तसा हा वाढदिवस नेहमीच्या वाढदिवसापेक्षा थोडा वेगळा आहे. ह्या काळामध्ये कोरोनाचे थैमान घातला आहे त्यामुळे या काळातील प्रत्येक गोष्ट ही 'युनिक' आणि वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही याआधी न भूतो न भविष्यती अशी घडली आहे. कोरोनामुळे" जिवंत राहण्यापेक्षा" दुसरं काहीही मोठा नाही हे परत एकदा सिद्ध झालं. माणसाच्या जिवापेक्षा दुसरं काहीही मोठं आहे हे कोरोनाचे सिद्ध करून दाखवलं.डेव्हलपमेंट, प्रगती, उच्च अर्थव्यवस्था,औद्योगीकरण ह्या सगळ्या गोष्टी गौण झाल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आहे तो माणसाचा जीव!
अशा परिस्थितीमध्ये माझा वाढदिवस आहे तो म्हणजे मी जिवंत आहे याचा पुरावाच! या महामारीच्या निमित्ताने माणसाचे आयुष्य किती छोटे आहे याचा प्रत्यय आला. माणसाचा अहंकार हा त्याच्या जीवणापेक्षा किती जास्त आहे हे कळालं.जेव्हा आपल्या आसपासचे ,जवळचे लोकं केवळ शिंकल्याने संशयाच्या नजरेने बघायला लागतात, केवळ खोकल्यामुळे लोकं भेदाभेद करायला लागतात, दुरून बोलायला लागतात, तेव्हा कळलं माणसाच्या आयुष्याला खरच किती किंमत आहे. जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा काय हाल होतात?अशावेळी त्याला किती मानसिक आधाराची गरज असते! आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये जेव्हा आपलीच प्राणप्रिय माणसे आपल्याला बघू शकत नाहीत तेव्हा काय परिस्थिती असते हे याची देहा ने बघितल्यावर कळलं की, ऐनवेळी आपलीच माणसे ही महत्त्वाची का आहेत? जेव्हा सगळं काही संपलेला आहे असं वाटत असताना कोणीतरी जवळचा माणूस हळूच फोन करून "घाबरू नको" असं म्हणतं मानसिक आधार देतो त्यावेळेस तो आपल्यासाठी सर्वकाही असतो. जेंव्हा सगळं जग संपलेलं असतं तेंव्हा कोणीतरी आपल्या ओळखीचा आपुलकीने आवाज देतो तेंव्हा काय परिस्थिती असते ती शब्दात नाही सांगू शकतं.
मी सगळ्यात श्रीमंत, मी सगळ्यात देखना ,उंचापुरा, किती हा घमंड माणसाला! कोरोनाने सगळ्या गोष्टी एका बासणात बसवल्या. सगळे एका समांतर रेषेत आणले. मी फॉरेन रिटर्न, मी जास्त शिकलो, मी हाय प्रोफाइल, हाय सोसायटीमध्ये राहणार, मी आमक्या जातीचा, हा खालच्या जातीचा ह्या असल्या सगळ्या गोष्टी गौण झाल्या.सध्या जो जिवंत आहे तोच सगळ्यात श्रीमंत आणि मोठा!
सगळीकडे आजूबाजूला मृत्यूचे थैमान आहे. कोणाला माहिती होतं सगळ्या भारत देशाच्या ट्रेन बंद असताना गावाकडे जाताना रेल्वे रुळावर झोपल्यावर अचानक कोणतीतरी ट्रेन येईल आणि आपला खातमा होईल! कोणाला माहिती होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये एवढी शुद्ध हवा असताना अचानक कुठेतरी वायू गळती होईल आणि यामध्ये कित्येकांचा प्राण जाईल! माणसाने मारण्याचे हे काय नवीन प्रकार नाहीत. याआधीही लोकं खूप मारायचे इथून पुढेही मरतील मात्र माणसामध्ये उद्भवलेली जी ही परिस्थिती आहे ती अभूतपूर्व अशीच आहे. मेले तर गुपचूप अंतयात्रा करायची. तीन चार लोकं येऊन अंत्यविधी करणार अशी परिस्थिती नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीने कधी बघितले नाही.कदाचित यापुढे बघणारही नाहीत.या सगळ्यातून एकच गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे आयुष्य खूप छोटं आहे. विचार करायला गेलात तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याकडे नको असलेल्या नकारात्मक गोष्टी खूप जास्त आहेत.
त्यामुळे आजच वेळ आहे जर कुणाला दुःख दिलं असेल तर त्वरित माफी मागा आणि मोकळे व्हा! कुणाला बोलायचं राहून गेला असेल तर बोलून घ्या. कोणावर प्रेम करायचं राहुन गेलं तर प्रेम करून घ्या.आईवडिलांची सेवा करा, बहीण भावा सोबत वेळ घालवा, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालावा.आपलं आयुष्य आपल्याला कधी दगा देईल आणि कधी पोरकं करून जाईल याची गॅरंटी नाही. आयुष्यामध्ये "काहीतरी करायचंय राहून गेलं" असं म्हणण्यात आयुष्य निघून जातं आणि बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. अशावेळी आपल्याकडे ना ताकद असते ना पाश्चाताप करायला वेळ असते.
त्यासाठी ज्याकाही गोष्टी आयुष्यात करावयाच्या राहून गेल्या त्या करून घ्याव्यात.सकारात्मकता अंगी असावी. हे दिवस सुद्धा निघून जातील हा आशावाद असावा.कारण म्हणतात ना उम्मीद पे ही तो दुनिया टिकी है..!
तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय आणि तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आतापासूनच देतोय! जुग जुग जियो!
प्रेमकुमार शारदा ढगे
9860303216
No comments:
Post a Comment