापित सत्तेविरुद्ध निषेध रस्त्यावर दाखावने म्हणजे निव्वळ
भिक मागण्यासारखे आहे. राजकीय सत्तेच्या बाहेर रहून सत्ता
बदल घडवने म्हणजे मृगजळा सारखे आहे...
याबद्दला एका चित्रपटातले एक प्रभावी वाक्य आठवते .
" We must have in the system for changing the system. We
can't make any difference without being the part of system."
करिता युवकांच्या पालकांमधे आणि पर्यायी युवकांमधे
पुरोगामी "परिवर्तन" होने हीच आज काळाची गरज आहे .
संदर्भ : डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता खंड १९ (१४ फेब. १९२०)
प्रेमकुमार ढगे (9860303216)
premkumar.dhage@gmail.com
February 14 at 10:35pm ·
No comments:
Post a Comment