Thursday, 6 June 2024

धन्यवाद आयोध्यावासी!

आयोध्या ज्यामध्ये येते तो फैजाबाद मतदार संघ भाजपने गमावला. ही सीट भाजपने गमावणे म्हणजे सगळे मुसळ केरात म्हटल्या सारखं झालं. इथला निकाल हा अत्यंत सुखकारक आणि भारतीय लोकशाहीला पूरक असाच म्हणावा लागेल.

अखिलेश यादव यांनी अवधेश प्रसाद या दलीत व्यक्तीला भाजप विरोधात फैजाबाद (आयोध्या फैजाबाद मतदार संघात येते)  मधून खुल्या प्रवर्गातून तिकीट देऊन मोठी रिस्क घेतली. कारण भाजपने राम मंदिराच्या नावाने मतांचे केलेलं राजकारण सर्वपरिचित आहे.अस असतानाही भाजपचे सीट आयोध्यामधून पडणे हे बिगर हिंदी पट्ट्यातील लोकांना विस्मयकारक आहे. शिवाय तेथून एका दलीत व्यक्तीचा खुल्या वर्गातून होणारा विजय हे तेथील लोकांचे राजकीय शहणपन आणि प्रगल्भता दर्शवते. मतदार राजा हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करू शकतो हे पुन्हा एकादा अधोरेखित झाले आणि संविधान वाचवण्याची जिम्मेदारी फक्त दलीत समाजाची नसून प्रत्येक भारतीय संविधानप्रेमी आहे हे सुध्दा स्पष्ट झाले. याबरोबरच जनता धार्मिक ध्रुवीकरणात फसेल इतकी धर्मभोळी सुद्धा राहिली नाही.

अनुसूचित जातीतील उमेदवार हा खुल्या ५५ हजार मतांच्या फरकाने मात करू शकतो. खुल्या प्रवर्गातून दलीत नेता कसा जिंकून येऊ शकतो याची सोशल इंजिीअरिंग सुद्धा तपासून पाहणे अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांनी गरजेचे आहे.


No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...