Thursday, 31 December 2020

तो कहना..!

लो आ गया एक और नया साल इंसानियत की धज्जियाँ उड़ाने

इस साल कोई नाबालिक का बलात्कार नही हुआ, तो कहना

कीसी दलित के साथ भेदभाव नही हुआ,तो कहना!


आ गया नया साल पूँजीपतियों की जेबें भरने

किसी गरीब का हक न छीन लिया जाए, तो कहना

पैसों लिए किसी बेगुनाह का क़त्ल न हुआ, तो कहना!


आ गया नया नया साल लोगों को बेवकूफ बनाने के लिए

बड़े नेताजी ने देश को फिर से गुमराह नही किया, तो कहना

सिसायत की चपेट में आम आदमी ना कुचल दिया जाए,तो कहना!


आ गया नया साल एक और सबक सिखाने

इन सारे रिश्वतखोरों को उनकी औकात ना दिखाऊ, तो कहना

इतनी सारी जद्दोजहद के बाद भी जिंदा ना रहूँ तो कहना..!

~प्रेमकुमार शारदा ढगे

नागसेनवन, औरंगाबाद

Tuesday, 14 July 2020

दंडेलशाही!

गोष्ट आहे सुरतेची. तीच सुरत जीची छत्रपती शिवाजीमहाराजांनी अक्षरशः 'सूरत'च बिगडून टाकली होती. असो. या शहराची आठवण करण्याचं करण म्हणजे आठ जुलैला घडलेली घटना. कोरोना महामारीमुळे काही ठिकाणी लॉकडाऊन, काही ठिकाणी संचारबंदी, कुठे अंशतः संचारबंदी असले प्रकार चालू आहेत.सर्वसामान्य माणूस या संचारबंदी चे आपापल्या परीने पालन करण्याचा प्रयत्न करतोच. पण बऱ्याचदा मोठ्या घरातील राजकीय पार्श्वभूमी असलेले मस्तवाल लेकरं बापाची गाडी घेऊन तिच्यावर बापाच्या असलेल्या राजकीय पदाची बुरुदावली तसेच ठेवून सगळे नियम धाब्यावर बसवून बिनधास्त फिरत असतात. अशावेळी ट्रॅफिक पोलीस किंवा सामान्य कॉन्स्टेबल लेवल चे पदाधिकारी यांच्यात नादाला लागत नाहीत. शक्यतो हे यांच्याशी वाद घालत बसत नाहीत.मात्र बऱ्याचदा यांच्या सामना एखाद्या कर्तव्यदक्ष पोलीसाशी होत असतो आणि त्यातही जेव्हा पोलीस महिला असते तेव्हा खरी मजा येते. आता मात्र आपल्याला कल्पना आली असेल मी कोणाबद्दल बोलतोय? होय एलआर सुनीता यादव. यांच्याबद्दल बातमी आलेली आहे की, यांची बदली केली जात आहे.तसे पाहिले तर यांनी राजीनामा दिला होता परंतु  अधिकृतरित्या हा राजीनामा स्वीकारला नाही आहे म्हणे. 
 आपण सुद्धा, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सुनीता यादव यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला असेल.यामध्ये त्या गुजरातचे आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला चांगलेच खडे बोल सूनवत आहेत. कर्फ्यू चालू असताना मंत्री असलेल्या बापाची गाडी घेऊन अवैधपणे दोन मित्रांसोबत फिरत असताना सुनीता यादव यांनी त्याला अडवलं. मात्र आपण मंत्र्यांचा मुलगा असल्याचा आव आणत तो त्यांच्याशी हुज्जत घालत होता.  लेडी सिंघम मात्र कायदा सर्वांना समान आहे असे सांगत त्याच्या बापालाच फोनवर बोलते आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या माघारी काय दिवे लावत आहेत हे त्यांना सांगते. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं ज्या पद्धतीने ही महिला कॉन्स्टेबल एका मंत्र्याला बोलते त्यावरून ती किती कर्तव्यदक्ष आहे याची कल्पना येते.नाहीतर हल्ली अनेक पोलीस मंत्र्यांची जी हुजरेगिरी करताना आपण बघतो. मंत्र्याची हुजरेगिरी करण्यातच त्यांना धन्यता वाटते. पोलीस खात्यावर राजकारण्यांचे किती नियंत्रित असते हे आपण सर्रास बघतो. त्यामध्ये असली एखादी महिला पोलीस सापडली म्हणजे कुणालाही नवलच हे वाटणारच.

एकीकडे विकास दुबेसारख्या कुख्यात गुंडाने सातआठ पोलिसांचा खात्मा केल्यावर पोलिसांची अस्मिता जागी होते अणि सरतेशेवटी त्याचा एन्काऊंटर केला जातो. एखाद्या आरोपीची मजल पोलिसांचा लोकांसमोर खात्मा करण्यापर्यंत कशी पोचते.? एवढी हिम्मत कुठून येते.? याच सोपं उदाहरण म्हणजे एलआर सुनीता यादव यांच्या सारख्या पोलीस कर्मचाऱ्यांची होत असलेली कुचंबणा.जेंव्हा एखादा पोलीस अधिकारी प्रामाणिकपणे कर्तव्याचे पालन करत असतो तेंव्हा त्याला राजकीय दबावाखाली बोटावर खेळवले जाते. अशाप्रकारे पोलिस कर्मचारी किंवा मोठमोठे अधिकारी या राजकीय मातब्बरांच्या हाताचे खेळणे बनतात.देशाममध्ये अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातम्या आपण वाचल्या किंवा ऐकल्या असतील. त्यामागे काहीअंशी त्यांची राजकीय दबावापोटी होत असलेली घुसमट सुद्धा कारणीभूत आहे.

प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांना संरक्षण देणे हे देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. असले कर्तव्यदक्ष अधिकारी हे वाचले पाहिजेत. देशाला बलशाली करण्यासाठी अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांची गरज आहे. भ्रष्ट आणि लाचखोर अधिकारी हे देशाला खिळखिळ करून टाकतील. देशाला वाचवायचे असेल तर आपण असल्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे.आपणच ही राजकरण्यांची 'दंडेलशाही' थोपवू शकतो.

अन्यथा देशाला लागलेली भ्रष्ट, लाचार आणि लाचखोर राजकारण्यांची कीड सगळा देशच पोकळ करून टाकतील.

प्रेमकुमार शारदा ढगे
9860303216

Tuesday, 2 June 2020

जुग जुग जियो!

तसा हा वाढदिवस नेहमीच्या वाढदिवसापेक्षा थोडा वेगळा आहे. ह्या काळामध्ये कोरोनाचे  थैमान घातला आहे त्यामुळे या काळातील प्रत्येक गोष्ट ही 'युनिक' आणि वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही याआधी न भूतो न भविष्यती अशी घडली आहे. कोरोनामुळे" जिवंत राहण्यापेक्षा" दुसरं काहीही मोठा नाही हे परत एकदा सिद्ध झालं. माणसाच्या जिवापेक्षा दुसरं काहीही मोठं आहे हे कोरोनाचे सिद्ध करून दाखवलं.डेव्हलपमेंट, प्रगती, उच्च अर्थव्यवस्था,औद्योगीकरण ह्या सगळ्या गोष्टी गौण झाल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आहे तो माणसाचा जीव!

 अशा परिस्थितीमध्ये माझा वाढदिवस आहे तो म्हणजे मी जिवंत आहे याचा पुरावाच! या महामारीच्या निमित्ताने माणसाचे आयुष्य किती छोटे आहे याचा प्रत्यय आला. माणसाचा अहंकार हा त्याच्या जीवणापेक्षा किती जास्त आहे हे कळालं.जेव्हा आपल्या आसपासचे ,जवळचे लोकं केवळ शिंकल्याने संशयाच्या नजरेने बघायला लागतात, केवळ खोकल्यामुळे लोकं भेदाभेद करायला लागतात, दुरून बोलायला लागतात, तेव्हा कळलं माणसाच्या आयुष्याला खरच किती किंमत आहे. जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा काय हाल होतात?अशावेळी त्याला किती मानसिक आधाराची गरज असते! आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये जेव्हा आपलीच प्राणप्रिय माणसे आपल्याला बघू शकत नाहीत तेव्हा काय परिस्थिती असते हे याची देहा ने बघितल्यावर कळलं की, ऐनवेळी आपलीच माणसे ही महत्त्वाची का आहेत? जेव्हा सगळं काही संपलेला आहे असं वाटत असताना कोणीतरी जवळचा माणूस हळूच फोन करून "घाबरू नको" असं म्हणतं मानसिक आधार देतो त्यावेळेस तो आपल्यासाठी सर्वकाही असतो. जेंव्हा सगळं जग संपलेलं असतं तेंव्हा कोणीतरी आपल्या ओळखीचा आपुलकीने आवाज देतो तेंव्हा काय परिस्थिती असते ती शब्दात नाही सांगू शकतं.

मी सगळ्यात श्रीमंत, मी सगळ्यात देखना ,उंचापुरा, किती हा घमंड माणसाला! कोरोनाने सगळ्या गोष्टी एका बासणात बसवल्या. सगळे एका समांतर रेषेत आणले. मी फॉरेन रिटर्न, मी जास्त शिकलो, मी हाय प्रोफाइल, हाय सोसायटीमध्ये राहणार, मी आमक्या जातीचा, हा खालच्या जातीचा ह्या असल्या सगळ्या गोष्टी गौण झाल्या.सध्या जो जिवंत आहे तोच सगळ्यात श्रीमंत आणि मोठा!

 सगळीकडे आजूबाजूला मृत्यूचे थैमान आहे. कोणाला माहिती होतं सगळ्या भारत देशाच्या ट्रेन बंद असताना गावाकडे जाताना रेल्वे रुळावर झोपल्यावर अचानक कोणतीतरी ट्रेन येईल आणि आपला खातमा होईल! कोणाला माहिती होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये एवढी शुद्ध हवा असताना अचानक कुठेतरी वायू गळती होईल आणि यामध्ये कित्येकांचा प्राण जाईल! माणसाने मारण्याचे  हे काय नवीन प्रकार नाहीत. याआधीही लोकं खूप मारायचे इथून पुढेही मरतील मात्र माणसामध्ये  उद्भवलेली जी ही परिस्थिती आहे ती अभूतपूर्व अशीच आहे. मेले तर गुपचूप अंतयात्रा करायची. तीन चार लोकं येऊन अंत्यविधी करणार अशी परिस्थिती नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीने कधी बघितले नाही.कदाचित यापुढे बघणारही नाहीत.या सगळ्यातून एकच गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे आयुष्य खूप छोटं आहे. विचार करायला गेलात तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याकडे नको असलेल्या नकारात्मक गोष्टी खूप जास्त आहेत.

 त्यामुळे आजच वेळ आहे जर कुणाला दुःख दिलं असेल तर त्वरित माफी मागा आणि मोकळे व्हा! कुणाला बोलायचं राहून गेला असेल तर बोलून घ्या. कोणावर प्रेम करायचं राहुन गेलं तर प्रेम करून घ्या.आईवडिलांची सेवा करा, बहीण भावा सोबत वेळ घालवा, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालावा.आपलं आयुष्य आपल्याला कधी दगा देईल आणि कधी पोरकं करून जाईल याची गॅरंटी नाही. आयुष्यामध्ये "काहीतरी करायचंय राहून गेलं" असं म्हणण्यात आयुष्य निघून जातं आणि बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. अशावेळी आपल्याकडे ना ताकद असते ना पाश्चाताप करायला वेळ असते.

त्यासाठी ज्याकाही गोष्टी आयुष्यात करावयाच्या राहून गेल्या त्या करून घ्याव्यात.सकारात्मकता अंगी असावी. हे दिवस सुद्धा निघून जातील हा आशावाद असावा.कारण म्हणतात ना उम्मीद पे ही तो दुनिया टिकी है..! 

तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय आणि तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आतापासूनच देतोय! जुग जुग जियो!

प्रेमकुमार शारदा ढगे
9860303216

Friday, 27 March 2020

धन्यवाद कोरोना...!

धन्यवाद कोरोना तू माणसांच्या मुस्काटात हाणले
तुला सोडून बाकी सगळे मुद्दे कास्पटात गिणले

फॉरेन रिटर्न असल्याचा बेगडा घमंड तो किती
तुझ्यामुळे मात्र सगळ्यांचं विमान वेशिवरच टांगले

तुझ्या येण्यापूर्वी आम्ही हिंदू-मुस्लिम मध्ये तर्रर्र होतो
तुझ्या आगमनाने सर्वांना एकाच खोप्यात कोंबले

गरीब- श्रीमंत, काळा-गोरा भेदभाव नसे काही
तुझ्याचमूळे समानतेचे वारे सगळ्या जगात पांगले

मंदिर,मस्जिद,चर्च, गुरुद्वारा असो नाहीतर विहार
सगळ्या घरामलकांना तू अंधाऱ्या खोलीत डांबले

पुरे झालं तुझा पाहूनचार आता निघून जा लवकर
तुझ्यामुळे आम्हाला माणसांतलेच देवं सुद्धा दिसले.

प्रेमकुमार शारदा ढगे, नागसेनवन औरंगाबाद
9860303216

Sunday, 22 March 2020

हुकलेलं नियोजन...

संबंध देशामध्ये रविवारी जनता कर्फ्यु लागू करण्यात आला.लोकांनी स्वयंस्फूर्त होऊन घराच्या बाहेर न निघणं हे अपेक्षित होतं.आणि अपेक्षेप्रमाणे त्याला लोकांचा प्रतिसादही आला.मात्र हा कर्फ्यु लागू करताना जे नियोजन केल्या गेलं ते खरोखर सुयोग्य होतं का? त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का हे सुद्धा बघणे तितकेच गरजेचं आहे.
सध्या २१ तारखेच्या रात्रीपर्यंत आलेल्या सूचनेप्रमाणे देशात २७३ वर कोरोना रुग्णांची संख्या पोचली आहे. सध्या तरी देश दुसऱ्या स्टेज वर आहे.पहिल्या स्टेजमध्ये परदेशी रुग्ण ह्या रोगाचा विषाणू देशामध्ये येऊन पसरवतात. दुसऱ्या स्टेज मध्ये देशातील बाधित नागरिक हा रोगाचा प्रसार करत असतात.तिसऱ्या स्टेज मध्ये याचा प्रादुर्भाव वेगाने झालेला असतो आणि चौथ्या स्टेजला हा रोग नियंत्रणाबाहेर निघून जातो.अशावेळी ह्या रोगावर नियंत्रण करणे हे सरकार आणि प्रशासनासमोरील मोठे आव्हान असते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा मुख्यतः बाधित व्यक्तच्या संपर्कात निरोही व्यक्तीचे जाणे हाच आहे. कोणत्याही करणाने जर निरोगी व्यक्ती बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली की त्या व्यक्तीला सुद्धा त्या विषाणूची लागण होते. म्हणजे बाधित व्यक्तीने निरोगी लोकांच्या संपर्कात जाणे किंवा निरोगी व्यक्तीने बाधित व्यक्तीचा संपर्कात जाणे हे या कोरोना विषाणूच्या प्रसाराचे  मुख्य कारण आहे. 

यावर खबरदारी म्हजून मोदीजींनी लोकांना २२ तारखेला घराबाहेर न पडण्याचे आव्हान केले. त्यासाठी त्यांनी दोन तीन दिवस आधीच लोकांना जागृत केले. मात्र त्याचा परिणाम असा झाला की कर्फ्यु रविवारी होता म्हणून राज्यातील सगळ्या लोकांनी आपापल्या घरी परतण्यास सुरुवात केली.ही घरवापसी इतकी प्रचंड प्रमाणात होती की अक्षरशः पुणे आणि मुंबईची वाहतूक यंत्रणा तोकडी पडत होती. पुण्याच्या रेल्वेस्थानकावर लोकांना पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नव्हती. उत्तर प्रदेश ,बिहार राज्यातून आलेले लोकं परत आपापल्या राज्यात जाण्यासाठी धरपड करत होते. हे सगळं करत असताना आपण कोरोनाला अजूनच पसरवण्याची किती जोखीम घेत आहोत हे लक्षात येत नव्हतं कुणाच्याच.कारण ह्या एक दिवसात जेवढ्या लोकांनी प्रवास केला आहे त्यापैकी एकजण जरी बाधित असता तरी किती मोठी जोखीम आपण पत्करत आहोत याची कुणालाही जाणीव नसावी हे दुर्दैव आहे.बाधित रुग्णांने इकडून तिकडे प्रवास करणे हे एकमेव कारण आहे कोरोणाच्या प्रसाराचे. हा बाधित रुग्ण रेल्वेस्थानकावर या विषाणूचा प्रसार करून इतरत्र आपल्या गावच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे.याचाच अर्थ तो सगळीकडे या विषाणूचा प्रसार करणार आहे.

शनिवार २१ तारखेच्या रात्री इतक्या लोकांनी प्रवास केला की दस्तुरखुद्द नरेंद्र मोदींजींना ट्विट करून जनतेला सांगावं लागलं की बाबांनो घराच्या बाहेर पडू नका.जिथे आहेत तिथेच राहा.प्रवास करून आपल्या परिवाराची काळजी वाढवू नका. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

खरं तर मोदींजींनी हे आवाहन जनतेला सुरुवातीलाच करायला हवं होतं. कर्फ्यु लागू केल्यावर जी परिस्थिती उद्भवनार आहे त्याची कल्पना त्यांना आधीच यायला हवी होती. नोटबंदीच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं. बँकांमध्ये करोडो रुपये येऊन पडले होते पण ते एटीम मधून लोकांना काढता येऊ शकत नव्हते कारण त्या नोटा उपस्थित एटीम साठी सुयोग्य नव्हत्या. नवीन आलेल्या नोटांची साईज ही जुन्या नोटांच्या तुलनेनं छोटी असल्या कारणानं त्या उपस्थित एटीम मधून बाहेर पडू शकत नव्हत्या. पैसा तर उपलब्ध होता परंतु तो लोकांना वाटण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती.संपूर्ण देशातील एटीम बदलण्यास जवळपास तीन ते चार महिन्याचा कालावधी लागला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लोकांची जी दुरवस्था झाली होती ती सरकार टाळू शकत नव्हतं.
शासनाच्या या अनुभवावरून असं वाटतं की कोणतीही आणीबाणीची परिस्थिती असो वा कायद्याची अंमलबजावणी असो त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. कायद्यातील गुणदोष, त्याचे जनतेवर होनारे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम, याचा पूर्ण अभ्यास करूनच मग तो कायदा अमलात आणायला हवा.संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्यावरच निर्णय घ्यायला हवा.धीसाडघाईला येऊन निर्णय घेतल्यावर जी बेजारी होणार आहे त्यामध्ये आपलीच शक्ती वाया जाणार हे मात्र नक्की. तूर्तास आपण सर्वांनी कोरोनाशी लढण्यास स्वतःला सिद्ध केले पाहिजे.देशावर जे नैसर्गिक संकट आलं आहे त्यासाठी सगळ्यानी प्रशासनाला सहकार्य करायला हवं. आपली आणी आपल्या प्रियजनांसोबतच इतरांचीही काळजी घ्यायला हवी. तरच आपण या आस्मानी संकटातून सुखरूप बाहेर पडू!

प्रेमकुमार शारदा ढगे
9860303216

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...