संप्रदायिकता आणि धर्मनिरपेक्षतेचे धिंडवडे..
सध्या सांप्रदायिक हिंसेचा संपूर्ण देशामध्ये जी विशिष्ट साखळी चालू आहे ती भारत देशाच्या भवीतव्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे. उत्तर प्रदेशचे सहारणपूर असो, गुजरातचे उणा असो, महाराष्टाचे भीमा कोरेगाव असो हे सगळे सांप्रदायिक हिंसेचे बळी ठरलेलं राज्य आहेत. हिंदू-मुस्लिम , दलित-सवर्ण असल्या संप्रदीक हिंसेमुळे संपूर्ण भारतीय समाज ढवळून निघत आहे. देश आणि समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारची दहशत आणि अशांतता धुमसत राहते.
खरं तर असल्या धार्मिक दंगलिंची आणि सांप्रदायिकतेचि प्रकरणे हे आपल्या देशासाठी नवीन नाहीत. महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर ब्राम्हण विरोधी दंगली असतील, गोध्रा हत्याकांड असेल, बाबरीचा पाडाव असेल, इंदिराजींच्या मृत्यूंनातर शीख समुदायाचा नरसंहार असेल, या सगळ्या प्रकरणातून देशाला कधीही भरून न निघणारी जखमच झाली आहे. या सगळ्या प्रकरणांत गुंतलेल्या लोकांच्या कोर्ट कचेऱ्या आजूनही चालू आहेत. तरुण विद्यार्थ्यांना या प्रकरणामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये अडचण निर्माण होते. कोर्टच्या खेट्या माराव्या लागतात ते वेगळेच. आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते. तरी सुद्धा आपण भूतकाळातील इतिहासातून जर काहीच शिकलो नाहीत तर आपल्या सारखा दुर्दैवी दुसरा कोणीही नसेल!
आपल्या देशाने संविधानाच्या प्रस्ताविकेतच हे स्पष्ट केले आहे की कोणताही धर्म हा भारताचा अधिकृत धर्म नसेल. देशात सर्व धर्माना समान लेखले जाईल. सर्व धर्म संप्रदायांना त्याच्या धर्माचे पालन आणि प्रसार करण्याचे स्वतंत्र राज्यघटनेने दिलेले आहेच. धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. आपली घटनाच मुळात माणुकीचा पुरस्कार करण्याचे शिकवते. संपूर्ण जगात आपल्या देशाकडे पाहण्याचा लोकांचा कल हा सन्मानपूर्वक असतो तो यामुळेच!
असे असताना सुद्धा काही अतिउत्साही आणि अविवेकी माणसं ( ते सगळ्याच धर्मामध्ये असतात) आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे या अहंगंडात फिरत असतात. तरुणाची माथी भडकावण्यात हे सगळे सराईत असतात.या माथेफिरू लोकांवर काही राजकीय लोकांचा वरदहस्त असतो. त्यामुळे यांचे जास्ताच फोफावते. परंतु बिचारे तरुण त्यांच्या या अविवेकला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेतात.
या लेखाच्या निमित्ताने सर्व तरुण वर्गाला माझे आवाहन आहे की, सर्व तरुणांनी आधी स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्यावे.आई वडिलांचे स्वप्नांना साकार करावे. उच्च शिक्षण घ्यावे .स्वतःची प्रगती करून घ्यावी. प्रत्येक तरुण आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला की आपोआप देश प्रगतीपथावर चालतो. चांगले वाईट यांतील फरक ओळखावा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकारन्यांच्या हाताचे बाहुले बनू नये. तरुणांनी आपले तारुण्य आणि कल्पनाशक्ती विधायक कामासाठी वापरावी. स्वतःचा कुणालाही वापर करू देऊ नये. जागरूक राहावे. आपले तारुण्य निरर्थक गोष्टींसाठी खर्ची घालू नये. संपूर्ण देश तरुणाईकडे आशेने बघतोय. कारण ही तरुणाईचं देशाला योग्य नेतृत्व आणि दर्जा मिळवून देऊ शकते.
प्रेमकु शारदा ढगे, (मुक्त पत्रकार) नागसेनवन औरंगाबाद
9860303216
No comments:
Post a Comment