Thursday, 24 November 2016

नोटाबंदी...!

मोदी साहेबांनी डबघाईला येऊन घेतलेल्या निर्णयाबद्दल साहेबांचे गोडवे गाण्यात कुठेही कमी न पडलेल्या भक्तांचे  सर्वप्रथम अभिनंदन.
आज सकाळी सकाळी रुपयाच्या मूल्यमध्ये झालेली आतापर्यंतच्या ३९ महिन्यातली म्हणजे तीन सव्वातीन वर्षातली सगक्यात मोठी घसरण झाली आहे. ६८.७३ एवढ्या मूल्यावर रुपया स्थिरावला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नोटाबंदी हे आहे. म्हणून हा लेख लिहायला स्वतःला आवरू  शकलो नाही..
लोकांना त्रास होतोय पण ते सहन करताय, दूधवाला पैसे मागत नाही, किरणावाला उधार देतो, वगैरे वगैरे ह्या गोष्टी म्हणजे निव्वळ अफवा आहेत. कारण छोटे छोटे चलन हे नेमके याच लोकांना जास्त लागते. हे असल्या गोष्टी सांगणे म्हणजे स्वतःच्या मनाचे सांत्वन करून मूर्ख बनवणे आहे , याच्या पलीकडे काहीही नाही.  या लोकांचा दररोजचा देन्या घेण्याचा व्यवहार असतो. आज पैसे नाही दिले तर उद्या त्यांना माल भरायला अडचण निर्मान होते.
बँकांच्या रांगेमध्ये आणि बँकेच्या आतमध्ये सुद्धा बेरच लोक जीवाला मुकले, हे तर सगळ्यांनाच माहित आहे , त्यांच्या कुटुंबामध्ये काय खळबळ उडाली असेल याची कल्पनाच न करने चांगले. यांच्यापैकी किती लोकांकडे काळा पैसा होता हे उघडकीस आले..? किती बड्या घरचे , श्रीमंत लोकं हे रांगेत येऊन पैसे काढत आहेत...? भक्त , कोर्टाने नोटबंदिला स्थगिती दिली असल्याचे सांगतात, पण कोलकाता कोर्टाने ओढलेले ताशेरे विसरतात!! खुद्द न्याधीशाच्या मुलाला डेंगू झाल्यामुळं आजारासाठी पैशाच्या तुटवडा निर्माण झाला. न्यायाधीशाची हि बेजारी आहे तिथं सामान्य माणसाची काय अवस्था असेल याची थोडीशी कल्पना करा..? आणि दुसरी गोष्ट दोन हजाराच्या नोटेची, ती जवळ असूनही फायदा नाही , कारण तिचे सुट्टे दूधवाला, किरणावाला यांच्याकडं सहसा मिळत नाहीत, त्यांच्या व्यवसायाचं नसतो हजारो रुपयांमध्ये..!
अजूनही बऱ्याच जणांकडे दोन हजाराची नोट आली नाही पण दोन दिवसांपूर्वी  मारल्या गेलेल्या आतंकवाद्याकडं मात्र कशी आली हि काही कळायला मार्ग नाही. तात्पर्य नोटाबंदीमुळं अतंकवादाला खीळ बसेल हा भ्रम सुद्धा दूर झाला. नोटा बंदीचा प्रयत्न याधीसुद्धा  झाला आहे हे आपणास माहिती असेलच यांचा कितपत फायदा देशाला झाला याचा लेखजोखा मोदी साहेबांच्या सल्लागारांनी साहेबांना द्यायला हवा होता.असो..
नोटा बदला किंवा नका बदलू याचा सामान्य माणसाला काहीही फायदा होत नाही. कारण त्याच्याकडं कसल्याही प्रकारचा काळा पैसा नाही... त्याची फक्त हेळसांड , उचलबांगडी , आणि मनस्ताप होतो....
साहेबांच्या तडकाडकी निर्णयांमुळे सगळ्यांचीच पंचायत होते आहे हे भक्तांना सुद्धा माहिती आहे . परंतु  'आपलेच दातं आणि आपलेच ओठ असल्यामुळं जे काही घडतंय ते मूग गिळून सहन करून त्याला समर्थन केल्याशिवाय त्यांच्याकडं पर्याय उरलेला नाही.  मग गरज नसतानाही उगाच , रांगेत उभा राहणे म्हणजे  "देशभक्ती" वगैरे असले काहीतरी फाजील आणि कमकुवत विचारचे बिंग फुटते ते या मानसिकतेमधूनच .... असो...
मुळात नोटाबंदीला विरोध नाही! विरोध आहे तो कसल्याही प्रकारच  पर्वनियोजन न करता डबघाईत घेतलेल्या निर्णयाला. कारण हा प्रश्न काही एका पक्षापूर्ता किंवा काही लोकांकरिता नाही आहे . ह्या एका निर्णयामुळं संबंध देशवासी प्राभावीत झाले आहेत. याचे काही चांगले परिणामही नक्कीच असतील, अद्याप काही दिसले नाहीत पण या सगळ्या आदलाबदलीत  सामान्य मानुस होरपळतो आहे. त्याचेच पैसे घेण्यासाठी त्याला तासनतास रांगेत उभा राहावे लागत आहे. काही ठिकाणी तर पोलिसांचा मारही खात आहेत हे लोकं.
आता फक्त , अमुक माणसाला काळ्या पैस्यासाठी अटक, तमुक व्यक्तीला काळ्या पैश्याबद्दल जन्मठेप, असल्या बातम्या कधी ऐकायला मिळतात याची वाट पाहतोय कारण , नोटा बंद झाल्यापासून सामान्य माणूसच हालाकीत जगत आहे!! ज्यांच्यासाठी मोदी साहेबानी हि सगळी खटपट केली आहे त्यांचा नंबर कधी येणार ...त्यांचे 'आच्छे दिन ' कधी येणार हे पाहणे अगत्याचे आहे....
प्रेमकुमार शारदा ढगे...
9860303216
premkumar.dhage@gmail.com

Friday, 7 October 2016

जगदंब...!

नेहमी प्रमाणं रमेश जगदंबेच्या दर्शनाला निघाला. हा मार्ग तसा त्याच्या आंगवळणीच पडला होता. शेवटचा आधार असलेली त्याची बायको त्याला सोडून  गेल्या नंतर जगदंबेलाच त्यानं  शेवटचं आणि कायमचं दैवत मानलं होत. नेहमीच मंदिरात असल्या कारणानं त्याला बरेच जण देवीचा आरादी म्हणत, ज्यात त्याला अदृश्य अशी समाधानाची झळाळी मिळत असे. देवीची आराधना करायची , देवीकडे येणाऱ्या भक्ताचे त्याला दिसताच  हात जोडून स्वागत होई. देवीसाठी नारळ सोलून देणे, भक्तांच्या चप्पला सांभाळणे , भाविक भक्तचे पडेल ते काम करण्यात त्याच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होई. त्याच्या ओसाड आणि भणंग घरापेक्षा मंदिरातच तो जास्त वेळ असे. गरिबीच्या आणि एकांताचा  चिरफाड करणाऱ्या यातनेतुन देवीचं मंदिरच त्याला जगण्याची नवीन उमेद देत होतं.

आज अमावास्या होती. आज देवीच्या दर्शनाला कोणी येणार नव्हतं. त्यामुळं उद्या येणाऱ्या भक्तांच्या महापुरातून  रमेशला उसंत सुद्धा मिळणार नव्हती. पण आज काय करायचं ? हा महत्त्वाचा प्रश्न होता. दर  महिन्याला एकदिवस हि परवड व्हायचीच. रस्त्यानं जाताना त्याला बघणारे पाहून 'आज अमावस्या आहे वाटत..!'  असं अनाहूतपणे बोलून जात होते. रमेश हा आज बाहेर फिरायलाय  म्हणजे आज नक्कीच अमावास्या होती हे लोकांनी गृहीतच धरलेलं होतं. पायात कोल्हापुरी जी त्याच्या वयाप्रमाणेच जुनाट झाली होती, अर्धवट पांढरे झालेले डोके, अंगात खमीस आणि पायात खमींसापेक्षा थोडी नवीन पण रंगाणं जुनच वाटणारं धोतर ,  खांद्यावर  मातीने कळकस झालेला रुमाल हा त्याचा नित्याचा पेहराव,  दुरूनच त्याची ओळख करून देई.

आठवडी बाजाराच्या हनुमान मंदिराच्या पुढच्या मैदानात आज  भलतीच गर्दी होती. मंदिरात आज अमावास्या असताना दिवसा दिवा  जळत होता. तिथून पुढं पंधरा मिनिटाच्या अंतरावर  खास गरीबांसाठीच्या असलेल्या स्वस्त हॉटेलात तो दर अमावस्ये सारखं जाऊन दही भात खाऊन येणार होता. आठवडी बाजाराच्या मैदानात त्याला गर्दीला बघण्याचा मोह आवरता नाही आला. जवळ जाऊन बघितलं तर तिथं एका डोंबाऱ्याचा खेळ चालू असल्याचं लक्षात आलं. खूप सारे लोकं तो खेळ पाहण्यासाठी जमले होते. हातातली ढोलकी वाजऊन हा खेळ बघण्याचं आवाहन डोंबारी करू लागला. त्याची बायको  गोल केलेल्या लोखंडी सळइतून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या शरीरापेक्षा कमी व्यास असलेल्या गोल कडीतून  बाहेर निघताना फारच कासावीस होत होती. आंग  पिळल्यामूळं होणाऱ्या वेदनेन ती विव्हळत होती. पण चेहऱ्यावर दुःखाचा अविर्भाव न दिसू देण्याचा खोटा प्रयत्न सारखा फसत होता. एकदाची मोठ्या प्रयत्नांन ती गोल सळईमधून बाहेर आली आणि लोकांनी सोबतच टाळ्यांचा गजर केला. ह्या टाळ्यांना  आजूनच  प्रोत्साहन देण्याचं काम डोंबारी आपली ढोलकि जोर जोरात पिटाळून इमाने इतबारे करत होता. हा सगळा प्रकार रमेश दुरूनच पाहत होता.

आता त्या डोंबाऱ्याची पोरगी दोन खांबावर बांधलेल्या दोरीवरून चालण्याचा पराक्रम दाखवणार होती. एवढ्या कोवळ्या वयात जीवाशी खेळायला लावणाऱ्या बापाचं काळीज खरच किती कठोर असावं. परंतु गरिबीच्या वेदना त्यापेक्षाही महाभयंकर आणि असह्य असतात हे रमेशला माहिती होतं छोट्या मुलीचा दोरीवरचा खेळ बघायला रमेश थोडा गर्दीच्या पुढे आला. हा हा म्हणता छोटी पोरगी दोरीवर बांबूच्या साहायाने चढली. दोन्ही हातात बांबू आडवा धरून स्वतःचा तोल सावरत ती दोरीवरुन पुढे चालत होती. सगळे लोकं पोरीची हि करामत आ वासून बघत होते. बापाच्या ढोलकीच्या आवाजाचा जोर,  जोरात घुमत होता. छोटी छोटी बारिक पोर किंचाळत होती. नकळतच सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. हे बघताना पोरीचा अचानक तोल गेला. पण काहीही दुर्घटना घडायच्या आताच तिने बांबूच्या आधाराने स्वतःला सावरलं. लोकांनी सुटकेचा नि:श्वास  सोडला. पण तिच्यासाठी हे नवीन नव्हतं. दोरीवरून चालण्याचा खेळ करून पोरगी खाली आली. तशी तिच्या बापाणे लोकांना काहितरी चिल्लर बक्षिस म्हणून देण्याची हात जोडून विनंती केली. आता मात्र बरीच गर्दी अचानक कमी झाली. काही छोटी मूलं रुपया दोन  रुपये त्यांच्या खाऊतले देत होती. काही मोठ्या मनाची माणसं पण होतीच जी फुल नाही फुलाची पाकळी देत होती. राधाकिसन मात्र पन्नासची नोट देऊन मिशावरून हात फिरवत मर्दांगीचा तोरा मिरवत गेला. रमेशनं सुद्धा क्षणाचाही विलंब न करता डोंबऱ्याचा पोरीच्या हातात पाच रुपायाची नोट दिली. 'पोरी जिवासंग एवढं नगं खेळत जाऊस. तुला आजून लै दुनिया बघायची हाये. जगदंब ....जगदंब...'  देवीला हात जोडून तो तिथून निघाला.

आता त्याला जेवणाची आठवण झाली. पुढच्या हॉटेलात जाऊन तो जेवणारच होता . मात्र शेवटचे पाच रुपये आपण डोंबाऱ्याच्या पोरीला दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण त्याच नशीब बलवत्तर कि काय म्हणून त्याला वडाच्या झाडाखाली एक रुपया ,  दोन रुपये  ,पाच रुपये असे एकत्र दहा ते वीस रुपयांची आरास भेटली. ती त्यानं लगेच उचलली आणि "जगदंबे तुलाच तुझ्या भक्तांची काळजी" असं म्हणत देवीला वंदन करत तो पुढे तडक हॉटेलाच्या दिशेने निघाला.

हॉटेलात गेल्यानंतर हॉटेल मालक  दिनू  काका , " आरं रमेश आरादी आला रं" , असं सांगत  'आज अमावस्या हाय वाटत'  अस स्वतःशीच पुटपुटले. काही वेळातच रमेशा पुढं दही भात येऊन पोचला. रमेश साठी दही भात हे नेहमीचंच ठरलेलं असायचं.

"आर,  सावकाराचा बाप गचकला म्हण आज ! त्येच्या पोरानं लय पैसे  ववाळून टाकले म्हण म्हाताऱ्याच्या मड्यावरून , आमचा गोपीनाथ सांगत होता."  शेजारी बसलेल्या दोन माणसांचं बोलणं रमेशच्या कानावर आलं. तसा तो स्तब्ध झाला. कारण त्याला वडाच्या झाडाखाली सापडल्या पैश्यांचा संदर्भ लागला होता. हनुमान मंदिरात दिवसा जळणाऱ्या दिव्याचा अर्थ त्याला उमजला होता. अमावस्येच्या दीवशी मड्यावरच्या पैस्यानं जेवावं कि नाही याची चलबिचल मनात होत होती. पण समोर दहीभात आणि स्वतःच्या गरिबीचा नाईलाज असल्यानं तो चोरासारखा पटापट जेवला. पैसे घेतांना हॉटेल मालक दिनू काका " काय रं रमिषा ह्याबार बक्कळ चिल्लर गोळा केलीस" असं म्हणत रामेशची टर उडवत होते.

त्याच्या बोलण्याकडे फारस लक्ष न देता रमेश हॉटेलातून बाहेर पडला. हनुमान मंदिराजवळ आल्यावर हातामध्ये कडू निंबाच्या झाडाचे पानं हातात घेऊन सावकाराच्या बापाचा अंत्यविधी करून आलेले लोकं रमेशला दिसले. मसनवाट्याकड  पाहून हात जोडत रमेश म्हणाला, " सावकार असू कि कोणी रस्त्यावरच्या भिकारी असू, शेवटी सगळ्यांना मार्ग एकच! कुणाला उशीर तर कुणाला लवकर तिकडंच जायचंच हाय. जगदंबे सगळ्यांना त्यांच्या जीवनाचा सफर सुखांन घडू दे ग माय.... जगदंब ...जगदंब...."

मागे हनुमान मंदिरात लावलेला दिवा तसाच  झुळू झुळूं  जळत होता...

©प्रेमकुमार शारदा ढगे.
9860303216

जगदंब...

नेहमी प्रमाणं रमेश जगदंबेच्या दर्शनाला निघाला. हा मार्ग तसा त्याच्या आंगवळणीच पडला होता. शेवटचा आधार असलेली त्याची बायको त्याला सोडून  गेल्या नंतर जगदंबेलाच त्यानं  शेवटचं आणि कायमचं दैवत मानलं होत. नेहमीच मंदिरात असल्या कारणानं त्याला बरेच जण देवीचा आरादी म्हणत, ज्यात त्याला अदृश्य अशी समाधानाची झळाळी मिळत असे. देवीची आराधना करायची , देवीकडे येणाऱ्या भक्ताचे त्याला दिसताच  हात जोडून स्वागत होई. देवीसाठी नारळ सोलून देणे, भक्तांच्या चप्पला सांभाळणे , भाविक भक्तचे पडेल ते काम करण्यात त्याच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होई. त्याच्या ओसाड आणि भणंग घरापेक्षा मंदिरातच तो जास्त वेळ असे. गरिबीच्या आणि एकांताचा  चिरफाड करणाऱ्या यातनेतुन देवीचं मंदिरच त्याला जगण्याची नवीन उमेद देत होतं.

आज अमावास्या होती. आज देवीच्या दर्शनाला कोणी येणार नव्हतं. त्यामुळं उद्या येणाऱ्या भक्तांच्या महापुरातून  रामेशला उसंत सुद्धा मिळणार नव्हती. पण आज काय करायचं ? हा महत्त्वाचा प्रश्न होता. दर  महिन्याला एकदिवस हि परवड व्हायचीच. रस्त्यानं जाताना त्याला बघणारे पाहून 'आज अमावस्या आहे वाटत..!'  असं अनाहूतपणे बोलून जात होते. रमेश हा आज बाहेर फिरायलाय निघालाय म्हणजे आज नक्कीच अमावास्या होती हे लोकांनी गृहीतच धरलेलं होतं. पायात कोल्हापुरी जी त्याच्या वयाप्रमाणेच जुनाट झाली होती, अर्धवट पांढरे झालेले डोके, अंगात खमीस आणि पायात खमींसापेक्षा थोडी नवीन पण रंगाणं जुनच वाटणारं धोतर ,  खांद्यावर  मातीने कळकस झालेला रुमाल हा त्याचा नित्याचा पेहराव,  दुरूनच त्याची ओळख करून देई.

आठवडी बाजाराच्या हनुमान मंदिराच्या पुढच्या मैदानात आज  भलतीच गर्दी होती. मंदिरात आज अमावास्याच्या असताना दिवसा दिवा  जळत होता. तिथून पुढं पंधरा मिनिटाच्या अंतरावर  खास गरीबांसाठीच्या असलेल्या स्वस्त हॉटेलात तो दर अमावस्ये सारखं जाऊन दही भात खाऊन येणार होता. आठवडी बाजाराच्या मैदानात त्याला गर्दीला बघण्याचा मोह आवरता नाही आला. जवळ जाऊन बघितलं तर तिथं एका डोंबऱ्याचा खेळ चालू असल्याचं लक्षात आलं. खूप सारे लोकं तो खेळ पाहण्यासाठी जमले होते. हातातली ढोलकी वाजऊन हा खेळ बघण्याचा आवाहन डोंबारी करू लागला. त्याची बायको  गोल केलेल्या लोखंडी सळइतून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या शरीरापेक्षा कमी व्यास असलेल्या गोल कडीतून फारच कासावीस होत होती. आंग  पिळल्यामूळं होणाऱ्या वेडणेंन ती विव्हळत होती. पण चेहऱ्यावर दुःखाचा अविर्भाव न दिसू देण्याचा खोटा प्रयत्न सारखा फसत होता. एकदाची मोठ्या प्रयत्नांन ती गोल सळईमधून बाहेर आली आणि लोकांनी सोबतच टाळ्यांचा गजर केला. ह्या टाळ्यांना  आजूनच  प्रोत्साहन देण्याचं काम डोंबारी आपली ढोलकि जोर जोरात पिटाळून इमाने इतबारे करत होता. हा सगळा प्रकार रमेश दुरूनच पाहत होता.

आता त्या डोंबाऱ्याची पोरगी दोन खांबावर बांधलेल्या दोरीवरून चालण्याचा पराक्रम दाखवणार होती. एवढ्या कोवळ्या वयात जीवाशी खेळायला लावणाऱ्या बापाचं काळीज खरच किती कठोर असावं. परंतु गरिबीच्या वेदना त्यापेक्षाही महाभयंकर आणि असह्य असतात हे रमेशला माहिती होत. छोट्या मुलीचा दोरीवरचा खेळ बघायला रमेश थोडा गर्दीच्या पुढे आला. हा हा म्हणता छोटी पोरगी दोरीवर बांबूच्या साहायाने चढली. दोन्ही हातात बांबू आडवा धरून स्वतःचा तोल सावरत ती दोरीवरुन पुढे चालत होती. सगळे लोकं पोरीची हि करामत आ वासून बघत होते. बापाच्या ढोलकीच्या आवाज जोर जोरात घुमत होता. छोटी छोटी बारिक पोर किंचाळत होती. नकळतच सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. हे बघताना पोरीचा अचानक तोल गेला. पण काहीही दुर्घटना घडायच्या आताच तिने बांबूच्या आधाराने स्वतःला सावरलं. लोकांनी सुटकेचा नि:श्वास  सोडला. पण तिच्यासाठी हे नवीन नव्हतं. दोरीवरून चालण्याचा खेळ केउं पोरगी खाली आली. तशी तिच्या बापाणे लोकांना काहितरी चिल्लर बक्षिस म्हणून देण्याची हात जोडून विनंती केली. आता मात्र बरीच गर्दी अचानक कमी झाली. काही छोटी मूल रुपया दिन रुपये त्यांच्या खाऊतले देत होती. काही मोठ्या मनाची माणसं पण होतीच जी फुल नाही फुलांची पाकळी देत होती. राधाकिसन मात्र पन्नासची नोट देऊन मिशावरून हात फिरवत मर्दांगीचा तोरा मिरवत गेला. रमेशनं सुद्धा क्षणाचाही विलंब न करता डोंबऱ्याचा पोरीच्या हातात पाच रुपायाची नोट दिली. 'पोरी जिवासंग एवढं नगं खेळत जाऊस. तुला आजून लै दुनिया बघायची हाये. जगदंब ....जगदंब...'  देवीला हात जोडून तो तिथून निघाला.

आता त्याला जेवणाची आठवण झाली. पुढच्या हॉटेलात जाऊन तो जेवणारच होता . मात्र शेवटचे पाच रुपये आपण डोंबाऱ्याच्या पोरीला दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण त्याच नशीब बलवत्तर कि काय म्हणून त्याला वडाच्या झाडाखाली एक रुपया ,  दोन रुपये  ,पाच रुपये असे एकत्र दहा ते वीस रुपयांची आरास भेटली. ती त्यानं लगेच उचलली आणि "जगदंबे तुलाच तुझ्या भक्तांची काळजी" असं म्हणत देवीला वंदन करत तो पुढे तडक हॉटेलाच्या दिशेने निघाला.

हॉटेलात गेल्यानंतर हॉटेल मालक  दिनू  काका , " आरं रमेश आरादी आला रं" , असं सांगत  'आज अमावस्या हाय वाटत'  अस स्वतःशीच पुटपुटले. काही वेळातच रामेशा पुढं दही भात येऊन पोचला. रमेश साठी दही भात हे नेहमीचंच ठरलेलं असायचं.

"आर सावकाराचा बाप गचकला म्हण आज. त्येच्या पोरानं लय पैसे  ववाळून टाकले म्हण म्हाताऱ्याच्या मड्यावरून , आमचा गोपीनाथ सांगत होता."  शेजारी बसलेल्या दोन माणसांचं बोलणं रमेशच्या कानावर आलं. तसा तो स्तब्ध झाला. कारण त्याला वडाच्या झाडाखाली सापडल्या पैश्यांचा संदर्भ लागला होता. हनुमान मंदिरात दिवसा जळणाऱ्या दिव्याचा अर्थ त्याला उमजला होता. अमावस्येच्या दीवशी मड्यावरच्या पैस्यानं जेवावं कि नाही याची चलबिचल मनात होत होती. पण समोर दहीभात आणि स्वतःच्या गरिबीचा नाईलाज असल्यानं तो चोरासारखा पटापट जेवला. पैसे घेतांना हॉटेल मालक दिनू काका " काय रं रमिषा ह्याबार बक्कळ चिल्लर गोळा केलीस" असं म्हणत रामेशची टर उडवत होते.

त्याच्या बोलण्याकडे फारस लक्ष न देता रामेश हॉटेलातून बाहेर पडला. हनुमान मंदिराजवळ आल्यावर हातामध्ये कडू निंबाच्या झाडाचे पानं हातात घेऊन सावकाराच्या बापाचा अंत्यविधी करून आलेले लोकं रामेशला दिसले. मसनवाट्याकड  पाहून हात जोडत रमेश म्हणाला, " सावकार असू कि कोणी रस्त्यावरच्या भिकारी असू, शेवटी सगळ्यांना मार्ग एकच! कुणाला उशीर तर कुणाला लवकर तिकडंच जायचं हाय. जगदंबे सगळ्यांना त्यांच्या जीवनाचा सफर सुखांन घडू दे ग माय.... जगदंब ...जगदंब...."

मागे हनुमान मंदिरात लावलेला दिवा तसाच  झुळू झुळूं  जळत होता...

©प्रेमकुमार शारदा ढगे.
986030326

Thursday, 4 August 2016

"न्यायमंदिर" ...

अजयच्या ताईच्या घरून बुलेटवर " रॉयल" सफरीचा आनंद घेत आम्ही क्रांतीचौकला त्याच्या ऑफिसला जाणार होतो. पण समर्थ चौकात ट्राफिक पोलीसची गाडी असल्यामुळं आम्हाला मार्ग बदलावा लागला. शेवटी पोलिसांना चुकवत आणि हुलकावण्या देत आम्ही क्रांतीचौकला सुखरूप पोचलो, कारण अजय ज्या 'रॉयल' मस्तीत गाडी चालवत होता त्यावरून आम्ही व्यवस्थित पोचू कि नाही जरा शंकाच होती.

शेवटी कांबळे साहेबांच्या पॅशनवर आम्ही बाबा पेट्रोल पंपाकडं निघालो. जाताना रस्त्यातच जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत  दिमाखात न्यायाची हमी देत सर्वाना अभिवादन करताना दिसली.  हे अभिवादन स्वकारून पुढे गेलो. जात असताना "न्यायमंदिर, जिल्हा व सत्र न्यायालय" हे नाव अगदीच भाव खात होत.

तस हे नाव मी नेहमीच बघतो. पण  या नावामध्ये आज "न्यायमंदिर" या शब्दाबद्दल थोडी शंका वाटली. न्यायालयाला "न्यायमंदिरच "  का म्हटलं असावं..? न्यायदर्गा, न्यायचर्च, न्याय गुरुद्वारा, न्यायविहार अस का म्हटलं नसावं ..? न्यायमंदिर हा शब्द खरंच तेवढा सर्वंकष आणि सर्वसमावेशक आहे का..? 'न्यायमंदिर' या शब्दांमुळं खरच  इतर सर्व जाती धर्माच्या लोकांचे धार्मिक आणि वैचारिक समाधान होत असेल का..? मंदिर या शब्दामुळं न्यायालयेसुद्धा आपण फक्त एका धर्मापुरते मर्यादित नाही का करून ठेवत..?

एकीकडे न्यायालयाला सर्व कायद्यायचे अर्थ लावण्याचे महत्वपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. परंतु संविधानाच्या ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार (१९७६) संवीधानाच्या प्रस्ताविकेमध्ये "धर्मनिरपेक्ष" हा शब्द प्रविष्ट करण्यात आला. यानुसार भारत देश कुठल्याही धर्माचा अधिकृतरित्या स्वीकार करत नाही. भारत देश सर्व धर्म हे एकसमान मानतो. धर्माबाबतीत पक्षपाती धोरण हे अस्वीकारहार्य आहे. मग असे असताना आपण न्यायालयाला "न्यायमंदिर" म्हणून संविधानाच्या उद्देशिकेचे उल्लंघन तर करत नाही आहोत ना ? या बाबतीत एका वकील मित्राशी चर्चा करणार आहेच.

आफगाणिस्थान मध्ये "आल्हा"  हा शब्द फक्त मुस्लिमच वापरू शकतात  आणि हा  त्यांचाच अधिकार आहे असे अफगाणी कोर्टाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे 'मंदिर' हे फक्त हिंदू धर्माशीच संबधीत आहेत, निदान आपल्या भारतात तरी. भारतामध्ये कुठलाही मुस्लिम त्याच्या मस्जिदीला , ख्रीस्चन आपल्या चर्चला , शीख आपल्या गुरुद्वाराला किंव्हा बौद्ध आपल्या विहाराला 'मंदिर' संबोधित नाहीत. मग अशा परिस्थितीत जेंव्हा धार्मिक दंगली होतात तेंव्हा इतर धर्मियांनी काय म्हणून न्यायाची अपेक्षा या 'न्यायमंदिरा'कडून करावी.? मग खरच न्याय मंदिरात बसलेले न्याय देवता हे  निःपक्षपातीपणे  न्याय देतील कि नाही याबद्दल शंका निर्माण झाली तर यात गैर आणि वावगे वाटण्यासारखे काहीच नाही. हे अगदी स्वाभीविक आहे.

हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच मागे कोल्हापूर जिल्ह्यात एका आय.पी.यस. अधिकाऱ्याने कोणत्याही ऑफिसमध्ये कुठल्याच देवाचे फोटो न लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत झाले होते. मात्र औरंगाबादचे काही अधिकारी शस्रपूजा करताना ,होळी खेळताना , असले अनेक फोटो मी वृत्तपत्रातून वाचले आहेत.याच्याही पुढची बाब म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री आषाढी एकादशीला सहपरिवार 'शासकीय' पूजा करतात. परंतु रमजान ईदला मात्र फक्त शुभेच्छा देतात आणि त्याही ट्विटर वरून. मग अशा वेळी एखाद्या मस्जिद मध्ये जाऊन पाच मिनिट नमाज अदा करायला काय हरकत आहे. नाही म्हणजे आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचा  सन्मानार्थ तरी जायला काय हरकत आहे...? आणि इकडे जायचे नसेल तर तिकडे हि जाऊ नका " मुख्यमंत्री" म्हणून . कारण हे पद घटनात्मक आहे . हे पद घेऊन एका विशिष्ट धर्माबद्दल पक्षपात करण्याचा तुम्हालाच काय पण कुणालाच  अधिकार नाही.  वयक्तिक जाऊन पूजा अर्चना करायला कुणाचीही अजिबात हरकत नाही. परंतु आपल्याकडे असल्या पक्षपाती घटना सर्रास घडतात. किंबहुना कोणत्याही घटनात्मक अधिकाऱ्याने किंव्हा मंत्र्याने आपल्या खासगी धर्माला विसरून जावे किमान त्या पदावर असताना तरी . एवढे सौजन्य त्यांनी दाखवायला हवे. ते ज्या ठिकाणी जातील तोच त्यांचा धर्म दिसला पाहिजे . परंतु आपल्या कडील लोकं हे धर्माला तान्हाजी मालुसरेच्या घोरपडी सारखे चिकटून आहेत. 'धर्म' या एकाच शब्दावर आपल्याकडील सत्ता बदलून जाते.

एक गोष्ट मात्र आपण कुणीच नाकारू शकत नाही ,ती म्हणजे आपण  कितीही  'धर्मनिरपेक्ष'तेचा ढोल पिटाळला तरी आपला राजकीय कल हा हिंदुत्वाकडेच झुकतो.यातूनच मग "न्यायालयाला 'न्यायमंदिर' म्हणणे, मुख्यमंत्र्यांनी एका विशिष्ट देवाची 'शासकीय'पूजा करणे, न्यायालयात 'भगवत गितेवर' शपथ घ्यायला बंधनकारक  असणे" असले प्रकार घडतात. (याबद्दलही एका व्यक्तीने याचिका टाकली आहे ) ह्या सगळ्या गोष्टी देशाच्या अंतर्गत स्वास्थ्यासाठी मात्र हानिकारक आहे. याचाच फायदा शेजारील राष्ट्र सुद्धा घेतात. देशाला महासत्ता बनवायचे असेल तर धर्मवादातून 'धर्मनिरपेक्षते' शिवाय  गत्यंतर नाही. धर्मनिरपेक्षता हे  आपल्या देशाचे खास वैशिष्ठ आहे . म्हणून  याचे भान सर्व घटनात्मक लोकांनी , संस्थांनी,  आणि जागरूक नागरिकांनी ठेवायला पाहिजे....

प्रेमकुमार शारदा ढगे(९८६०३०३२१६)
premkumar.dhage@gmail.com

Tuesday, 26 July 2016

भरकटलेली संवेदना

नगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला तो कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने.
तसे पाहता ,बलात्कार , लैंगिक अत्याचार, विनयभंग , पीडितेच्या मृतदेहाची विटंबना हा प्रकार काही नवीन नाही भारत देशाला. दररोज ९० बलात्कार होणार आपला भारत देश आहे . (२०१४ च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या सांख्यिकी नुसार)  परंतु एखाद "निर्भया" प्रकरण होऊन जातं, आणि सगळ्या देशाला मस्तक आदळायला लावत. सगळ्या देशाची झोपलेली संवेदना जागी करतं
कोपर्डी  प्रकरण सुद्धा "निर्भया" इतकेच संवेदनशील ,क्रूर आणि आख्या मानवजातीला काळिमा फासवनार आहे याबाबत दुमत नाही. परंतु ह्या प्रकरणाची झालेली राजकीय 'खिचडी' पाहून मात्र मन खिन्न होऊन जाते. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांणी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करून आपले इतिकर्तव्य पार पाडले आणि पुढेही पाडतील हीच अपेक्षा. आदरणीय न्यायालयावर तर आपला विश्वास आहेच.
निर्भयाच्या बाबतीत लोकांनी जी कमालीची संवेदनशीलता दाखवली ती खरचं कौतुकास्पद होती, आहे . सोशीअल मीडियावर सुद्धा हीच संवेदना पहायला मिळाली . निर्भयाची जात काय होती ?  तिचे खरे नाव काय आहे ? हे आजही सर्वसामान्य जनतेला माहिती नाही. तिला फक्त एक पीडित भारतीय स्त्री आणि अबला समजल्या गेले. दिल्ली पासून कन्याकुमारीपर्यंत तरुणाईने सरकारचे धाबे दणाणून सोडले. त्याचाच परिपाक म्हनूण बालगुन्हेगारीबद्दल कायद्यातील बदललेली तरतुद आहे. प्रत्येक तरुण हा निर्भयाला फक्त एक भारतीय स्त्री म्हणून बघत होता. तिच्यासोबत घडलेल्या पाशवी अत्याचाराबद्दल सगळ्या भारतीय तरुणांच्या  मनात द्वेष खदखदत होता. न्यायालयानेही जनतेचा रोष लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा केली.
कोपर्डी प्रकरणात मात्र ही संवेदना लोकं पूर्णतः विसरले. पीडितेचे खरे नाव तिच्या मृतदेहाचे फोटो सोशीअल मीडिया वर भराभर फिरू लागले. तिच्या जातीचा उल्लेख करून तिला एका विशिष्ट समाजपुरतेच बांधून ठेवले. हे सगळे करत असताना आपण समाजामध्ये अराजकता पसरवतोय याचे किंचितही भान नाही उरले या लोकांना. पीडितेचा फोटो आणि खरे नाव जाहीर केल्याने तिच्या कुटुंबाची होनारी कुचंबणा याला सुद्धा हेच लोक जबाबदार असतील. सगळे प्रकरण शांत झाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना बघून एकमेकांच्या कानात होणारी कुजबुज ही त्यांच्या प्रतीष्ठेला संकुचित करणारी असेल, याचे भान ह्या गोष्टी शेअर करणाऱ्याने ठेवायला हवे होते. पीडितेचे खरे नाव आणि फोटो हा जाणीवपूर्वक मीडिया सुद्धा लपवत असते.कायद्याची संमती नसल्याने हे सौजन्य पाळल्या जाते. परंतु सोशीअल मीडियावर सुद्धा असले बंधन असायला हवे. पीडितेचा प्रतिष्ठेचे राजकारण करून आपली राजलीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांनी सुद्धा संवेदनेचे सगळे बंध तोडले , ह्या संवेदनशील प्रकरणाला जातीय आणि राजकीय रंग आनला ही सगळ्यात कमकुवत बाजू .
दुसरी गोष्ठ म्हणजे पीडितेच्या नातेवाईकला दलित नेत्यांना  भेटण्यास मज्जाव केला गेला. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने या नेत्यांना ते 'दलित'च असल्याची जाणीव करून दिली. नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या घटनांनमध्ये आतापर्यंत पीडित हे दलित वरर्गातीलच लोकं होते. यावेळी त्यांना सगळ्या जाती धर्माचे राजकीय व्यक्तिमत्व भेट देऊन गेले. मात्र कोपर्डी प्रकरणात दलित नेत्यांना पीडितेच्या नातेवाइकांना भेटण्यास परवानगी नाकारणे कितपत योग्य आहे? कारण यावेळी अत्याचार करणारे दलित होते आणि पीडिता सवर्ण होती. परंतु आत्याचारी आणि आरोपीला कोणताही धर्म ,जात नसते.  त्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजेच.
जे सौजन्य निर्भयासाठी जनतेने दाखवले ते कोपर्डीतील निर्भयासाठी दाखवले गेले नाहि याचे दुःख वाटते. मुळात स्त्रियांवरील बलात्कार ही पौरुषी विकृतीतून प्रकट झालेली नीच भावना आहे. यासाठी  समाजावर आणि जणसामन्यावर कायद्याच्या धाकाबरोबरच वैचारिक प्रबोधन होणे ही तेवढेच गरजेचे आहे. बलात्कार होऊच  नये याकरिता पुरुष जातीमध्ये स्त्रियांबद्दलचे सुसंस्कार आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.
प्रेमकुमार शारदा ढगे
(९८६०३०३२१६)
premkumardhage.blogspot.com

भरकटलेली संवेदना

महेंद्र कुलकर्णी लिखित "एवढ्या विसंगती इथेच?" वाचला. नगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला तो कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने.
तसे पाहता ,बलात्कार , लैंगिक अत्याचार, विनयभंग , पीडितेच्या मृतदेहाची विटंबना हा प्रकार काही नवीन नाही भारत देशाला. दररोज ९० बलात्कार होणार आपला भारत देश आहे . (२०१४ च्या क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या सांख्यिकी नुसार)  परंतु एखाद "निर्भया" प्रकरण होऊन जातं, आणि सगळ्या देशाला मस्तक आदळायला लावत. सगळ्या देशाची झोपलेली संवेदना जागी करतं

कोपर्डी  प्रकरण सुद्धा "निर्भया" इतकेच संवेदनशील ,क्रूर आणि आख्या मानवजातीला काळिमा फासवनार आहे याबाबत दुमत नाही. परंतु ह्या प्रकरणाची झालेली राजकीय 'खिचडी' पाहून मात्र मन खिन्न होऊन जाते. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांणी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करून आपले इतिकर्तव्य पार पाडले आणि पुढेही पाडतील हीच अपेक्षा. आदरणीय न्यायालयावर तर आपला विश्वास आहेच.

निर्भयाच्या बाबतीत लोकांनी जी कमालीची संवेदनशीलता दाखवली ती खरचं कौतुकास्पद होती, आहे . सोशीअल मीडियावर सुद्धा हीच संवेदना पहायला मिळाली . निर्भयाची जात काय होती ?  तिचे खरे नाव काय आहे ? हे आजही सर्वसामान्य जनतेला माहिती नाही. तिला फक्त एक पीडित भारतीय स्त्री आणि अबला समजल्या गेले. दिल्ली पासून कन्याकुमारीपर्यंत तरुणाईने सरकारचे धाबे दणाणून सोडले. त्याचाच परिपाक म्हनूण बालगुन्हेगारीबद्दल कायद्यातील बदललेली तरतुद आहे. प्रत्येक तरुण हा निर्भयाला फक्त एक भारतीय स्त्री म्हणून बघत होता. तिच्यासोबत घडलेल्या पाशवी अत्याचाराबद्दल सगळ्या भारतीय तरुणांच्या  मनात द्वेष खदखदत होता. न्यायालयानेही जनतेचा रोष लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा केली.

कोपर्डी प्रकरणात मात्र ही संवेदना लोकं पूर्णतः विसरले. पीडितेचे खरे नाव तिच्या मृतदेहाचे फोटो सोशीअल मीडिया वर भराभर फिरू लागले. तिच्या जातीचा उल्लेख करून तिला एका विशिष्ट समाजपुरतेच बांधून ठेवले. हे सगळे करत असताना आपण समाजामध्ये अराजकता पसरवतोय याचे किंचितही भान नाही उरले या लोकांना. पीडितेचा फोटो आणि खरे नाव जाहीर केल्याने तिच्या कुटुंबाची होनारी कुचंबणा याला सुद्धा हेच लोक जबाबदार असतील. सगळे प्रकरण शांत झाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना बघून एकमेकांच्या कानात होणारी कुजबुज ही त्यांच्या प्रतीष्ठेला संकुचित करणारी असेल, याचे भान ह्या गोष्टी शेअर करणाऱ्याने ठेवायला हवे होते. पीडितेचे खरे नाव आणि फोटो हा जाणीवपूर्वक मीडिया सुद्धा लपवत असते.कायद्याची संमती नसल्याने हे सौजन्य पाळल्या जाते. परंतु सोशीअल मीडियावर सुद्धा असले बंधन असायला हवे. पीडितेचा प्रतिष्ठेचे राजकारण करून आपली राजलीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांनी सुद्धा संवेदनेचे सगळे बंध तोडले , ह्या संवेदनशील प्रकरणाला जातीय आणि राजकीय रंग आनला ही सगळ्यात कमकुवत बाजू .

दुसरी गोष्ठ म्हणजे पीडितेच्या नातेवाईकला दलित नेत्यांना  भेटण्यास मज्जाव केला गेला. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने या नेत्यांना ते 'दलित'च असल्याची जाणीव करून दिली. नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या घटनांनमध्ये आतापर्यंत पीडित हे दलित वरर्गातीलच लोकं होते. यावेळी त्यांना सगळ्या जाती धर्माचे राजकीय व्यक्तिमत्व भेट देऊन गेले. मात्र कोपर्डी प्रकरणात दलित नेत्यांना पीडितेच्या नातेवाइकांना भेटण्यास परवानगी नाकारणे कितपत योग्य आहे? कारण यावेळी अत्याचार करणारे दलित होते आणि पीडिता सवर्ण होती. परंतु आत्याचारी आणि आरोपीला कोणताही धर्म ,जात नसते.  त्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजेच.

जे सौजन्य निर्भयासाठी जनतेने दाखवले ते कोपर्डीतील निर्भयासाठी दाखवले गेले नाहि याचे दुःख वाटते. मुळात स्त्रियांवरील बलात्कार ही पौरुषी विकृतीतून प्रकट झालेली नीच भावना आहे. यासाठी  समाजावर आणि जणसामन्यावर कायद्याच्या धाकाबरोबरच वैचारिक प्रबोधन होणे ही तेवढेच गरजेचे आहे. बलात्कार होऊच  नये याकरिता पुरुष जातीमध्ये स्त्रियांबद्दलचे सुसंस्कार आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.

प्रेमकुमार शारदा ढगे
(९८६०३०३२१६)
premkumardhage.blogspot.com

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...