Thursday, 31 March 2016

रिस्की जर्नी भाग 2

एवढ्या साऱ्या लोकांमधे एक चेहरा ओळखीचा वाटत होता. कोण असाव? ज़रा जवळ जाऊन बघितल तर माझा मित्र कृष्णा होता.तो सुद्धा चार दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे त्याच्या गावाकड आलेला होता. आता आम्ही दोघे सोबतच परत औरंगाबादला येणार होतो.

मी थोड़ा उशीराच आलो होतो. कृष्णा माझ्या आगोदरच खुप वेळापूर्वी आलेला होता. तिकिट काढले. 'प्रभूच्या' कृपेने रेलवेचे तिकिट ₹55 वरुण ₹65 वर आले होते. मानवत रोड ते औरंगाबाद 'तपोवन एक्सप्रेस' 12 वाजेपर्यंत येणार होती. इथ आमच्या आयुष्याचे बारा वाजलेत आणि ' तपोवन' सुद्धा बारालाच होती हा केवळ योगायोग होता. असो...

शिट्टी वाजली. ती शिट्टी नाय ,  रेलवेची. जिवात जिव आला. चला म्हणजे आमचा प्रवास आता सुरु होणार होता. पण हे काय...! च्या आईला रेलवेमधे तर  पाय ठेवायला पण जागा नाही. हिटलरने 'मरणाच्या घरात' जसे लोक कोंबले होते अगदी त्याच प्रमाने लोक  रेलवेत होते. एकमेकांवर कुरघोडी खेळल्यासारखे. एकाला दुसऱ्या जीवाची पर्वा नाही. जो तो जमेल तसा कोपरा धरून उभा राहिलेला. यात रिजर्वेशन केलेल्या लोकांना तर एकदम दिल्ली जिंकल्या सारख वाटल नाही तर नवलच..!

" यार ढगे, लैय गर्दी  आहे बे गाडीला " कृष्णाचे अवसान संपले गर्दी  बघून. कसे बसे एका डब्ब्यामधे चढलो . नाइलाजाने उभे राहूनच जावे लागणार होते. सेलु मधे गाडी थांबली. तपोवन एक्सप्रेस फ़क्त तालुक्याच्या ठिकाणीच थांबते. सेलुवरुण एक म्हातारा आणि एक म्हातारी एका तरुण मुलीला घेउन चढ़ले. सोबत एक मोठी थैली होती. तिच्यामधे काहीतरी धान्य असायला पाहिले. ते सगळे आता जागा नसल्यामुळ वाटेतच पसारा घालून बसले. दरावाज्याची सगळी कोंडी केली त्यांनी. ट्रेनच्या मधल्या स्पेस मधून आता कुणालाही जाता येत नव्हते. शेवटी एक पानी विकणार आला आणि त्याने संगीतल्यामूळे ती वृद्ध स्त्री तिच्या सोबत च्या मुलीला घेउन दरवाज्याच्या बाजूने बसली , आणि मधला स्पेस मोकळा झाला. आता येणाऱ्या जाणाऱ्याला काही अड़चन नव्हती.

व्हाट्स अप चे स्टेटस चेक करन्यासाठी इन्टरनेट चालू केल. आमच्या ग्रुप मधे अविनाश सर्वाना आपापले लोकेशन टाकायला सांगत होता. मी सुद्धा माझे लोकेशन पोस्ट केले , मला वाटते मी परतुरच्या जवळपास असायला पाहिजे. व्हाट्स अप खेळन्याच्या नादात बैटरी लो झाली. आता काय करायचे . कृष्णाकडून चार्जर घेतले आणि त्या वृद्ध स्त्री च्या समोर एक इलेक्ट्रिक बोर्ड होता. तिथे चार्जिंगची सोय होती. मग मी ट्याबलेट चार्जिंगला लाऊन त्याला तसेच वर शर्टच्या खिशात ठेउन त्या वृद्ध स्त्री च्या एकदम विरुद्ध बाजुला उभा राहिलो. मधल्या स्पेस मधुन जाणारा प्रतेकजन मला बघत होता. आणि मी करत असलेल्या "स्टाइलिश" चार्जिंगला पाहून हसत होता.

"भेळ घ्या भेळ... मसालेदार भेळ"  असा आवाज करत मध्यम  वयातली एक बाई आली . माझ्या समोर बसलेल्या वृद्ध स्त्री ने दहा रुपयाची भेळ घेतली. पण तीच्या सोबत असलेली तरुण मुलगी , कदाचित तिचे लग्न झालेले असावे कारण ती साडीवरती होती, काही केल्या भेळ खात  नव्हती . सोबतची आजी तिला भेळ खायला आग्रह करत होती. पण ती काही खात नव्हती. माझ्या लक्षात आले की , ती माझ्यामुळे भेळ खात नव्हती. कदाचित मी समोर थांबल्यामुळे तिला कम्फर्ट वाटत नसाव. मग मी माझ्या चार्जिंगचा खेळ आटोपला. कृष्णाला चार्जर देऊन मी त्याच्याच बाजुला बसलो . आता ती आजी एका दरवाज्यात आणि आम्ही दुसऱ्या दरवाज्यात आशाप्रकारे दोन्ही दरवाजे एंगेज झाले होते. आता मात्र "ती" भेळ खात होती म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. मी तिच्याकडे बघतोय हे लक्षात आल्यानंतर तिने आपली साडी आणि तिच्यावर असलेला रुमाल व्यवस्थीत केला.

"चल रे चिकन्या चल काढ लवकर" कृष्णाकड त्याचा गालला चिमटा घेत एक तृतीयपंथी आला. कृष्णान क्षणाचाहि विलंब न करता दहा रूपये देऊन टाकले. मलापण "चल रे ला जल्दी" अशी तंबी दिली. मी म्हणालो " चेंज नाही " त्यावर " ला ना,  मेरे पास है चेंज , मै देती तेरेको हजार पाचसो की चेंज. " तीचा/ त्याचा  आवाज वाढला.
मी पाच रुपये काढून दिले. "मेरे पास चेंज नहीं है इसका मतलब मेरे पास नोट भी नहीं है" अस म्हणताच सगळे सहप्रवासी हसले . आणि ती/ तो  नाक मुरडत गेला/गेली.  च्या आईला मला पण " चिकन्या "  म्हटली असती/ता  तर मी दहा नाहि विस रुपये दीले असते. पण इथ सुद्धा आमची अवहेलना.पण मी कृष्णा एवढा चिकना नाही ना... असो....

पाहता पाहता औरंगाबाद स्टेशन आले. खाली उतरलो. स्टेशन वर कृष्णाला चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली . पण समोर लिंबू शरबत बघून विचार बदलला. कृष्णान बिल दिले. " कृष्णा तुला जगातला सर्वांत सुखी माणूस दाखऊ का..?" मी म्हणालो. "कुठय साहेब.?"  कृष्णा उत्तरला. "ते बघ तिकड़" बोटाने इशारा करत त्याला मी दाखवल. एकजन  बिचारा स्टेशनच्या बाहेर बांधलेल्या चौकड्यावर दोन वाजता भर उन्हात, हिरव्यागार गवतात शांत  झोपला होता. खाली त्याची बैग , चप्पल आणि बाटली दिसत होती . बाटली कोणती असेल हे ओळखून घ्या.

ऑटोमधे दोघेपन बसलो. कृष्णा बसस्टैंड आणि मी बाबा पम्पावर उतरणार होतो. रेलवे स्टेशन ते बाबा पेट्रोल पम्प दहा रुपये तिकिट आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे .पण रिक्शावाला मला पंधरा रुपये मागत होता. शेवटी कृष्णाच म्हणाला "चला मी देतो त्याचे पाच रुपये," मला नाही पटली ही गोष्ठ. ह्या सगळ्या गटमटीत अचानक डोळ्यासमोर अंधार झाला. माझ्या उजव्या पायावारून मागुन येणाऱ्या दुसऱ्या ऑटोरिक्षाचे  चाक गेले हे समजायला मला बराच वेळ लागला . मागे वळून बघीतले तर कृष्णाचा ऑटो केंव्हाच दूर गेला होता.सिग्नल सुटल्याने घाइमधे माझ्या पायावरुण ऑटोरिक्षाचे चाक गेले होते. पाचच मिनीटात पाय सुजला. आता मात्र आग सहन होत नव्हती. उड्डान पुलाखाली उभ्या असलेल्या ट्राफिक पोलिसांच्या जवळ उभा राहून सिटी बसची वाट पाहत थांबलो. पोलिसांची परवानगी घेउन त्यांचेच पाणी पिलो. इतक्यात समोरून एक , बी.एम.डब्लू. गेली , लाल रंगाचा स्लीवलेस टॉप डोळ्यावर चस्मा आणि मोकळे केस असलेली बड्या बापाची मुलगी काळ्या रंगाच्या काचेतुनही  माझ्या नजरेतून सुटली नाही. थोड्या वेळासाठी का होईना पण पायाचे दू:ख विसरलो. असो...

शेवटी बस आली . पाठीवरचे ओझे आणि सुजलेला पाय घेउन मी आता उभ्याने प्रवास करू शकत नव्हतो. सिग्नल लागलेला पाहून मी बस कड़े गेलो पण इतक्यात त्यांना ग्रीन सिग्नल भेटला. मग मी त्यांच्याकड आणि तिकडचे सगळे वाहन माझ्याकड येत होते. " ऐ मारायच आहे का रे ..? समोर येउन थांब की"  बस कंडक्टर चवताळला. पण माझा नाइलाज होता. मधे चढ़ल्यानंतर त्याला  बरे वाटावे म्हणून "सॉरी"  बोललो. त्यानेही,  "नाही यार हे चांगल नाही . तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही प्रॉब्लम होउ शकतो" अस बोलून  सहानभूती दाखवली. पण त्याला काय माहीत मी असली " रिस्की जर्नी " खुप वेळा केली आहे. घरी गेल्यावर आईला मात्र पायावर हळद घालन्याचे रीकामे काम लागणार  होते....

premkumardhage.blogspot.com
9860303216

Saturday, 19 March 2016

सरकार आणि 'सरकारी बाबा '

खुप प्रयत्न केले पण माझी म्यागी दोन मिनिटांत कधीच तैयार झाली नाही. जाहिरात करनाऱ्यांचा दावा सपशेल खोटा ठरला. तरी सुद्धा माझे म्यागी वरती खुपच प्रेम आहे म्हणून येवढी साधी चुक माफ़. पण आमची खुशी काही दुष्ठ लोकांना नाही खपली. आली की नुडल्स वर बंदी. का तर म्हणे 'शीसे' चे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त. आता हे प्रमाण खरच जास्त आहे का नाही हे काही आम्हाला माहीत नाही . हे कोण तपासत..? प्रयोगशाळा . प्रयोगशाळा सरकारची. मग काय सरकार सांगेल तसे 'शिसे'  वाढू शकते आणि कमी ही होउ शकते. जिसकी लाठी उसकी भैंस...!...असो.

पण सरकार ने म्यागी बंद केली खर पण आमचा काय ? आमचा विचार नाही केला सरकारने. आता आम्ही काय खानार नाश्त्याला..? पण आमचे सरकार खुप काळजी घेते आमची. बाबा रामदेवला लॉंच केल. बाबांचे नुडल्स आले आता. बाबाचे नुड्ल्स आले , आणि आमची म्यागी सरकारीचे आणि कोर्ट कचरीचे खेटे करूणच परेशान झाली बिचारी. बाकीच्या सगळ्या देशात म्यागी ' सेफ' आहे आस गळा ताणून तो फुटायची वेळ आली पण आमच्या सरकार ला काही समजत नाहीये. पण बाबा रामदेव ने डायरेक्ट 'हेड ऑफ़ द सरकार'  सोबत लॉबी लावली . आता त्यांच्या पुढे जाण्याची कुणाची बिशाद...?

आता आम्हाला दारु प्यायची सवय. दारु म्हणजे सॉफ्ट ड्रिंक आमची फेवरेट बियर हो. माल्ल्या साहेबांची किंगफ़िशर तर आमची ख़ास फरमाइश. पण मी आगोदरच म्हटलो आमची खुशी लोकांना बघवत नाही. बिचरा  माल्ल्या सरकारलाच चुना लाऊन पळाला . तो पळाला हो, पण आमचे काय ..? आम्हाला बेवारस करुण गेला. आता आम्हाला कोण बियर पाजनार. म्यागी सारख किंगफ़िशर सुद्धा बंद पडणार . आता कस होणार आमच
.? कोण करणार आमची फरमाइश पूर्ण...? पण काळयाकुट्ट अंधारात प्रकाशाची एखादी किरन शलाका यावी तसे आमची "सरकारी बाबा"  पुन्हा आले , पतंजली बियर घेउन. चला बर झाल. सुंठेवाचुन खोकला गेला.

जेंव्हा जेंव्हा देशात असली आनिबानी आली तेंव्हा रामदेव बाबांना देशाची खुपच काळजी. बाबांना देशाची आणि देशाला बाबांची. म्हणून तर बाबांना त्यांच्या ट्रस्ट साठी नागपुर मधे फ़ूड पार्क उभारनयासाठी 340 हेक्टर , काटोल मधे संत्रा प्रक्रियेसाठी 200 एकर जागा देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. काटोलमधील संत्रा प्रकल्प 500 कोटींचा आहे आणि नागपूर मधील फ़ूडपार्क 2000 कोटि रुपयांचा आहे. प्रस्थापित सरकारने पहिली बार एवढी तत्परता दाखवली आहे . देशाचे अभिनंदन. म्हणजे बाबांच्या म्यागी , पतंजली च्यवंप्राश, पतंजली शुद्ध घी, पतंजली आवळा चूर्ण , मुरब्बा , आयुर्वेदिक टॉनिक, तडका मसला , दही,  डोक्याला शांपू , तेल, प्यायला बियर,  आंघोळीची साबन  याबरोबरच आता , जडीबूटी वर प्रक्रिया उद्द्योग सुद्धा पहायला भेटणार. काही दिवसांनी आमचे " सरकारी बाबांचे " पतंजली ट्रस्ट अंबानीपेक्षा ही देशात श्रीमंत असेल याबद्दल शंका नाही. चला देशाच्या प्रगतीत तेवढाच हातभार. आमचे बाबा म्हणजे फ़क्त योगगुरुच नाही तर  सर्वकश आणि सर्वसमावेशक आहेत . असो...

पण प्रस्थापित सरकार जेवढे पतंजली वर "फीदा " झाले आहे तेवढी तत्परता आपन इतरत्र ठिकानी सुद्धा दाखवावी . आपन रोहित वेमुलाच्या आत्महतेनंतर पाच दिवसांनी बोलता. आमचा मुस्लिम बांधवाने गाईचे मांस घरात ठेवल्याच्या शंशयावरुण म्हणून मारल्या जातो आणि याबद्दल सुद्धा आपन ब्र सुद्धा काढत नाहित.  आजही महिला पाहिजे तेवढ्या निर्भीड झाल्या नाहित. रात्री अपरात्री त्या मोकळ्या आणि स्वतंत्र भावनेने फिरू शकत नाहित. शेतकरी आत्महत्ते चे प्रमाण वरचेवर वाढतच आहे. आमच्या मराठा समाजातील गरीब विद्यार्थी आरक्षानासाठी आजुनही घसा कोरडा करत आहेत. यांच्यावरही थोड लक्ष दया आणि मग म्हणा " सबका साथ..सबका विकास.."

जय भीम..

सौजन्य: लोकसत्ता 20 फेब. 2016
premkumar.dhage@gmail.com
(9860303216)

Wednesday, 16 March 2016

युवक आणि राजकारण...

आज 14 फेब्रुवारी युवकांचा प्रेम दिवस... हल्ली फार सुचतय ह्या
बहुजन नवयुवकांना अस काहीतरी , नाहीतर पेशव्यांच्या काळात
प्रेम तर सोडाच पण एक शब्द ही व्यक्त करण्याची मुभा नव्हती.

14 फेब्रुवारी च्या निमित्ताने बाबासाहेबांनी मूकनायक च्या
आग्रलेखात केलेले उहापोह थोडक्यात सांगत आहे . यामधे
बाबासाहेब मन्हातात की आम्हाला इंग्रजांचे "सुराज्य"  हे
राष्ट्रिय सभेच्या " स्वराज्या" पेक्षा अधिक प्रिय आहे .
याचे कारन असे की , ततकालीन समाजव्यवस्थेमधे बहुजनाची जी
हाल अपेस्ठा होती ती सर्वपरिचित आहेच. या असल्या जीर्ण
आणि सनातनी वृत्तिनी पछाडलेल्या लोकाना इंग्रजांनी देलेली
समानतेचि थोडीशी संधी सुधा बुडत्याला काडीचा आधारच
नव्हे का..? इंग्रजान्कडून मिळालेली सरकारी नौकऱ्यातिल संधी
, शिक्षणातील प्रार्थमिक व् सक्तीचे शिक्षण ह्या
उदारमतवादी सुधारना , शेतकऱ्याविशईचे उदार धोरण,
लश्कारातिल संधी, कायदेमंडळातिल संधी , आमली
पदार्थावरील कर वाढून त्याला आळा घालने आशा अनेक गोष्ठी
ह्या बहुजनाच्या हिताच्या होत्या . आणि स्वराज्यानंतर ह्या
सर्व गोष्ठीची काही शाश्वती नसल्याकारनान बाबासाहेब
स्वराज्याचा पुरस्कार इतक्या सहजी करत नाहित आणि हे अगदी
स्वाभाविकच आहे . असो...

आज स्वराज्याची फळं आपण जवळपास सत्तर वर्ष चाखत आहोत
आणि आज परत आपल्यावर पहिल्यासारखीच परिस्थिती
उदभवलि आहे . बहुजनावर होनारे अन्याय , अत्याचार , त्यांच्या
स्त्रिंयांची होणारी बेअब्रु आणि कत्तल , बहुजन विद्यार्थ्याची
होणारी फरफट बघीतली की आज परत इंग्रजच बरे होते असे
वाटायला लागले आहे ..

आजच्या ह्या परिस्थितीला सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे
राजकीय सहभागातील तरुण वर्गाची होत चाललेली
उदासीनता. आज आम्ही पाहतो की आजचा तरुण वर्ग वैलेंटाइन
सारखा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण
बाबासाहेबांच्या राजकीय विचारांचे व्याखान असेल तर तिकड़
फिरकत पण नाही. याचे काय कारण आसवे ...? आज आंबेडकरी
चळवळ जी दुबळी आणि अशक्त झाली आहे याचे मुख्य कारण
म्हणजे राजकीय उदासीनता हेच आहे .
याचा खुप चांगला अनुभव आम्हाला नुकताच आला . रोहित
विमुला च्या प्रकरणात शासनाचा निषेध सर्व भारतातून झाला.
पण आम्हाला बाबासाहेबांच्या नागसेनवनातुन म्हणावा तसा
प्रतिसाद नाही मिळाला. बरेच मूलं हे " असले" काम करायला
तैयार होत नाहित. त्यांच्या मतानुसार हे आपले काम नाही.
काही विद्यार्थी असेही भेटले ज्यांना यायची खुप ईच्छा होती
पण त्यांच्या आईवडीलांना हे मान्य नाही. ह्या मुलांचे पालक
मुद्दाम हेतुपुर्रसर त्यांच्या मुलांना राजकारणापासून दूर ठेवायचा
प्रयत्न करतात.

यानिमित्ताने एक गोष्ठ सांगावीशी वाटते , राहुल गांधी यूथ
कोंग्रेस च्या सभेमधे राजकारण हे करियर म्हणून निवडण्याचा
सल्ला युवकांना देतो. सर्व राजकारणी लोक त्यांच्या
पाल्यांना विनासायास राजकारनाचा मार्ग मोकळा करतात.
पण आपले शिकलेले पालक हे आपल्या मुलांना छोटयातला छोटा
किव्हा मोठयातला मोठा सरकारी नौकर होण्याचा तगादा
लावतात. पण हेच पालक त्यांच्या मुलांना " सरकार" बना असे
कधीही बोलणार नाहित. सरकारी नौकर बना पण सरकार बनू
नका असेच काहीसे स्पष्ठ मत असते त्यांचे. पण रोहित
वेमुलासारख्या प्रकरणात सरकारी अधिकारी काय करू
शकतात..? कितीही मोठा सरकारी अधिकारी हा सरकारी
नौकराच असतो आणि तो सरकारच्या विरोधात जाऊ शकत
नाही हेच तथाकथित सत्य आहे. त्यांच्या अधिकाराला ही
मर्यादा आसतात. निर्विवादपने डॉ.नरेन्द्र जाधव , हर्षदीप
कांबळे सारखे निर्भिड अधिकारी याला अपवादही आहेत . पण
बाकीच्यांचे काय...? त्यांच्यासंदर्भात " आहे कुनाच योगदान ,
लाल दिव्याच्या गाडीला ..?" हे आनंद शिंदेंना विचारव लगत..!
असो...

दवाखान्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते स्मशानात
नेमकेच जळालेल्या व्यक्तिच्या आयुश्यावर राजकारानाचा कसा
प्रभाव असतो निदान एवढे तरी या पालकांनी त्यांच्या मुलांना
समजुन सांगायला पाहिजे. राजकारण जरी नाही केल तरी
राजकारनाचे समाजावर होणारे दुरागामी परिणाम तरुनांना
माहीत असायला हवे. शिवाय राजकरणनामधे प्रतिष्ठा , सन्मान
आणि पैसा ही आहे . दिल्ली च्या खासदाराला पाच लाख रुपये
महिन्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.  समाजसेवा करन्याचे सर्वांत प्रभावी साधन हे राजकारण आहेच. असे असताना
राजकारनाचे वावडे असण्याचे काहीच कारण नाही पण
पालकांच्या उदासीन आणि युवकांच्या निष्क्रिय धोरणामुळ
नको ते लोक याठिकाणी जाऊन आज चळवळीची ही दशा
झाली आहे.

तरुनांणी राजकारण करण्याचे आणखी एक कारण म्हणजे आंबेडकरी
चळवळीमधे सध्यातरी हुशार आणि कट्टर राजकारणी तरुणाची
नितांत आवश्यकता आहे. आज विखुरलेली चळवळ पाहता
नवयुवकांची नवी राजकीय फळी निर्माण होने गरजेचे आहे.
हातामधे काहीही सत्ता नसताना आपल्या मगन्या आणि
प्रस्थापित सत्तेविरुद्ध निषेध रस्त्यावर दाखावने म्हणजे निव्वळ
भिक मागण्यासारखे आहे. राजकीय सत्तेच्या बाहेर रहून सत्ता
बदल घडवने म्हणजे मृगजळा सारखे आहे...
याबद्दला एका चित्रपटातले एक प्रभावी वाक्य आठवते .
" We must have in the system for changing the system. We
can't make any difference without being the part of system."

करिता युवकांच्या पालकांमधे आणि पर्यायी युवकांमधे
पुरोगामी "परिवर्तन" होने हीच आज काळाची गरज आहे .
संदर्भ : डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता खंड १९ (१४ फेब. १९२०)
प्रेमकुमार ढगे (9860303216)
premkumar.dhage@gmail.com
February 14 at 10:35pm ·

Tuesday, 15 March 2016

विद्यापीठ नामविस्तार दिन...

१५ जानेवारी २०१६

काल १४ जानेवारी .  समस्त दलित आणि बहुजनानाच्या आयुश्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस. कारण याच दिवशी मराठवाडा विद्यापिठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात आले होते. किंबहुना नाव देन्याला सरकारला भाग पाडले होते. कारन जवळपास सतरा वर्ष चाललेल्या या लढ्यात शहीद झालेल्या २४ अनुयायांची नावे  मी वाचली आहेत. एका विद्यापिठाला नाव देण्यासाठी येवढ मोठ्ठ राजकारण , यावारुनाच तत्कालीन शाशन बाबासाहेबांबद्दल  किती आग्रही आणि जबाबदार होते याची जाणीव होते.. असो....

बाबासाहेबांना आणि शहीदस्तंभाला वंदन करण्यासाठी विद्यापीठ गेट  आलो. रस्त्यांन चालताना पोलिस व्यवस्था ही चोख होती हे अविनाश सोबत त्याच्या कार मधे दोन तास ट्राफिक मधे अडकल्या नंतर कळाले. अगदी pes इंजीनियरिंग कॉलेज पासूनच रस्त्याला जत्रेचे रूप आले होते.  शुभेछांचे ब्यानर झळकत होते. प्रेतेकजन नामंताराचे श्रेय लाटायाला बसला होता. बारा पक्षाचे बारा ब्यानर...  ज्याला नामांतर लढ्याशी तीळमात्र संबंध नाही असे अनेक गरीब लोक रस्त्यांन त्यांचा पोटापाण्याचा प्रश्नाची सोय करण्यासाठी कट्टा मांडून बसले होते... असो... माझ्या भिमाची पुण्याई...

नामंताराच्या  "एकत्र "  आणि  " एकसंध "  लाढ्याच्या वेळेस दुर्दवाने मी लहान होतो.. पण मी मोठा होई पर्यन्त सगळे तुकडे झालेले पाहतो आहे. हे आहे माझ सुदैव.. आणि ही आहे बाबासाहेबांची मला वारस हक्काने मिळालेली चळवळ. असो... नशीबच माझ....

रात्रि आठवले साहेबांची सभा मुद्दाम ऐकण्यासाठी त्यांच्या स्टाँल वर गेलो . तमाम जनेतेचा भिमसागर उचंबळून आलेला. एक वेगळीच हौस... एक वेगळाच जल्लोश... जय भीम चे नारे .... ग्रुपने चाललेले तरुनाइचे फोटोशेशन... कधीही न बघितलेल्या सुन्दर सुन्दर मुली.... वेगवेगळया व्यासपीठावर जमलेले , आपल्या बालिश आणि छपरी शेर शायरी ने लोकाना पेट्वानारे शाहिर आणि गायन पार्टी.... गर्दीचा फायदा घेउन एकमेकांशी लगट करणारे एखादे प्रेमी युगुल.... बाबासाहेबांच्या आयुष्यावर आणि तत्वद्न्यानावर  विकायला आलेली पुस्तके बघून डोळ्याचे पारने फिटले...

आणि अता स्टेज वर नेत्यांचे भाषण सुरु झाले. हरीभाऊ बागडे, रावसाहेब दानवे , आणि चंद्रकांत खैरे साहेब प्रमुख अतिथि होते आठवले साहेबांच्या स्टेज वर. सर्वप्रथम खैरे साहेब आले . आणि नामंताराला आमचा विरोध नसून कशा प्रकारे सपोर्ट होता हे सांगण्याचा बोचरा प्रयत्न करत होते. त्यांच्यानंतर लगेचच विधानसभा अधक्ष्य नाना उर्फ़ बागडे साहेब आले . त्यानीच सर्व प्रथम pes सोसाइटी ला तिन कोटि रुपये दान केल्याची आठवान करून दिली. दानवे साहेबानी ही नामंतारचे श्रेय लाटनयाचा अयशश्वी प्रयत्न केलाच. अहो नामंताराचे श्रेय आम्ही सर्वानी आधीच वाटुन घेतले आहे , तुम्हाला काहीच ठेवले नहीं. हे एवढे सारे ब्यानर दिसत नाहित का तुम्हाला ??? येवढी साधी गोष्ठ सुद्धा समजत नाही या नेत्यांन्ना.... असो....

सगळे स्टेज सोडून आम्ही आठावाले साहेबांच्या स्टेज कड़े आलो होतो. पण आठावाले साहेबांच्या भाषना बद्दल मुद्दाम टाळत आहे..

परिवर्तनवादी जय भीम

प्रेमकुमार ढगे(९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...