लोकसंकेत वर्धापन दिन चिरायू होवो..
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्रे महत्त्वपूर्ण कार्य करत असतात. सत्याचा आणि शोषित वर्गाचा आवाज बनून त्याचा पाठपुरावा करण्याचे काम वृत्तपत्राचे असते. विविध जनहीताचे प्रश्न आणि समस्या मांडून शासन व्यवस्थेला भांडवून सोडून त्यांना वठणीवर फक्त वृत्तपत्रेच आणू शकततात.
जशी जशी वेळ बदलत गेली तशी तशी वृत्तपत्रे आणि त्यांची कार्य करण्याची पद्धती सुद्धा बदलून गेली. स्वातंत्र्यपूर्वीची वृत्तपत्रे, साप्ताहिके, पक्षिकं, मासिके यांना विशिष्ट अस वलय होते. लोकमान्यांचे 'केसरी', भाऊ महाजन यांचे 'प्रभाकर' 'दर्पणकार' बाळ शास्त्री जांभेकर, बाबासाहेबांचे ,बहिष्कृत भारत' ,आदी नियतकालिके त्या त्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडून जनआंदोलन उभे करण्याचे दिव्य कर्म करत. एकमेकांविषयीचे वैचारिक विरोधी व्यक्त होत पण विशिष्ट पातळीच्या खाली न जाता. निर्भीड आणि सडेतोड सत्याचा पुरस्कार करणारे असेच हे लेखन असायचे.
अशा या वैभवसंपन्न आणि आदर्श वृत्तपत्र व्यवस्थेचा वारसा भारतीय पत्रकारितेला लाभलेला आहे. यांच्यानंतर अनेक वृत्तपत्रे आली आणि काळाच्या ओघात बंद ही झाली. मात्र जनसामान्यांचा आवाज बनून अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडणारे काही मोजकेच वृत्तपत्रे ह्या धनाढ्य आणि आडमुठ्या व्यवस्थेशी आजही झगडत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नांदेड जिल्यातील मुखेडचे "साप्ताहिक लोकसंकेत!"
मुख्य संपादक नामदेव यलकटवार आणि त्यांच्या टीम ने अविरतपणे मेहनत करून या साप्ताहिकाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. साप्ताहिक जरी असले तरी आठवड्यातील सगळ्या महत्वाच्या बातम्यांना जागा देऊन सर्व क्षेत्रीय,राष्ट्रीय,आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आम्हाला सातत्याने वाचायला मिळतात त्या लोकसंकेतच्या निमित्ताने.
वेगवेगळ्या विषयात नामांकित आणि विशेषतज्ञ व्यक्तींचे नेमके आणि मुद्देसूद लेखन हे या साप्ताहिकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. संपादकीय सरांचे संपादकीय लेख आणि इतर विविध सदरे साप्ताहिकाला 'चार चाँद' लावून जातात. म्हणूनच राज्याच्या विविध भागात हे साप्ताहिक विशेष रुचीने वाचले जाते.
अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफर्सन म्हणता " मला राजकारण आणि वृत्तपत्रे यांपैकी काही निवडायचे असेल तर मी सगळ्यात आधी वृत्तपत्रांना स्वीकारेल" यावरून वृत्तपत्रे आणि त्याचे जणजीवनातील महत्व विशद होते. मात्र आजकालची बदलत चाललेली परंपरा, पेडन्यूज, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे 'सेट' असलेले अजेंडे हे पत्रकारितेला मारक ठरत आहेत. ग्राउंड लेवलवर जाऊन वृत्तांकन करण्याची संपत चाललेली प्रथा, संपादकांनी एकाच बाजूने विचार मांडणे, वृत्तपत्रांत होत असलेले राजकीय हस्तक्षेप, प्रस्थापितांकडे झुकलेली वृत्तपत्र संस्था, निर्भीड पत्रकाराची होत असलेली हत्या, लेखकांची कुचंबणा ही भरतीय पत्रकारिता आणि लोकशाहीच्या समोरील मोठी आव्हाने आहेत.
साप्ताहिक लोकसंकेतने जी निष्पक्षपाती पणाची सुरू केलीली परंपरा आहे , ती पुढेही अशीच चालू राहील हीच अपेक्षा आणि सदिच्छा. लोकसंकेत ने विविध अडथळे पार करत दोन वर्षे पूर्ण केले याबद्दल आनंद तर आहेच कारण याच वृत्तपत्रातून मी सुद्धा लिहायला सुरुवात केली होती. लोकसंकेतच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संपादक व टीम तसेच सर्व वाचक आणि समीक्षकांना हार्दिक शुभेच्छा....!
प्रेमकुमार शारदा ढगे(९८६०३०३२१६)
मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता ,नागसेनवन औरंगाबाद
No comments:
Post a Comment