मनाच्या पानावर लिहताना उगाच भीती वाटते
तू होकार देशील.? कबूल करशील तुझ्या निःशब्द प्रेमाला
की नकार असेल माझ्या गैरसमजुती प्रेमाचा
का आणि कुठवर दाबणार आहेस तुझ्या अव्यक्त आणि असाह्य भावनांना..?
किती कुचकामी प्रयत्न असतेस सगळं आलबेल आहे हे दाखवण्याचा..!
का मन मारतेस आणि स्वतःला आवर घालतेस .?
तुझे आयुष्य आणि तुझे स्वतःचे निर्णय असताना..?
बाळगू नको अवाजवी भीती ह्या हलकट दुनियेची...!
तुझ्या तीळ तीळ मरण्याचा मनमुराद आनंदच लुटणार ती!
जगाची काळजी करत बसण्यात जगण्यातला आनंद नको ग हरवून घेऊ..
ऐक एकदा तुझ्या हृदयाचं , आनं ठरव जगायचं की मरून जाऊ..?
कोंडू नकोस भावना ,त्यांना मुक्त हुंदडू दे
होऊन निर्भीड स्वैर फिरू दे बालिश हृदयाला
घे ह्या गुलाबी आणि रुपेरी जगाचा आस्वाद
प्रेम करायला एकच जन्म आहे बाकी सगळे भ्रम आणि आभास..!
हिम्मत असेल निभावण्याची तरच तसदी घे नजर भिडवण्याची...
नाहीतर गप्प गुमान वाट बघ घरच्यांनी बार उडवून देण्याची..!
~ ~ प्रेशाढ
No comments:
Post a Comment