नुकतेच आसाम सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवा कायदा मंजूर केला आहे. या नव्या कायद्यामुळे दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत आणि नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार आहे. दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. आसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते. सरकारी नोकरीच्या नियमांमध्ये लवकरच नव्या कायद्यानुसार बदल करण्यात येणार आहेत.
‘लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नवे धोरण लागू करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीही असाच कायदा करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात येईल. त्यामुळे दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या व्यक्तींना निवडणूक लढवता येणार नाही,’ असे हेमंत बिस्व सर्मा यांनी विधानसभेत प्रतिपादन केले.
नव्या नियमानुसार, लग्न करताना किमान वयोमर्यादेचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाही सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येईल. लोकसंख्येच्या तुलनेत रोजगारांत वाढ होत नसल्याने आसामी जनतेसमोर अनेक आर्थिक समस्या आहेत. त्यामुळेच आता लोकसंख्येला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
खरे तर आसाम राज्याच्या या धाडसी निर्णयाचे स्वागतच करायला हवे. कारण सर्वाना माहिती आहे की भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून चीनला सुद्धा मागे पाडायला निघतोय. भारताची साध्याची लोकसंख्या ही १.३४ अब्ज एवढी झाली आहे. देशाचा जन्मदर हा एका मिनिटांमध्ये ५१ बालके एवढा आहे. या आकड्यावाडीवरून भयंकरपणे वाढत जाणाऱ्या लोकसंख्येची कल्पना येऊ शकते.जगात एकूण लोकसंख्येत दरवर्षी भारतामधून सगळ्यात जास्त वाढ केली जाते.भारताच्या फक्त उत्तर प्रदेश या रका राज्याची लोकसंख्या ही ब्राझिज या देशाच्या सगळ्या लोकसंख्येयेवढी आहे. म्हणजे आपल्या देशाच्या लोकसंखेची घंटा ही इतर कोणत्याही देशापेक्षा तुलनेने जास्तच आहे.याच पद्धतीने जर लोकसंख्या वाढत राहिली तर भारत चीनला सुद्धा मागे टाकत २०२२ मध्ये जगात एक नंबर लोकसंख्या असलेला देश होईल.
जशी जशी लोकसंख्या वाढत जाते तसा तिचा देशाच्या एकंदरीतच आर्थिक ,सामाजिक आणि वैश्विक बाबींबर मूलगामी परिणाम पडत पडतात. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येला तितक्याच उच्च प्रतीचे जीवनमान प्रदान करणे हे शासणापुढील प्रमुख आव्हाण असते. वाढलेल्या लोकसंख्येत विना उत्पादित (स्वतः जगण्यासाठी इतरांवर अवलंबून असणारे बालके व वृद्ध) लोकसंख्येचा वाढता भारामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावते. वाढत्या लोकसंख्येला रोजगार मिळणे दुरापास्त होऊन जाते. यामुळेच चपराश्याच्या एका जागेसाठी सुद्धा हजारो आवेदन येतात. वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण, आरोग्य, उपासमार, दारिद्र्य, राहणीमान हे अत्यंत महत्वाचे आणि देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी करणारे प्रश्न उदभवतात.
लोकसंख्येचे नियंत्रण आणि उपलब्ध लोकसंख्येचा योग्य वापर करून देशाची प्रगती साधता येते. यासाठी कुटुंब नियोजनाबद्दल जागृती आणि समुपदेशन करणे गरजेचे आहे.याबाबतीत आसाम राज्याचा आदर्श प्रतेक राज्याने घेऊन राजकीय व सामाजिक जबाबदारी पार पाडवी. यासाठी लोकांना लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आणि खालावत चाललेले जीवनमान याबाबद जनजागृती होणे गरजेचे आहे. याकामी समाजात तरुण वर्गाने पुढे येऊन जनजागृती करणे आवश्यक आहे.
साप्ताहिक लोकसंकेत मध्ये पुर्वप्रकाशीत दि.२१ सप्टेंबर २०१७
प्रेमकुमार शारदा ढगे
No comments:
Post a Comment