Saturday, 18 February 2017

'जड गोष्टी'...

काही दिवसांपूर्वी माझ्या खास  "मूलनिवासी" मित्रांना भेटण्याचा योग्य आला. तसे हे मुलानिवासीं फारच कट्टर ब्राम्हणविरोधी ,आग्रेसिव्ह आणि भलतेच हायपर! कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहाचा घोटाचे पाहाडी पुरके मारत आमची मैफिल रंगली. आजूबाजूची तरुण मूल ज्यांना या राजकीय वातातवरणाचा काहीही संबंध नव्हता ,आमच्याकडं संशीयत नजरेनं बघू लागली. याचं कारण म्हणजे आमच्या बोलण्यातून आंबेडकर, फुले , शिवाजी महाराज, मनुवाद, जातीवाद, असल्या प्रक्षोभक शब्दांनी  कॅन्टीनचा माहोल दणाणून सोडला. आजूबाजूच्या बऱ्याच सुंदर मुली आणि त्यांच्यासोबतच तेवढेच देखणे मूलं आमच्या 'महार कालव्यामुळं'  भेदरून गेले होते. आम्ही कधी एकदाचे इथून निघून जातो असंच बहुदा त्यांना वाटत असावं. आम्ही मात्र त्यांच्याकडं सपशेल दुर्लक्ष करत आमची सभा भरवली होती. आणी आम्हाला विरोध करण्याची हिम्मत करणारा आजून पैदा व्हायचाय, निदान पी.ई. यस. सोसायटी मध्ये तरी...!

चर्चेमध्ये तसे बरेच मुद्दे आले. आंबेडकरी चळवळी बद्दल बराच वेळ गप्पा चालल्या. त्यावरून माझ्या मूलनिवासी बांधवांची समाजाविषयीची तळमळ दिसून आली. पण या लोकांचा ज्या पद्धतीनं ब्रेनवाश झाला आहे त्याबद्दल फार आश्चर्य वाटतं. याबाबतीत मी त्यांना अगदी मोदी भक्तांच्या पारड्यात बसवतो. कारण हे सुद्धा मोदी भक्तांनीतकेच कट्टर आणि निष्ठावाण आहेत. ज्या प्रमाणे मोदी भक्त मोदींची चूक कधी मान्य करत नाहीत त्याप्रमाणं हे मूलनिवासी मेश्राम साहेबांची चूक मान्य करत नाहीत. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा बरोबरच असतो. आणि नेमकं याच ठिकाणी मला ते आवडत नाहित. त्यांची जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तिलांजली देणारी मानसिक गुलामगिरी आहे ती मला फार खटकते. कोणत्याही व्यक्तीला विभूती बनवून तिचा देव करून भक्ती करणे हे माझ्या रक्तात नाही. बाबसाहेबांनीही स्वतःला कधी परिपूर्ण नाही समजलं. भक्त हि संकल्पना त्यांनाही व्यक्तिशः आवडत नसे. अन्यथा त्यांच्या आयुष्याची कामाई असलेलं संविधान लिहल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्याची मुभा त्यांनी कोणालाही दिली नसती. म्हणूनच कदाचित त्यांनी संविधान सभेला संबोधित करताना 'व्यक्तिकेंद्रित शासन हे हुकूमशाहीकडं नेणारं  असतं' असं बजावलं होतं.

ह्या मूलनिवासी बांधवांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ब्राम्हण!! यांचं सगळं राजकारण याच शब्दावर चालू होतं आणि इथेच त्याचा शेवट होतो. किंबहुना ब्राह्मणांना प्रत्येक गोष्टीत पराभूत करून त्यांना नामोहरम करणे हेच यांचे आद्य कर्तव्य आहे. मग  बाबासाहेबांच्या मृत्यूपासून ते ऑपरेशन ब्लु स्टार पर्यंत सगळ्या घडामोडिंना ब्राम्हण कसे जाबाबदार आहेत हे लोकांना पटवून देण्यातच त्यांना महापराक्रम वाटतो.  आजही भारत देश स्वातंत्र्य नाही असं ते छातीठोकपणे सांगतात. इंग्रज गेले आणि ब्राह्मण आले अस त्यांचं निराळं लॉजिक आहे. आपण आजही गुलाम आहोत असं अगदी सहजपणे ते बोलून जातात.

मी मात्र एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून या सगळ्या गोष्टींकडे तटस्थ पणे बघतो. मुळात आजही स्वतंत्र भारताच्या जवळपास सत्तर वर्षानंतरहि तुम्ही स्वतःला गुलाम समजता , तेही बाबासाहेबांचं संविधान असताना यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? ब्राह्मण आज जरी संख्येनं कमी असले तरी ते त्यांच्या वैचारिक ताकदीच्या जोरावर संविधानात्मक मार्गाने भारतावर राज्य करत आहेत. यासाठी त्यांनी लोकशाहीचा मार्ग अवलंबिला आहे. फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी सामान्य जनतेच्या मानगुटीवर तलवार नव्हती ठेवली! ते जरी संख्येनं कमी असले तरी जनतेला त्यांचं नेतृत्व आवडतं  .आपण ब्राह्मणांच्या नावाने एवढे खडे फोडतोय, आरडाओरड करतोय , पण याचा खरंच काही फायदा होतोय काय? याचे परीक्षण करणेही तेवढेच आवश्यक आहे. ब्राह्मण किती वाईट आहेत यापेक्षा आपण किती चांगले आहोत हे सांगणे अगत्याचे ठरते. समोरचा किती खराब आहे यापेक्षा आपण किती चांगले आहोत ही अभिव्यक्ती वापरून त्याठिकाणी शक्ती खर्च करणे रास्त आहे. ब्रह्मण कधी आपल्या नावानं तक्रार करतो का? तो आपल्याला कधी दोष देतो का? मग आपणही आपली रननीती बदलणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या सोबत बाबसाहेबांचे संविधान आहे. जोपर्यंत संविधानाचे सुरक्षाकवच आहे तोपर्यंत तरी कुणाला घाबरायची गरज नाही. पण काहीही कारण नसताना उगाच दीड हजार वर्षांपूर्वी लोटून स्वतःला गुलाम म्हणून घेणे मला तरी योग्य वाटत नाही. दुसरी गोष्ट प्रत्येक बाबतीत ब्राम्हणाला जबादार ठरवून , वारंवार  त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यात काहीही शहाणपणा नाही अस मला वाटतं. आपण जेवढं त्यांचं नाव घेऊ , जेवढ्या त्यांना शिव्या घालु तेवढे ते आपसूकच मोठे होणार! समोरच्याला अनुल्लेखाने मारायची कला कधी जमणार आपल्याला?

दुसरा मुद्दा मला नाही आवडला तो म्हणजे प्रत्येक वेळेस इतिहासाचा दाखला देणं. प्रत्येक गोष्टींसाठी इतिहास कशाला वाचायला पाहिजे? आज माझ्या अवतीभोवती जे घडतंय ते सगळं इतिहासच आहे. फार वर्षांपूर्वी शूद्राणं वेद ऐकले की त्याच्या कानात शिषे गरम करून टाकायचे, आजही बाबासाहेबांची रिंगटोन ऐकली तर आमच्या मित्राचा खून होतो. पूर्वी आमच्या आईबहिणीच्या आब्रूला काहीही किंमत नव्हती, आजही खैरलांजी घडतं आणि माझ्या आई-बहिणीची अभ्रू कवडीमोल होऊन जाते! सवर्ण मुलीसोबत प्रेम केलं तर आजही माझ्या मित्राला जीवनातून हाद्दपार केलं जात. आजही चार पुस्तक शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोहित सारखं आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जात! त्याकाळातही द्रौपदी, सावित्री परेशान होत्या आजही आजही निर्भया आहेच कि. इतिहासात याहून काहीं वेगळं घडायचं का?  हि इतिहासाची पुनरावृत्तीच नव्हे का? आहो माझ्या समोर आजूबाजूला इतिहास घडत असताना मी कशाला इतिहासाच्या पानातले मुडदे उखळून काढू? बाबासाहेबांनी केलेली बरीच भाकीतं आजही जशाच्या तशी खरी ठरली आहेत. याचा अर्थ त्यांचा प्रत्येक वाक्य आपण आजच्या घडीला दाखला म्हणोन वापरणं कितपत योग्य आहे.? बाबासाहेबांच्या एखाद्या सभेतील विशिष्ट एखाद्या वाक्याचा दाखला देऊन समाजाला धारेवर धरण्यात कितपत शहनपणा आहे?   बाबासाहेबांनी ते वाक्य त्या काळानुसार केलेलं होतं , त्यांचं ते वाक्य वेळेच्या सापेक्ष होतं. मग आपणही आपले विचार वेळेच्या सापेक्ष ठेऊ नये का? वेळेनुसार बदलले नाही तर आपली चळवळ नोकिया मोबाईल सारखी कालबाह्य होऊन जाईल. ज्यांना कोणाला यमपीएस्सी , युपीएससी, द्यायची आहे त्यांनीच इतिहास वाचावा! अस मी टोकाचं विधान करत आहे. बाकी सगळा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे.

मुळात मला प्रॅक्टिकल जगायला आवडत.तुम्ही  म्हणता ब्राह्मणाला आम्ही विदेशी मानतो. त्यांना विदेशी मानल्याने ते काही विदेशी होणार नाहीत.. त्यांचा डी यन ये भारताचा नाही म्हणे! पण यान काय फरक पडतो? तुम्ही मानल्या न मानल्याने काहीही फरक पडत नाही! त्यांना संविधान भारतीय मानतं. आणि त्याच्याचमुळे ते राज्यकर्ते बनले. केवळ हेच शाश्वत सत्य आपण मान्य करायला हवं. सोनिया गांधी सुद्धा  भारतीय नाही हा मुद्दा घेऊन शरद पवार नॅशनल काँग्रेस मधून बाहेर पडले ज्याचा पश्चाताप त्यांना आजही होतो! अन्यथा त्यांचही  पंतप्रधान होण्याचं स्वप्न पूर्ण झाले  असते. उगाच बिना बुडाचा , कुठेहि न टेकनारा विरोध काहीही कामाचा नाहीये. कारण त्यांना ओरडून घशाला कोरड पाडून घेतल्यानं आपण बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण नाही करू शकणार. कारण देशाचं संविधान त्यांना देश चालवन्याचा हक्क देत, तो हक्क , अधिकार आपल्यालाही आहे. आपण आपलं कसब वापरून राज्यकर्ते बनायचं. नको त्या गोष्टींवर विचार करण्यात डोकं खर्च नाही करायचं. जी सत्य परिस्थिती आहे ती स्वीकारून पुढची रणनीती आखण्याची.

मेश्राम साहेबांचा मूलनिवासी असो, आठवले साहेब , गाडे साहेब ,कवाडे साहेब, गवई साहेबांचा पँथर असो,  बाळासाहेब , आनंदराज साहेबांचा सैनिक असो सर्वांचे ध्येय एकच असताना धोरणे आणि कृती यामध्ये समन्वय साधने आवश्यक आहे. त्यामुळं समाजाची तिरिमिरी होता कामा नये.

शेवटी ,हॉलिवूडपटात बोट बुडत असताना नायक बोटीतले जड सामान फेकून देऊन बोट हलकी करण्याची सूचना करतो , अगदी त्याप्रमाणे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नको असलेल्या 'जड गोष्टी' आपल्याला दूर फेकून देऊन मार्गक्रमन करुण 'परिवर्तन' करणे भाग आहे. जय भीम

ता. क.
हा लेख कुठल्याही सांघटनेला किंवा पक्षाला व्यक्त करत नाही.

प्रेमकुमार शारदा ढगे(9860303216)

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...