Thursday, 9 June 2016

मोदींचा 'चमचा' ...

एखादा माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या समोर जरी आपण वयाने किंवा पदाणे जरी लहान असलो तरी स्वात:चा "आत्मसम्मान" किंवा " सेल्फरिस्पेक्ट नावाची एक गोष्ट असते. आजकाल लोक एखाद्या मोठया व्यक्तिमत्वाच्या वालयापुढं सर्रास विसरत चालले आहेत. याचा सगळ्यात मोठा परिचय आला तो "उडता पंजाब"  या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून उफळकेल्या वादाने. अभेषेक चौबे दिग्दर्शित 'उडता पंजाब'  या चितापटाला सेन्सर बोर्डाने ८९ ठिकाणी कात्री लावली आहे . एखाद्या चित्रपताटली ८९ दृश्ये कापून टाकल्यावर त्याच्यात बघण्यासारखे काय असणार आहे . बर याला कारण काय तर म्हणे या चित्रपट निर्मितीला आम आदमी पक्षाने पैसा दिला आहे , पंजाब राज्याची बदनामी करणयासाठी. अस चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी (कसले कसले नाव असतात लोकांचे ..असो) यांचे म्हणणे आहे . शिवाय मी नरेंद्र मोदी यांचा  "चमचा"  आहे हे सुद्धा ते अगदी प्रामाणिकपने मान्य करतात. याबादल तर त्यांचे  'पद्मश्री'  सन्मानाने स्वागत करा असे म्हणनारा मी पहिला असेल. असो...

मात्र देशाचा एक जागरूक नागरिक म्हणून थोडा विचार केला तर माझ्या वक्तव्यामुळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माझ्या देशाच्या नेत्याची काय नाचक्की होते आहे याचा विचार करणे मला अपरिहार्य आहे. एखाद्या स्वायत्त संस्थेच्या अधिकाऱ्याने मी अमुक एका व्यक्तीचा ' चमचा' आहे अस स्वात:ला जर गोषित केलं तर सामान्य लोकांना त्या संस्थेबद्दल विश्वास आणि आस्थेची अपेक्षा करू नये. उद्या चालून जर भारताच्या सगळ्या स्वायत्त संस्था , सिबीआय, इलेक्शन कमिशन, युपीयससी, संरसक्षण दले यांच्या प्रमुखांनी स्वतःला प्रधानमंत्र्याचा ' चमचा ' म्हटलं तर  प्रधानमंत्र्याला 'हिटलर' म्हणायची गरज पडणार नाही.

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या कारभारातील बदलांसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष शाम बेनेगल यांनी मात्र हा चित्रपट उत्कृष्ट  निर्मितमूल्य असल्याचा दावा केला आहे. शिवाय उच्च न्यायालयाने सुद्धा ह्या प्रकरणाची दखल घेऊन सेन्सर बोर्डाला चांगलेच खडसावले आहे.  चित्रपट हा समाजाचा आरसा असतो अस म्हणतात. चित्रपट निर्माण हा प्रोड्युसरचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. ज्या दृश्याने सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होत असेल तर किंव्हा जागतिक पातळीवर देशाची कोणताही प्रकारची हानी होत असेल तर अवश्य कात्री लावा. अत्यंत हीन आणि खालच्या पातळीच्या  चित्रपटाला सेन्सर बोर्ड मान्यता देते. अश्लीलतेचा कळस गाठला जातो. बऱ्याच चित्रपटातून  हिंसाचार आणि अराजकतेचे स्तोम माजवले जाते . दाक्षिणात्य चित्रपटात हिरोच्या एका किक मध्ये शंभर फूट लांब जाऊन कोसळणारा डाकू दाखवायला ,  सनी देओल चालत्या ट्रकला हाताने थोपवतो, असल्या अर्थहीन आणि फालतू दृश्याना सेन्सॉर बोर्ड संमती देते परंतु , झेंडा, सैराट ,आरक्षण यासारख्या सामाजिक  आणि खऱ्या समाजाचे अस्तित्व दाखवणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालते.

बर या अध्यक्ष महाशयाच्या बाजूने ते ज्यांचे 'चमचे' आहेत ते सुद्धा जवळ करत नाहीत . यांनी स्वतः ला मोदींचा चमचा तर सिद्ध केलं पण मोदींच्या पक्ष श्रेष्टी आम्हाला 'चमच्यांची' गरज नाही असा दावा करताय . अशा वेळेची या 'चमच्याला' तोंडघशी पडल्याखेरीज गत्यंतर नाही.

तेंव्हा आपण ज्यांचा 'चमचा' बनत आहोत त्यांनी कमीत कमी आपल्याला 'चमचा' म्हणून तरी स्वीकारावे नाहीतर आपली गत त्या कुत्र्यासारखी होऊन जाईल जो ना धड घरचा असतो ना घाटाचा.....

प्रेमकुमार शारदा ढगे (9860303216)
premkumardhage.blogspot.com

No comments:

Post a Comment

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...