Saturday, 16 April 2016

मुघल ते मोदी...

तसा बसचा प्रवास नेहमीचाच , पण एखादा लेख लिहावा अशी घटना बसमधे कमीच घडते.  आजही माझी बोटे मोबाइलच्या कीपैड वर फिरुण लेख तैयार व्हावा अशी घटना घडली.  बसमधे वडगाव फाट्यावरुण बसलो. फारशी गर्दी नव्हती. पण पुढे मोहटादेवी स्टॉप वर बरेच प्रावाशी चढ़ले. मी एकटाच होतो विंडो सिट पकडून बसलेलो.  इतक्यात बस कंडक्टर जवळ आला. मील कॉर्नरचे टिकिट काढले. या वेळी बसचे टिकिट आणखी एक रुपयाने वाढले होते. यामुळेच की काय पन बरेच लोक कंफ्यूज होऊन त्याला सुटे पैसे वापस मागत होते. एक जनावर तो चांगलाच खेकासला. "  साहब पाचसोकी नोट दी आपने , मैने आपको चारसो आस्सी रुपये वापिस दिए . फिर भी आप एक रुपया वापिस मांग रहे हो , देखो जरा टिकिट को , बीस रुपया हो गया है टिकिट. " हे ऐकून मला थोड हसायला आल. पाचशे रुपयाचा उल्लेख करुण एक रुपया परत मागणाऱ्या त्या माणसाची इभ्रत  कंडक्टरने बस मधे सार्वजनीक केली.

मोरे चौकावर सिंगल बेल वाजली . बस थांबली आणि परत काही लोक बस मधे चढले. " ये पोरा उचल ती थैली "  असा बोलून एक साठीच्या वयातला वृद्ध माझ्या जवळ आला. मी लगेच माझी सैग उचलली. माझ्या कॉलेज बैगला थैली म्हटलेले मला पचले नाही . मी काहीतरी बोलणार इतक्यात  , " अरे बैग उठा भाई साहब को बैठने दे. दिखता नहीं क्या बड़े साहब आये है...!  " अस बोलून माझ्या शेजारिच उभा असलेल्या कंडक्टरने त्याची फिरकी घेतली.  पण तो वृद्ध सुद्धा काही कमी नव्हता . " साहेब , गावाकडच्या बिगारी माणसाला साहेब म्हणू नका. वावरात काम करणारे माणस हाईत आम्ही."  डोक्यावर गाँधी टोपी , गळ्यात रुमाल , नेहरु शर्ट आणि धोतर नेसलेला तो वृद्ध बघितला की कोणीही सांगेल , हा खेडे गावातून आलेला माणूस आहे .  उजव्या हातात राखी सारखा कोणता तरी गंडा दोरा घातलेला आणि डाव्या हातात वाटर प्रूप घडी होती , जी त्याच्या गावठी लुकला अजिबात सूट होत नव्हती. पण त्याची घडी बघून मला माझ्या घडीची आठवन झाली जिला मी घरीच विसरून आलो होतो.... असो....

बराच वेळ बस पुढे आली, बाजुला पडित असलेली छावनी परिषदेची जमीन बघून तो वृद्ध व्यक्ति मला बोलला , " ही सगळी जमीन शेतकऱ्याची  असल नाही का ..?" 

मी:  पडित जमीन शेतकऱ्याची असती व्हय  बाबा ...?

वृद्ध : आर मग कुणाची हाय ?

मी : जी जमीन शेतकऱ्याची नसती ती सरकारची असती बाबा...

वृद्ध: आर लेका ही जमीन मुघल काळातली हाय. आदिलशहा , निजामशहा जी जहागीरदारी होती ही सगळी. १९४७ पासून सगळ आलय हे महाराष्ट्रात.( कदाचित बाबांना १७ सप्टे. १९४८ म्हणायच असाव)

मी : बाबा तुम्हाला मुघलांचा काळ आठवतो का ..?

वृद्ध : नाही र , आम्ही तवा लहान होतु, १९५१/५२.

मी : मग तुम्हाला इंदिरा गांधी चांगली समजत असेल ..?

वृद्ध : हो, ती तर १९८४ ला मेली , म्हणजे हे सोळा आणि ते सोळा  २६  वर्षे जुनी गोष्ठ आहे . ( बाबांचा हिशोब चुकला होता..)
मी : बाबा लैय चांगली होती म्हण ती बाई..!
वृद्ध:  हो रे पोरा ... ! गोर गरीबायला लैय केल तिन. चार चार एकर वावरं देले तिने लोकांन्ना सीलिंग च्या जमीनी.

मी: बाबा , तिन तर आनिबानी लावली होती म्हन सगळ्या देशात ..!

वृद्ध: आर त्यांन काय होतया ..? ( बहुतेक बाबाला आनिबानिचे दुष्परिणाम माहिती नसावे.)

मी : बर बाबा , तिला मारला कामून आन तेबी सिकाच्या  लोकांन्न..??
वृद्ध : आरं ते पंजाब येगळा मागित होते लेका..!
मी : मग त्यान काय होतय..? द्यायचा की येगळा. पाकिस्तान नाही का देला..?
वृद्ध: आर वा !! उद्या तुम्ही औरंगाबाद मागतान ,  आमचे लोक बीडाला येगळ मागातेन , मग काय नुसते तुकडेच करायचेत का ..? (बाबा चिडले.)

मी: पण काय बाबा, मेली ना ती याच्यामुळ...

बाबांनि यावर मौन ठेवले. ते काहीच बोलले नाहित. मला त्यांच्याकडून " ऑपरेशन ब्लू स्टार " बद्दल ऐकायचे होते , पण त्यांना याबद्दल फारस माहिती नसाव. बाबाच्या बोलन्यावारून ते बीड जिल्ह्याचे होते हे मला समजल होत.

मी: बाबा तुम्ही कॉंग्रेस आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे बीजेपी हे दोन्ही सरकारे पाहिलित. कोणत चांगल होत हो दोन्हिपैकि..?
वृद्ध: आर कशाच लेका , आम्हाला काहीबी फरक नाही पडला . आम्ही आजबी काम केल तरच भाकरी खायला भेटती.

अत्यंत हीन आणि तिरस्कृत नजरेतुन बाबांनि संवादफेकी करत सरकारवरची नाराजी व्यक्त केलि.

मी : बाबा , बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या लैय होत्यात म्हन..?
माझ्या ह्या प्रश्नान बाबा एकदम हसले . जे मला अगदी अनपेक्षीत होत.

वृद्ध: आर कशाच ..?  आमच्याकड दावाखाण्यात जरी माणूस मेल तरी आत्महत्या केलि म्हनतेत. (आस बोलून बाबा जोरात खळखळून हसले. ) तुला सांगतो आमच्या के**  मधे गाव आहे  ( गावाचे नाव मुद्दाम टाळत आहे ) , तिथ  एकजन बिचारा घरात पावसमधी करंट लागुन माणूस मेला. पण लोकांनीआत्महत्या केलि म्हणून पंचनामा केला आणि दोन लाख रुपये भेटले. एक जनान घरातल्या भांडनातुन बायकु आनी लेकाच्या रागराग ' रोगर'  (कीटनाशक) पेल. त्येलापण पंचनामा करुण आत्महत्या केलि म्हणले. पाच लाख भेटले त्याला. काही नाही कुनिपन मेल की के** च्या पुढाऱ्याकड जायच...  झालाच मग काम !

मी : ठीक आहे , बाबा काही  असतील ही तसे पण बाकीचे काय त्यांच्यावर तरी  कर्जबाजारीपणामुळ ही वेळ आली असेल ना..?

वृद्ध: आर भाऊ कुनाल जिव जास्त झालाय इथ ..? कोण रिकाम हाये मारायला..?

मी: नाना पाटेकर तर तुमच्या बीड मधे येउन शेतकऱ्याना पैसा वाटतोय ..!

वृद्ध: फुकटचा पैसा कुणाला नकु हाय का...?

अस बोलून बाबा परत जोराने हसायला लागले . बाबांचे  अस्ठगंध लावलेले कपाळ आणि तंबाखू खाऊन पिवळे झालेले दातं स्पष्ठ दिसू लागले. डोळे अर्धवट झाकून शेव केलेली पण थोडीफार दिसणारी पांढरी दाढी बघून बाबा खुपच मिश्किल वाटत होते. हा सगळा प्रकार आपले सहप्रवाशी पाहत आहेत हे बघून बाबांनी स्वत: ला सावरल.

आमच संभाषन बाजुलाच उभा राहून  ऐकनारी निळ्या टॉपवर फिट्ट जींस , फ्रेमलेस चश्मा, हातात सोनेरी रंगाची घडी आणि तोंडाला   स्कार्फ बांधलेली मुलगी बघितली आणि माझ्या पहिल्या लेखातील नायीका  " मीनाक्षी" ची आठवन झाली. असो...

बाबा मात्र शेतकऱ्याच्या आत्महत्तेबद्दल आपले मत बदलायला तैयार नव्हते. एवढ्या गंभीर विषयावर बाबा एवढ्या सहज आणि खिल्ली उडवीत बोलत होते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. बेल वाजली " बाबा"  आला . बाबाला बाबावरच उतरायचे होते . अत्यंत घाईघाईत बाबा खाली उतरले. हातात लाल रंगाची " थैली "  पायात खेटरं घातलेले बाबा खाली उतरले . खिडकितुनच मी त्यांना हात दाखवला ,  जशी जशी बस दूर जात होती बाबाची प्रतिमा धुसत होत होती.

बाबानी व्यक्त केलेल्या शासनाचा सामान्य माणसावर न होणारा बदल आणि शेतकऱ्याच्या जीवनावरच्या भाषनामुळे बाबा आज माझ्या लेखाचे नायक होते ......
premkumardhage.blogspot.com
9860303216

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...