Friday, 14 September 2018

गणरायाला खुली प्रार्थना..!

वेलकम बॅक गणपती बाप्पा. तू आला म्हणजे कसं मनाला जो या आस्सीम आनंद होतो त्याला पारावार उरत नाही. तुझं येणं म्हणजे अगदी शाही थाटात असत. ढोल ताशा, नगाडे गुलाल , फटाके काय काय नि काय काय!

बाप्पा सद्याच्या काळात तू बघत असशील सगळ्यात जास्त तुझे कोणी भक्त असतील तर ते म्हणजे भारतातील तरुणाई. डोक्याला फेटा, पांढरीशुभ्र शेरवानी ,तिच्यावर सात आठ फुटाचा  रेशमी रुमाल कपाळाला भगवा अष्टगंध, पायात कोल्हापुरी उजव्या, मनगटावर भगवा धागा आणि त्याच हातात कमरेवरच्या भल्या मोठ्या ढोलाला पाठीमागे सत्तर डिग्रीच्या कोनात वाकून दणादण वाजवताना भक्त पाहिला की आपोआप भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.

गजानना तुझ्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असलेला हा तुझा तरुण भक्त वर्ग तुझ्या येण्यासाठीच्या तयारीमध्ये एकदोन महिने आधीच तासंतास प्रॅक्टिस करत बसलेला असतो. निदान एका महिन्यापासून तरी मी बघतोय प्रत्येक मंदिराबाहेर किमान वीस बावीस तरुण युवक मंडळी तुझ्या आगमनाच्या तयारीच्या नावाखाली ढोल पिटाळात बसलेले असतात. यामध्ये महाविद्यालयीन आणि शिक्षण संपलेले युवकच जास्त असतात. देवा , मला सांग ह्या अवांतर तयारीची खरोखरचं गरज आहे का रे? म्हणजे हा युवक आलेला तरुण वर्ग निव्वळ ढोल वाजवण्यासाठी म्हणून चक्कपैकी महिनाभर आधीच स्वतःला व्यस्त करुण घेतो, इतका का तो बेरोजगार आहे..? तो बेरोजगार असणं हा किती प्रमाणात "राजकीय" प्रश्न आहे हा भाग वेगळा आहे; पण जे आहे ते सत्य आहे. आपल्या तरुणाला निव्वळ ढोल वाजवन्यासाठी एवढा वेळ मिळतोच कसा..? जगात सगळ्यात जास्त तरुण असल्याची बुरुदावली मिरवणाऱ्या देशात हाच तरुण इतका रिकामटेकडा असणं हे खरंच योग्य आहे का? ह्या तरुण पिढीने योग्य त्या ठिकाणीे चातुर्य आणि बुद्धी वापरून स्वतःचा आणि देशाचा विकास करायचा सोडून ते ढोल पिटाळण्यात धन्यता मानतात हे केवळ देशाचं दुर्दैव आहे! ऐन उमेदीच्या काळात भारतीय तरुण स्वतःचा 'टलेंट' आणि 'पोटेन्शल' जर असा खर्च  करत असेल तर उद्या देशाचे भवितव्य काय असणार हा मोठा प्रश्नच आहे!

माणसाने नक्कीच श्रद्धाळू असलं पाहिजे. पण श्रद्धेच्या नावाखाली आपल्या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीला खीळ बसता कामा नये. गणपतीचे दहा दिवस तर मौजमजा चालतच असते. शिवाय हा सण राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहे. त्यामुळे का होईना पण सगळा समाज एकत्र येत असतो. त्यामुळं याला काही हरकत असण्याचे कारणच नाही. पण महिनाभर आधीच कित्येक तास तरुणांनी वेळ फुकट वाया घालवणे हे आपल्या राष्ट्रीय प्रगतीचे दर्शन घडवते. देव धर्माच्या नावाखाली ढोल पिटणाऱ्या तरुणापेक्षा महिन्याला घर खर्चात हातभार लावणारा तरुण मुलगा कोणत्याही पालकांना आवडेल.

तेंव्हा गणराया, तुझ्या पुढच्या आगमनाच्यावेळी बहुतांश तरुणांना महिनाभर आधीच ढोल वाजवत बसवण्यापेक्षा त्यांना रोजगार मिळून देऊन त्यांचा खराखुरा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता बन हीच प्रार्थना!

प्रेमकुमार शारदा ढगे, नागसेनवन औरंगाबाद
(मुक्त पत्रकार, 9860303216)

Wednesday, 31 January 2018

धर्मनिरपेक्षता..!

संप्रदायिकता आणि धर्मनिरपेक्षतेचे धिंडवडे..

सध्या सांप्रदायिक हिंसेचा संपूर्ण देशामध्ये  जी विशिष्ट साखळी चालू आहे ती भारत देशाच्या भवीतव्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे. उत्तर प्रदेशचे सहारणपूर असो, गुजरातचे उणा असो, महाराष्टाचे भीमा कोरेगाव असो हे सगळे सांप्रदायिक हिंसेचे बळी ठरलेलं राज्य आहेत. हिंदू-मुस्लिम , दलित-सवर्ण असल्या संप्रदीक हिंसेमुळे संपूर्ण भारतीय समाज ढवळून निघत आहे. देश आणि समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारची दहशत आणि अशांतता धुमसत राहते.

खरं तर असल्या धार्मिक दंगलिंची आणि सांप्रदायिकतेचि प्रकरणे हे आपल्या देशासाठी नवीन नाहीत. महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर ब्राम्हण विरोधी दंगली असतील,  गोध्रा हत्याकांड असेल, बाबरीचा पाडाव असेल, इंदिराजींच्या मृत्यूंनातर शीख समुदायाचा नरसंहार असेल, या सगळ्या प्रकरणातून देशाला कधीही भरून न निघणारी जखमच झाली आहे. या सगळ्या प्रकरणांत गुंतलेल्या लोकांच्या कोर्ट कचेऱ्या आजूनही चालू आहेत. तरुण विद्यार्थ्यांना या प्रकरणामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये अडचण निर्माण होते. कोर्टच्या खेट्या माराव्या लागतात ते वेगळेच. आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते. तरी सुद्धा आपण भूतकाळातील इतिहासातून जर काहीच शिकलो नाहीत तर आपल्या सारखा दुर्दैवी दुसरा कोणीही नसेल!

आपल्या देशाने संविधानाच्या प्रस्ताविकेतच हे स्पष्ट केले आहे की कोणताही धर्म हा भारताचा अधिकृत धर्म नसेल. देशात सर्व धर्माना समान लेखले जाईल. सर्व धर्म संप्रदायांना त्याच्या धर्माचे पालन आणि प्रसार करण्याचे स्वतंत्र राज्यघटनेने दिलेले आहेच.  धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. आपली घटनाच मुळात माणुकीचा पुरस्कार करण्याचे शिकवते. संपूर्ण जगात आपल्या देशाकडे पाहण्याचा लोकांचा कल हा सन्मानपूर्वक असतो तो यामुळेच!

असे असताना सुद्धा काही अतिउत्साही आणि अविवेकी माणसं ( ते सगळ्याच धर्मामध्ये असतात) आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे या अहंगंडात फिरत असतात. तरुणाची माथी भडकावण्यात हे सगळे सराईत असतात.या माथेफिरू लोकांवर  काही राजकीय लोकांचा वरदहस्त असतो. त्यामुळे यांचे जास्ताच फोफावते.  परंतु बिचारे तरुण त्यांच्या या अविवेकला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेतात.

या लेखाच्या निमित्ताने सर्व तरुण वर्गाला माझे आवाहन आहे की, सर्व तरुणांनी आधी स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्यावे.आई वडिलांचे स्वप्नांना साकार करावे. उच्च शिक्षण घ्यावे .स्वतःची प्रगती करून घ्यावी. प्रत्येक तरुण आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला की आपोआप देश प्रगतीपथावर चालतो. चांगले वाईट यांतील फरक ओळखावा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकारन्यांच्या हाताचे बाहुले बनू नये. तरुणांनी आपले तारुण्य आणि कल्पनाशक्ती विधायक कामासाठी वापरावी. स्वतःचा कुणालाही वापर करू देऊ नये. जागरूक राहावे. आपले तारुण्य निरर्थक गोष्टींसाठी खर्ची घालू नये. संपूर्ण देश तरुणाईकडे आशेने बघतोय. कारण ही तरुणाईचं देशाला योग्य नेतृत्व आणि दर्जा मिळवून देऊ शकते.

प्रेमकु शारदा ढगे, (मुक्त पत्रकार) नागसेनवन औरंगाबाद
9860303216

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...