मागच्या काहि दिवसात गरबा खेळणाऱ्या तथाकथित बौद्ध तरुणांच्या मेंदूला झिणझिण्या आणणारा मेसेज पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये मी नऊ दिवस गरबा खेळून दहाव्या दिवशी बौद्ध लेण्यांवर जाऊन पंचशील ग्रहण करणार्यांना उपहासात्मक शुभेच्छा दिल्या होत्या. तो मेसेज बऱ्याच जणांना चांगलाच झोंबला होता.
आजकालचे तरुण, तथाकथित सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते, जातिसंस्थाचे निर्मुलन करण्याचा वसा घेऊन स्वतःच आयुष्य उद्धवस्त करून घेणारे अतिहुशार आणि ओव्हर स्मार्ट लोकं (जे माझ्या नजरेत मूर्ख शिरोमणी आहेत) त्यांच्यासाठी खास ही पोस्ट.
आपल्या समाजात (बहुजन समाजात) असे अनेक तरुण आहेत जे त्यांच्या सवर्ण मित्र मैत्रिणींसोबत वावरत असतात. हरकत नाही मैत्रीला कोनत्याही जाती धर्माची सीमा नाही. पण या मैत्रीच्या नादात आपल्या तत्वाशी तडजोड करणारे आणि स्वतःचा आत्मसन्मानाचे वाभाडे काढणाऱ्या मैत्रीला मी कवडीचीही किंमत देत नाही. इतर जाती धर्मीयांमध्ये नट्टापट्टा करून मिरवत असताना हे तरुण स्वतः आपण सुद्धा त्यांच्यासारखेच 'मोठ्या जातीचे' झाल्याचा तोरा मिरवत असतात.
पण जेव्हा तुमची जात सार्वजनिक केल्या जाते तेंव्हा मात्र तुमचा जीवही जाऊ शकतो मित्रानो. ताजं उदाहरण देतोय तुच्यासमोर. तुम्ही तेंव्हाही दलित (बहुजन) होता आजही दलित (बहुजन) आहात. नवे कपडे घालून तुम्ही तुमच्या उच्च जातीतल्या मित्रांसोबत फिरतही असाल पण योग्य वेळी तुम्हला तुमची जागा दाखवून दिल्या जाईल.
आता फक्त आमच्या बौद्ध मित्रांसाठी. मित्रहो, तुम्हला गळ्यात गाडग आणि ढुंगणाला झाडू बांधणारा धर्म जास्त प्यारा असेल तर अवश्य त्या धर्मात घर वापसी करा परंतु आमच्या, माणुसकीची शिकवण देणाऱ्या बौद्ध धम्मामध्ये कृपा करून भेसळ करू नका. तुम्हला धर्म निवडीचे स्वातंत्र्य खुद्द बाबासाहेबांनीच दिले आहे. त्यामुळे मी विरोध करणार नाही. पण रीतसर हिंदू धर्म स्वीकारा आणि मग गौरी ,गणपती, होळी काय करायचंय ते साजरा करा..
प्रेमकुमार शारदा ढगे.
सूचना : गरबा खेळणाऱ्या बौद्धांनी पोस्टला उत्तरे देण्याचं कष्ट करू नये.
सोबत लोकसत्ता ची लिंक पाठवत आहे...
http://www.loksatta.com/desh-videsh-news/gujarat-21-year-old-dalit-man-beaten-to-death-for-visiting-garba-8-patel-youths-arrested-in-anand-district-1562805/
No comments:
Post a Comment