मोदी साहेबांनी डबघाईला येऊन घेतलेल्या निर्णयाबद्दल साहेबांचे गोडवे गाण्यात कुठेही कमी न पडलेल्या भक्तांचे सर्वप्रथम अभिनंदन.
आज सकाळी सकाळी रुपयाच्या मूल्यमध्ये झालेली आतापर्यंतच्या ३९ महिन्यातली म्हणजे तीन सव्वातीन वर्षातली सगक्यात मोठी घसरण झाली आहे. ६८.७३ एवढ्या मूल्यावर रुपया स्थिरावला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नोटाबंदी हे आहे. म्हणून हा लेख लिहायला स्वतःला आवरू शकलो नाही..
लोकांना त्रास होतोय पण ते सहन करताय, दूधवाला पैसे मागत नाही, किरणावाला उधार देतो, वगैरे वगैरे ह्या गोष्टी म्हणजे निव्वळ अफवा आहेत. कारण छोटे छोटे चलन हे नेमके याच लोकांना जास्त लागते. हे असल्या गोष्टी सांगणे म्हणजे स्वतःच्या मनाचे सांत्वन करून मूर्ख बनवणे आहे , याच्या पलीकडे काहीही नाही. या लोकांचा दररोजचा देन्या घेण्याचा व्यवहार असतो. आज पैसे नाही दिले तर उद्या त्यांना माल भरायला अडचण निर्मान होते.
बँकांच्या रांगेमध्ये आणि बँकेच्या आतमध्ये सुद्धा बेरच लोक जीवाला मुकले, हे तर सगळ्यांनाच माहित आहे , त्यांच्या कुटुंबामध्ये काय खळबळ उडाली असेल याची कल्पनाच न करने चांगले. यांच्यापैकी किती लोकांकडे काळा पैसा होता हे उघडकीस आले..? किती बड्या घरचे , श्रीमंत लोकं हे रांगेत येऊन पैसे काढत आहेत...? भक्त , कोर्टाने नोटबंदिला स्थगिती दिली असल्याचे सांगतात, पण कोलकाता कोर्टाने ओढलेले ताशेरे विसरतात!! खुद्द न्याधीशाच्या मुलाला डेंगू झाल्यामुळं आजारासाठी पैशाच्या तुटवडा निर्माण झाला. न्यायाधीशाची हि बेजारी आहे तिथं सामान्य माणसाची काय अवस्था असेल याची थोडीशी कल्पना करा..? आणि दुसरी गोष्ट दोन हजाराच्या नोटेची, ती जवळ असूनही फायदा नाही , कारण तिचे सुट्टे दूधवाला, किरणावाला यांच्याकडं सहसा मिळत नाहीत, त्यांच्या व्यवसायाचं नसतो हजारो रुपयांमध्ये..!
अजूनही बऱ्याच जणांकडे दोन हजाराची नोट आली नाही पण दोन दिवसांपूर्वी मारल्या गेलेल्या आतंकवाद्याकडं मात्र कशी आली हि काही कळायला मार्ग नाही. तात्पर्य नोटाबंदीमुळं अतंकवादाला खीळ बसेल हा भ्रम सुद्धा दूर झाला. नोटा बंदीचा प्रयत्न याधीसुद्धा झाला आहे हे आपणास माहिती असेलच यांचा कितपत फायदा देशाला झाला याचा लेखजोखा मोदी साहेबांच्या सल्लागारांनी साहेबांना द्यायला हवा होता.असो..
नोटा बदला किंवा नका बदलू याचा सामान्य माणसाला काहीही फायदा होत नाही. कारण त्याच्याकडं कसल्याही प्रकारचा काळा पैसा नाही... त्याची फक्त हेळसांड , उचलबांगडी , आणि मनस्ताप होतो....
साहेबांच्या तडकाडकी निर्णयांमुळे सगळ्यांचीच पंचायत होते आहे हे भक्तांना सुद्धा माहिती आहे . परंतु 'आपलेच दातं आणि आपलेच ओठ असल्यामुळं जे काही घडतंय ते मूग गिळून सहन करून त्याला समर्थन केल्याशिवाय त्यांच्याकडं पर्याय उरलेला नाही. मग गरज नसतानाही उगाच , रांगेत उभा राहणे म्हणजे "देशभक्ती" वगैरे असले काहीतरी फाजील आणि कमकुवत विचारचे बिंग फुटते ते या मानसिकतेमधूनच .... असो...
मुळात नोटाबंदीला विरोध नाही! विरोध आहे तो कसल्याही प्रकारच पर्वनियोजन न करता डबघाईत घेतलेल्या निर्णयाला. कारण हा प्रश्न काही एका पक्षापूर्ता किंवा काही लोकांकरिता नाही आहे . ह्या एका निर्णयामुळं संबंध देशवासी प्राभावीत झाले आहेत. याचे काही चांगले परिणामही नक्कीच असतील, अद्याप काही दिसले नाहीत पण या सगळ्या आदलाबदलीत सामान्य मानुस होरपळतो आहे. त्याचेच पैसे घेण्यासाठी त्याला तासनतास रांगेत उभा राहावे लागत आहे. काही ठिकाणी तर पोलिसांचा मारही खात आहेत हे लोकं.
आता फक्त , अमुक माणसाला काळ्या पैस्यासाठी अटक, तमुक व्यक्तीला काळ्या पैश्याबद्दल जन्मठेप, असल्या बातम्या कधी ऐकायला मिळतात याची वाट पाहतोय कारण , नोटा बंद झाल्यापासून सामान्य माणूसच हालाकीत जगत आहे!! ज्यांच्यासाठी मोदी साहेबानी हि सगळी खटपट केली आहे त्यांचा नंबर कधी येणार ...त्यांचे 'आच्छे दिन ' कधी येणार हे पाहणे अगत्याचे आहे....
प्रेमकुमार शारदा ढगे...
9860303216
premkumar.dhage@gmail.com
9860303216
premkumar.dhage@gmail.com
No comments:
Post a Comment